Nojoto: Largest Storytelling Platform
aparnamande1619
  • 473Stories
  • 104Followers
  • 4.1KLove
    8.6KViews

Aparna Mande

विचारांना प्रवाह मिळाला की लेखणी जन्म घेते ✒️❤️

  • Popular
  • Latest
  • Video
c333c08d5dbd39933b80bf42cbd905ef

Aparna Mande

हल्ली लिखाण थांबवलंयस का ?
विचारतात सगळे मला , 
लिहीत नाहीस काहीच हल्ली , काही बिनसलंय का ????

खरं उत्तर दिलं तर सांगून पटेल का ???
शब्द नुसते रचले म्हणून....
कविता लिहिता येतात का ?
यमक नुसते जुळले म्हणून...
कविता रचता येतात का ???
कोमेजलेल्या मना मधून कविता फुलतात का ???
कोमेजलेल्या मना मधून कविता फुलतात का ???
.......

©Aparna Mande
  #outofsight
c333c08d5dbd39933b80bf42cbd905ef

Aparna Mande

लिहिशील ना तु माझ्यासाठी
आजवर सारे राहिलेले
माझ्या मधले मीपण सारे
तुझ्या नजरेने पाहिलेले....

©Aparna Mande #Soul
c333c08d5dbd39933b80bf42cbd905ef

Aparna Mande

If you want to
raise your daughter
 as a Princess 
Make sure you treat your wife
like a Queen.......

©Aparna Mande #astrology
c333c08d5dbd39933b80bf42cbd905ef

Aparna Mande

पारिजातकाच्या  मोहात पडून
दारीचा चाफा दुर्लक्षित होत राहिला
सुगंध देत नसला तरी
नित्यनेमे फुलत राहिला...


अपर्णा.

©Aparna Mande #agni
c333c08d5dbd39933b80bf42cbd905ef

Aparna Mande

बडे दिनो बाद कुछ लिखने की कोशिश की...

मानो खुदको खुदसे मिलाने की कोशिश की...

मन मे उठे कई सवालो के जवाबो को 

थोडा सजा धजाकर शब्दोमे बों कर, 

पंक्तीयों संग पीरोनो की कोशिश की.....

मगर अफसोस.......

मेरी हर एक कोशिश नाकामीयाब रही....

खुदमे खोये खुद को धुंडने की,

और फिरसे कुछ लिखने की हर कोशिश नाकामीयाब रही...



अपर्णा.

©Aparna Mande #moonnight
c333c08d5dbd39933b80bf42cbd905ef

Aparna Mande

ओढ आहे तोवर साऱ्या जुळून येती रेशीम गाठी 

ओढ संपता टाळण्याची करणं सुचती खोटी खोटी 

जपले नाते तन्मयतेने झूगारुनी रीती भाती 

सरते शेवटी उरले काय? आणि आयुष्याची झाली माती 

तुटण्या साठीच जुळतात कदाचित अशी काही नाती गोती 

माणसांमधल्या रेशीमगाठी 

माणसांमधल्या रेशीमगाठी


अपर्णा ❤️

©Aparna Mande #Chhuan
c333c08d5dbd39933b80bf42cbd905ef

Aparna Mande

निसर्गापुढे माणसाला हतबलच व्हावं लागतं 
त्याच्या प्रकोपा पुढे झुकतचं घ्याव लागतं.
कुठे शेती वाहून नेली, 
तर कुठे सौंसारं वाहून गेली
 आणि कुठे कुणाची लेकरही वाहून नेली...
आई बिचारी हतबल, टाहो फोडून आक्रोश करत राहिली....
कुणी केलेल्या चुकांची शिक्षा निष्पापांच्या पदरी आली 
माणसानं केलेली निसर्गाची उध्वस्ती त्यानं
निर्दयी रित्या वसूल केली.... 
😔😔

Aparna mande








.

©Aparna Mande
c333c08d5dbd39933b80bf42cbd905ef

Aparna Mande

सुचत नसलं तरीही
शब्दांचे खेळ रचायचे 
ओढून ताणून उगाच
 कवितेचे डाव मांडायचे 
अशी ही कलाकृती काही केल्या फुलत नाही 
कितीही जुळवू म्हंटल तरी
यमक काही जुळत नाही 
कवितेच्या भावार्थाचा "भाव" मना पर्यंत पोहोचत नाही 
ओढून ताणून लिहिलेल्याची.....
कविता होत नाही 
कविता होत नाही.....


अपर्णा

©Aparna Mande
  #kitaabein
c333c08d5dbd39933b80bf42cbd905ef

Aparna Mande

गजबजलेल्या या दुनियेत
कुणीतरी असं मिळावं
माझ्या सारखंच त्यानंही
साधं, सरळ, सोप्प असावं...
निखळ प्रेम, त्यानंही करावं
व्याकुळ होऊन माझ्यासाठी,मनातल्या मनात झूरावं.

अपर्णा

©Aparna Mande
  #Flower #love #poem #words #thoughts
c333c08d5dbd39933b80bf42cbd905ef

Aparna Mande

तुझ्या प्रत्येक स्खलना समवेत 
माझे अश्रू स्खलत राहिले 
तु दुर्लक्षित केल्या...
प्रत्येक आसंवाचे घाव गहिरे होत गेले.....
तु मिलन म्हणत राहिलास ज्या घर्षणाला
माझ्या लेखी तो 'अत्याचार' मि सहन करत राहिले 
आणि मि तुझ्या पासून तितकीच दूर-दूर होत गेले 
तुझ्या प्रत्येक स्खलना समवेत 
मि तुझ्यापासून दुरावत गेले
तुझ्या पासून दुरावत गेले........

अपर्णा.





.

©Aparna Mande #girl
loader
Home
Explore
Events
Notification
Profile