Nojoto: Largest Storytelling Platform

New नाटककार बाबूराव गोखले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नाटककार बाबूराव गोखले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नाटककार बाबूराव गोखले.

    PopularLatestVideo

Sarita Prashant Gokhale

#WoRasta शीर्षक -- मनातला कृष्ण शब्द माझे गीत होऊन ओठावर येऊन थबकतो तेव्हा मनातला कृष्ण मला बासरीच्या सुरात आठवतो.... #मराठीकविता

read more
शीर्षक -- मनातला कृष्ण 

शब्द माझे गीत होऊन 
ओठावर येऊन थबकतो 
तेव्हा मनातला कृष्ण मला 
बासरीच्या सुरात आठवतो....

मुग्ध होऊन हा खेळ त्याचा 
डोळ्यांच्या काठात येतो
तेव्हा मनातला कृष्ण मला 
प्रेमाच्या रंगात भिजवतो...

हृदय घायाळ होऊन जेव्हा 
वेदनेच्या मर्माला तीर लागतो
तेव्हा मनातला कृष्ण मला
कुंजवनीच्या स्वप्नात आठवतो....

चांदणे हास्यात लपवून
नयनांची पौर्णिमा झाकतो
तेव्हा मनातला कृष्ण मला 
संसाराच्या अंगणात आठवतो....

सरिता प्रशांत गोखले
रत्नागिरी

©Sarita Prashant Gokhale #WoRasta 
शीर्षक -- मनातला कृष्ण 

शब्द माझे गीत होऊन 
ओठावर येऊन थबकतो 
तेव्हा मनातला कृष्ण मला 
बासरीच्या सुरात आठवतो....

Sarita Prashant Gokhale

#SunSet वृत्त:- स्त्रग्विणी लगावली:- गालगा,गालगा,गालगा,गालगा सौख्य ताटातले घेतले मी कुठे दु:ख दैवातले टाळले मी कुठे #मराठीशायरी

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

शीर्षक:- पहिला पाऊस येता पहिला पाऊस देतो मनाला गारवा, सृष्टी सजताना सारी शालू नेसते हिरवा.! येता पहिला पाऊस #मराठीकविता

read more
येता पहिला पाऊस
देतो मनाला गारवा,
सृष्टी सजताना सारी
शालू नेसते हिरवा.!

येता पहिला पाऊस
नाचे मोर रानामध्ये,
पिसे गळताना दाटे
रडू सारे मनामध्ये.! 

येता पहिला पाऊस
होतो शेतकरी बाप,
देतो जगाला आधार
दिसे घामाचा प्रताप.!

येता पहिला पाऊस
वारा भरे दान असं
रानी वनी हिरवळ 
तेव्हा ओठी भरे हसं.!

©Sarita Prashant Gokhale शीर्षक:- पहिला पाऊस

येता पहिला पाऊस
देतो मनाला गारवा,
सृष्टी सजताना सारी
शालू नेसते हिरवा.!

येता पहिला पाऊस

Sarita Prashant Gokhale

देवराज प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले त्या भ्रमात चालता अभंग फार गायले कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले माउलीस गातगात पंढरीस गाठले दे #मराठीकविता

read more
देवराज 

प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले
त्या भ्रमात चालता अभंग फार गायले
कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले
माउलीस गातगात पंढरीस गाठले

देवराज विठ्ठलास एकदा विचारले 
संकटात पामरास का असेच टाकले 
का तुझ्या मनातले असेल प्रेम आटले
तू मलाच सांग आज साकड्यात टाकले

एक नाम अंतरात मी सदैव जोडले
मंदिरात कीर्तनात तेच नाम ऐकले
दर्शनात मी समोर एक रूप  पाहिले 
जीवनात मायबाप विठ्ठलास मानले

सत्व तोच पाहतो असाच खेळ मांडतो
पुण्यवान लेकरास आसपास वाटतो
साद घाल विठ्ठलास तोच फक्त ऐकतो
पंढरीत एक देव या जगास तारतो

©Sarita Prashant Gokhale देवराज 

प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले
त्या भ्रमात चालता अभंग फार गायले
कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले
माउलीस गातगात पंढरीस गाठले

दे

Sarita Prashant Gokhale

आनंदकंद गागालगा लगागा गागालगा लगागा गुंतून मी कधीही पडले कशात नाही सोडून दुःख माझे मी बंधनात नाही माझी पवित्र काया झिजवून तूच घेशी #मराठीशायरी

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

सुमंदारमाला लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे अता जीवनाची निराशा पळ #मराठीकविता

read more
सुमंदारमाला

लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा


तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे
अता जीवनाची निराशा पळाली तुझ्या भोवताली सुखाच्या सरी
सख्या घेत आहे तिथे मी उभारी, सुखाच्या दिशेने मनाशी जुळे
दिशा धुंद झाल्या पुन्हा सांजवेळी वितळले सख्या मी पुन्हा अंतरी 

तुला हाक देता मला साथ दे तू हवा धुंद झाली निशा रंगली
नको दूर जाऊ अशा संधिकाली तुझ्या प्रेम वाटेत मी साजिरी
तुलाही मलाही मनी ओढ वाढे इशारे नशीले तनू दंगली
खुले ठेव डोळे शराबी नशीले मनाच्या प्रितीची कळी लाजरी

नको आठवाया विषारी शहारे नसे शांतवाया ठसे राजसा
छुप्या अंतराला तुझ्या जाणते मी नको आठवू त्या जुन्या तू व्यथा
बसावी नव्याने घडी मोडलेली करू पावलांची सख्या चाकरी
तुझ्या जीवनाच्या प्रवासामधे मी मला सांग साऱ्या मनीच्या कथा

©Sarita Prashant Gokhale सुमंदारमाला

लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा


तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे
अता जीवनाची निराशा पळ

Sarita Prashant Gokhale

वृत्त -- भुजंगप्रयात लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा तुझा स्पर्श होताच मी धूप झाले तसे दुःख सारेच का चूप झाले मिळाली मला सावली अंबरा #मराठीशायरी

read more
वृत्त -- भुजंगप्रयात

लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा

तुझा स्पर्श होताच मी धूप झाले 
तसे दुःख सारेच का चूप झाले

मिळाली मला सावली अंबराची 
अता जीवना मी तुझे रूप झाले

नको वाटते सात्वंना मज कुणाची 
जिथे वार सारेच गुपचूप झाले 

विखारी क्षणाला कुणी पास नव्हते
मनाचे तिथे हालही खूप झाले 

कशी दृष्ट काढू अशा मी घराची
जिथे सौख्य माझेच विद्रूप झाले

सरिता प्रशांत गोखले
रत्नागिरी

©Sarita Prashant Gokhale  वृत्त -- भुजंगप्रयात

लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा

तुझा स्पर्श होताच मी धूप झाले 
तसे दुःख सारेच का चूप झाले

मिळाली मला सावली अंबरा

Sarita Prashant Gokhale

वृत्त:-प्रभाव लगावली:- लगालगा,लगालगा,लगालगा, लगा असाच एक चेहरा मनास वाटला मला जगात देव ही उदास वाटला मनातल्या मनात मी मलाच शोधते #मराठीशायरी

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

भल्याबुऱ्या त्या क्षणास साऱ्या विसरत आले आज इथे मी ओठांमधल्या हसण्यासाठी जीवन झाले होते जखमी वास्तवातल्या आधाराला शोधत होते मी साऊली आयुष्या #मराठीशायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile