Nojoto: Largest Storytelling Platform

New आमच्यात कव्वाली गझल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आमच्यात कव्वाली गझल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आमच्यात कव्वाली गझल.

    PopularLatestVideo

MDRubad

कव्वाली #स्पोर्ट्स

read more
mute video

shish ali

कव्वाली #पौराणिककथा

read more
mute video

Shivam Veer

mute video

Rohini kadam

आजोबा, तुम्हाला रहायचंय आमच्यात...!

read more
आजोबांसाठी... आजोबा, तुम्हाला रहायचंय आमच्यात...!

Ganesh Nagavade

गझल

read more
धडे शिकण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले
धुणी धुवण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले

तिथे दिसल्या मला तर मावलाया पूजलेल्या
झरे बघण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले

कुणी चुरगाळल्या की अत्तरे त्यांची बनवली
फुले विकण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले

स्वत:च्या सारखी कानात म्हातारी बरळते
नदी धरण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले

हळद अन अक्षता दिसतात विहिरीच्या तळाशी
घडा भरण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले

तहानेशी मुलींची भेट झाली का नव्याने
हरिण बघण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले

चरे दिसतात त्यांच्या आजही का चेह-यावर
तडे बुजण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले

कसे कुठल्याच विहिरीला अजुन नाही कळाले
पुढे मरण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले

कळ्यांच्या कोवळ्या ओठांस देठांनो विचारा
फुले बनण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले

               --गणेश नागवडे गझल

Harish Damodhar Naitam

गझल

read more
गझल

तुझ्या प्रीतीचा आहे मी भुकेला 
आता तरी तु भुक शमशील  का ||

तुझ्या दर्शनासाठी फिरतो सैरावैरा
आता तरी तुझे दर्शन घडवशील का ||

तुझ्या विना राहवत नाही मला
नयनाला नयन  भिडवशील का ||

माझ्या मनात सदा तुझेच विचार
तुझ्या ह्रदयात मला ठेवशील का ||

स्वप्नात माझ्या वनवा पेटवलीस तु
स्वप्न माझे पूर्ण करशील का ||

तुझ्या नयनात नकळत दिसतो होकार
तुझ्या प्रीतीची साथ मला देशील का ||

तु दिसली कि शब्दच ओठांवर येईना
अप्रत्यक्ष इशारा समजुन घेशील का ||

हात तुझा माझ्या हातात देउन
नाते प्रेमाचे घट्ट जोडशील का ||
 
 --- हरिष नैताम गझल

Meena Panchal

गझल

read more
*गागालगालगागा गागालगालगागा*

कशास आई


देऊन जन्म मजला,कुढते कशास आई ?
दिनरात्र नेत्र ओले,रडते कशास आई ?


हाती तुझ्या न माझ्या,कन्या रुपात जगणे
सांभाळण्या मला तू,डरते कशास आई ?


मुलगी म्हणून मजला, झिडकारले कुणी जर
दुःखात लाकडासम,जळते कशास आई ?


स्त्री जन्म लाभणे हे,का ते तुझ्याच हाती ?
करुनी जिवास कष्टी,ढळते कशास आई ?


कर्तव्यदक्ष स्त्री तू,समजू नकोस अबला
शब्दांत त्या जनांच्या,अडते कशास आई ?


घेईन मी भरारी,गगनास पेलणारी
कमजोर मग उगा तू,ठरते कशास आई ?


जाणीव ह्या मनाला,साऱ्या तुझ्या ऋणांची
होईन ढाल तेंव्हा,लढते कशास आई ?


कमजोर बनवणारी, दुनिया असे विखारी
लाथाड तू रुढींना,खचते कशास आई?




*मीना पांचाळ* गझल

Mangesh

गझल #poem

read more
mute video

प्रकाश साळवी

गझल

read more
गझल :
वृत्त : व्योमगंगा
लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा

काय देवा सांग पाहू अंतरंगी शोधताना
का मनाचा भार वाहू बाह्यरंगी शोधताना
**
का तरी रूपा तुझीया आळवावे डोळियांनी
फूल व्हावे रे मनाने संतरंगी शोधताना
**
जांभळ्या रंगात मी ही का असा रंगून जातो
बोल का भांबावतो मी सप्तरंगी शोधताना
**
तू असा का रे निलेशा शोधताना सापडेना
शोधता शोधू कुठे मी कृष्णरंगी शोधताना
**
ध्यास हा माझ्या मनीचा आसवे ही लोचनांची
बंद झाली ही कवाडे मूकरंगी शोधताना
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ गझल

कवी - के. गणेश

गझल..

जसजसे हे दुःख जेव्हा पचत जाते
अडचणीवर मात करणे सुचत जाते

ऐतखाऊ जीवनाला त्याग मित्रा
भोगल्यावर वेदना पण रुचत जाते

भाकरी अन तेल चटणी गोड  मानू
हाव सुद्धा सरण अपुले रचत जाते

बंगल्याला रंग चढता लाल हिरवा
झोपडी ती का उगा रे? खचत जाते

झिंगलेल्या आज इथल्या माणसांना
बघ गणेशा सरळ इच्छा लुचत जाते
--------------------------------
© कवी गणेश खरात
     ९०२८११०५०९

©कवी - के. गणेश गझल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile