Find the Latest Status about तुकाराम अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुकाराम अभंग.
balaji boinwad
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥ गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥ विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥ तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥ © balaji boinwad #तुकाराम गाथा अभंग
balaji boinwad
तुकाराम महाराज अभंग!!१!! समचरण दृष्टि विटेवरी साजिरी! तेथे माझी हरी वृत्ती राहो!!१!! आणिक न लगे मायिक पदार्थ! तेथे माझे आर्त नको देवा!!२!! ब्रह्मादिक पदे दु:खाची शिराणी। तेथे दुश्चित झणी जडो देसी!!३!! तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म!जे जे कर्मधर्म नाशवंत!!४!! © balaji boinwad #तुकाराम महाराज अभंग
Rajendrakumar Shelke
*तीर्थ देहू!तीर्थ तुकाराम* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 तीर्थ तुकाराम, क्षेत्र तुकाराम ! देहू विठ्ठल,इंद्रायणी विठ्ठल !!१!! भाव विठ्ठल, भक्ती विठ्ठल ! कुळ विठ्ठल, गोत्र विठ्ठल !!२!! अभंग विठ्ठल, प्रवचन विठ्ठल ! कळस विठ्ठल,पायाही विठ्ठल!!३!! तुका म्हणे देहू,विठ्ठल सापडला! इंद्रायणी तिरी, गाथा पांडुरंगा!!४!! येता गरुड पक्षी माझ्या तुका साठी! करी वैकुंठगमन सदेह घेऊनी !!५!! झाली इंद्रायणी आज पुण्यभूमी! करी भजन आता ज्ञानदेव तुकाराम!!६!! आठवांची लय तुकाराम बिजेला! भक्त जाई रंगून नाम जयघोषात!!७!! तीर्थ तुकाराम, क्षेत्र तुकाराम ! देहू विठ्ठल,इंद्रायणी विठ्ठल !!१!! ----------------- ✍️ राजेंद्रकुमार शेळके. -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke तुकाराम बीज
vaishali
🙏🏼 मनमंदिरात 🙏🏼 मनमंदिरात | तूच आहे देवा || सांग कुठे ठेवा | पुण्याईचा ||१|| कर जोडुनिया | तुला विनविते || साकडे घालते | पायी तुझ्या ||२|| सुखी ठेव साऱ्या | मागते मागणे || आहे हे सांगणे | तुजपाशी ||३|| कीर्तनाचा नाद | भक्तीचा सुंगध || दरवळे गधं | चोहीकडे ||४|| तूच तार साऱ्या | तोड मोह जाळ || साऱ्यांचा संभाळ | कर देवा ||५|| 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 # अभंग #
Mohan Somalkar
लावियल्या ज्योती (अभंग) लावियल्या ज्योती ॥ डोळ्यात भक्तीच्या॥ हरी भजनाच्या ॥ पांडुरंगा॥१॥ आळवितो तुला ॥ भक्तीत रंगतो॥ अभंगातुनि गातो॥ नाम तुझे॥२॥ दया, क्षमा,शांती ॥ तुझ्या ठायी भेटे॥ चित्त शांत वाटे ॥ तुझ्या ठायी॥३॥ नको राग -द्वेष ॥ नको मनी क्रोध ॥ भजनातुनी बोध ॥ घेऊ दे रे॥४॥ मन माझे लागे ॥ धावे तुझ्याकडे॥ गावया आवडे॥ गीत तुझे॥५॥ हरी मुखे म्हणा॥ झेंडा हाती धरा॥ पहाट प्रहरा ॥ नाम घ्यावे॥६॥ एक तरी ओवी॥ रोज म्हणा घरी॥ हरीपाठ दारी॥ नित्यदिनी॥७॥ मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar #अभंग
Mohan Somalkar
ऑडिओ- उपक्रम अभंग -४ ( एकादशी) ज्ञानीयाची वाणी॥ आणा आचरणी ॥ आनंद गगनी ॥ धावघेई॥१॥ मनन चिंतन ॥ अध्याय प्रत्येक ॥ पान ऐकऐक॥ करा नित्य॥२॥ मराठीची जाण ॥ भाषेचा सन्मान ॥ बाळगुया मान ॥ सदा मनी॥३॥ आज एकादशी ॥ उद्याची द्वादशी ॥ पुजुया तुळशी ॥ आज उद्या॥४॥ मोहन सोमलकर नागपुर ©Mohan Somalkar # अभंग