Find the Latest Status about असणाऱ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असणाऱ्या.
Sangeeta Kalbhor
गोष्ट एका प्रेमाची प्रेमाने मी मांडते प्रेम जोवर लेखणीत लेखणी सुखावते साजरा होतो ऋतू मनामनात काजवा प्रेम भरल्या मनाचा सदैव कौल उजवा नटते धरा नटते अंबर नटते अवघी सृष्टी प्रेम मनात असणाऱ्याची प्रेमळ बनते दृष्टी चराचरात एकची नाद प्रेम पुरुन उरते हाकला कितीही आठवणींना प्रेम स्मरते विठ्ठू माऊलीच्या चरणी प्रेममळा रंगतो वारकरी घेऊनी वीणा जय जय हरीत रंगतो भूक कुठे नि कुठे तहान प्रेम प्रेमात असताना करावी लागत नाही खंत प्रेम शीतलता देताना नात्यांना येते कुंदन रुप बळकटी जाम देते संकट येता एकजूटीने संकटाला दूर नेते लेखणी होती न्हातीधुती साजशृंगार आगळा तो शब्द उमटता काळजावर प्रेमप्रेम सोहळा तो..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor गोष्ट एका प्रेमाची प्रेमाने मी मांडते प्रेम जोवर लेखणीत लेखणी सुखावते साजरा होतो ऋतू मनामनात काजवा प्रेम भरल्या मनाचा सदैव कौल उजवा नटते ध
Sangeeta Kalbhor
प्रेम मी रे जाणले.. मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले वार होत असता चित्तावर चित्त होते थरथरले काळीज दाटून नयनात अश्रूतून झुरझूरले काय चुकले माझे की मी माझेपण अर्पिले पाषाण ह्रदयी असणाऱ्याला शेंदुराने सजविले घाव बसता घावावर हाक तरी निघावी कशी निपचित पडून वेडे सत्त्व घेत असे वामकुक्षी ह्रदया तुझ्या कारणे मी काय काय सोसले शब्द आग ओकताना रे कुठले देऊ दाखले एक बरे जाहले मला वेडीला प्रेम रे घावले काळजाला काजळवणारे प्रेम मी रे जाणले..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #outofsight प्रेम मी रे जाणले.. मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले वार होत असता चित्तावर चित्त होते थर
Sangeeta Kalbhor
काळीज तुटता तुटता.. काळीज तुटता तुटता तुटून जातो माणूस का अन् कशासाठी प्रश्नात अडकतो माणूस वहायचे असते आत्मफूल आत्मा नाही सापडत अंधार करुन भवताली अखंड असतो चाचपडत नशीब म्हणून जयाचे लागेबांधे जो जपतो कमनशिबी बनण्याचे खापर तोच पचवतो प्रेम करुनिया वैकुंठी रिक्त ज्याची ओंजळ भाव तयाचे असतात किती किती प्रांजळ हे राम तुम्ही म्हणता मर्यादाचे कर पालन अपनत्व इच्छा मनी अवगुणांचे व्हावे क्षालन कसे आणि कोठून उधार घ्यावयाचे धैर्य जयाच्या मनी सदैव असतच नाही स्थैर्य काळीज असणाऱ्यांचा काळोख दाटून उरतो प्रेम हवे म्हणूनिया प्रेमाचा रोमरोम थरथरतो त्या वेदनेला कुठून यावी ग्लानी शांततेची काळजाला कला अवगत काळीज जोडण्याची..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #hibiscussabdariffa काळीज तुटता तुटता तुटून जातो माणूस का अन् कशासाठी प्रश्नात अडकतो माणूस वहायचे असते आत्मफूल आत्मा नाही सापडत अंधार करुन
Sangeeta Kalbhor
हो.... नाही मी सावित्री आणि नाहीचं मी सीता व्रतस्थ असले तरी मनात माझ्या काहूर आहे भलत्याच दिशेची चाहूल आहे.. मान्य नसेलचं कोणाला अशी पहाट मी नित्य अनुभवतेयं चुचकारतं स्वतःला सत्याला दूर भिरकावतेयं माहीत आहे तरी पाऊले चालतात आडवळणावर का कोणास ठाऊक इच्छांचे कौतुक होतेयं अनावर खंत आहेचं आणि आहे धिक्कार असल्या फालतू इच्छांचा नसल्या जरी कामवासना तरी भरकटलेल्या मनाचा का म्हणून येतोयं भाव जागृत करणारा देहाला पीळ का पडत नाही वळ उठवून जाणिवेला चरर्र होतयं आतल्याआत कळ उठतेयं काळजात का उगा सोस नाहक सरळसरळ असणाऱ्या आयुष्यात काय उणे ज्यात मी निराश व्हावे कमालीचे भरभरून मिळाल्यावरही का नुसते डोहाळे भिकेचे..थांबून जावा श्वास इथेच असाच जर येणार असेल...मला मी हरवून....मी जिवंत जर राहणार नसेल.....मी माझी.....24/05/2023 ©Sangeeta Kalbhor हो.... नाही मी सावित्री आणि नाहीचं मी सीता व्रतस्थ असले तरी मनात माझ्या काहूर आहे भलत्याच दिशेची चाहूल आहे..
Prerana Jalgaonkar
मनातल्या रेसिपीज (लेख👇) रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस.माझ्या हातात टीव्ही चा रिमोट कंट्रोल आला.काय पहायचं हा मोठा प्रश्न.न्यूज चॅनल्स पाहिल्यावर काही काळाने नेगेटीव्ह
Prerana Jalgaonkar
मी लिहिलेलं एक पत्र प्रिय बाई, ( पूर्ण पत्र 👇) प्रिय बाई, नुकताच शिक्षक दिन होऊन गेला.तुम्ही शिकवलेलं सर्व आठवत अजून. तसं एरव्ही काही लिहिताना, वाचताना, वाचलेलं समजून घेताना तुमची आठवण आल
Prerana Jalgaonkar
मनातल्या रेसिपीज (लेख👇) रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस.माझ्या हातात टीव्ही चा रिमोट कंट्रोल आला.काय पहायचं हा मोठा प्रश्न.न्यूज चॅनल्स पाहिल्यावर काही काळाने नेगेटीव्ह
Prerana Jalgaonkar
मी लिहिलेलं एक पत्र प्रिय बाई, ( पूर्ण पत्र 👇) प्रिय बाई, नुकताच शिक्षक दिन होऊन गेला.तुम्ही शिकवलेलं सर्व आठवत अजून. तसं एरव्ही काही लिहिताना, वाचताना, वाचलेलं समजून घेताना तुमची आठवण आल
Secret Quotes
काही सवयी वाईट तर काही चांगल्या ही असतात, अशीच एक तिची सवय मला पण लागली होती ती असो नसो तीचं असणं जवळ कायम भासतं मनाला माझ्या खऱ्यातून ती खूप दूर गेलीये माझ्या मनातून पण आजही ती जवळ आहेस माझ्या, मग या भावना चांगल्या की वाईट माहित नाही मला पण तिला विसरून जाणं हे मनाला मान्य आजही नाहीये आजही झोपताना तिला रोज मिठीत नाही भरलं तर झोप काय येतं नाही मग कितीही शरीर थकलेले असो रात्रभर ती रात्र विचारात निघून जाते, असाच काल वाढदिवस होता तिचा बोलत नाही ती माझ्यासोबत तरीही खूप कामात असूनही तिला शुभेच्छा देण्यासाठी वेळ काढला शुभेच्छा दिल्या काही वेळाने घरी आलो तर रोजच्या सारखे मिठीत भरले तिला पण ती एवढी दूर जाऊन सुद्धा एवढी जवळ भासतं होती की झोप काही केल्याने लागली नाही सकाळ झाली आवरले अन तिचा वाढदिवस असल्यामुळे काल घरीच थांबलो घरचेच काम करत बसलो तिच्या कडे दुर्लक्ष केले मुद्दाम कारण काही गोष्टी मलाही पटत नाही आजही तिच्या रात्र झाली जेवण करून परत झोपलो कालची झोप पूर्ण करावी म्हणून लवकर झोपलो पण रात्री ही झोप काय आलीच नाही रात्री पण खूप जवळ मिठीत येऊन रात्रभर माझ्याशी ती काहीतरी बोलत होती घट्ट मिठीत घेऊन काहीतरी समजून सांगत होती पण थकेलं असल्यामुळे मी ती भाषा समजू शकलो नाही, -AS Patil✍️ हे काय घडतयं काही समजत नाहीये मला नेमकं काय संकेत ती मला देत असते काही समजत नाहीये, अजून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहेत तिच्यावर कारण तिला कधीच क
Secret Quotes
सोशियल मेडीयाचा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलाय की, आज सगळ्यांच्या संस्कारावर प्रश्न उभे राहत आहेस, शिकावं काही त्यातून तर चांगलंच शिकाव काही तुरळक गोष्टी आहेत त्या कडे सगळेच ओढावले जात आहेत, काय काय बघावं लागतंय टाकणाऱ्या पेक्षा बघणारा येथे नागडा दिसत आहेत, फॅशन आणि ट्रेंड नावाखाली कपडे आणि संस्कार रस्त्यावर पडतं आहेत, पदवी नावलौकिक धन वैगेरे हा फक्त हेवा आहेत नजरेत मान सन्मान जिव्हाळा आपुलकी इज्जत मणी हेच मोठे मान धन आहेत, संत महामुणी पंत कवी सांगून गेलेत कुठल्या ही गोष्टीचा जास्त अहंकार घमंड न ठेवता स्वाभीमानी रहा पण आजच्या वेळेस एका कवी ने मला विचारलं होत की साहित्य म्हणजे काय असतं नेमकं हे जर माहित असेल तर बोल म्हणे उत्तर त्या वेळेस पण होते, पण अहंकार दिसला त्या मध्ये बोलण्याची पण इच्छा उरली नाही त्या क्षणी, कोणी मला लेखक म्हणावं कवी म्हणावं किंवा इतर काही थोडी पण त्या जागेची इज्जत हेवा मनात मात्र उरली नाही गर्वीष्ट भावना मला नकोय, -AS Patil✍️ मी स्वार्थी खूप जग बघितलं आहेत पण जेव्हा काही भावनेत सुद्धा गैरफायदा घेतला तेव्हा मनातून चांगले होते की वाईट माहित नाही पण त्याच क्षणी समजले