Find the Latest Status about महाविद्यालयातील पहिला दिवस निबंध मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महाविद्यालयातील पहिला दिवस निबंध मराठी.
Vaishali
शाळेचा पहिला दिवस पहिल्या दिवसाचा आठवतो तो शाळेचा क्षण, नवीन माझी शाळा बघण्यासाठी आतुर झाले होते मन. मनात होती थोड़ी भीति, खुप जुळणार होती नवीन नवीन नाती. आतुरता झाली होती शाळेची पाहण्याची वाट, अस झाले होते कधी लवकर होईल पहाट. सकाळी उठून आईने डब्यात दिला छान खाऊ, आई बोलली चागला अभ्यास कर माऊ. शाळेत पाय ठेवताच डोळे इकडे तिकडे लागले भीरभीरुन, आनंदाने उडी मारली आमचा नवीन वर्ग पाहुन. वर्गात झाउन बसली खाली, पहील्या तासाला आमची मराठी ची बाई आली. झाली मधली सुट्टी दुपारी, एकत्र मिळून जेवण करू लागली सगळे पोर आणि पोरी असे सगळे संपले तास, शाळेचा पहिला दिवस होता खुप खास. कोण येत कोन जाते बगायचो खिड़की तुन डोकुन, आजही चेहऱ्यावर हसु येते शाळेचे दिवस आठवून शाळेतुन घरी जाताना दुसऱ्या दिवसाचा विचार येऊ लागला, शाळेचा पहिला दिवस मनात कायम स्वरुपी राहिला. vaishali navale शाळेचा पहिला दिवस 😘
शाळेचा पहिला दिवस 😘
read moreVarpe Pandhari
मराठी आहोत आम्ही.....! शिवरायांचे मावळे आम्ही नाही आता झुकणार, आई जिजाऊंचा आशीर्वाद पाठीशी नाही आता मागे हटणार. संतांची भूमी पराक्रमाची जननी हाती तलवार खांद्यावर सासनकाठी , सह्याद्रीच्या कणाकणात प्रत्येकाच्या मनामनात घुमते धन्य ती आमुची मराठी....! अभिमान नाही तर गर्वच आहे मला मी मराठी असल्याचा, युगपुरुषांच्या जन्मभूमीत महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचा. साखरेसारखे गोड पण सिंहासारखे लढतो रोमरोमात दिसते ध्येयाची चिकाटी, माणसातील माणुसकीपण मोठेपणाने जपतो धन्य ती आमुची मराठी...! भगवे आमचे रक्त , भगवी आमुची ओळख, नाद कराल आमचा करू दुनियेतील गडप. आता फक्त एकच ध्यास भगवा झेंडा पुन्हा फडकवू, जाती-धर्म,जात-पात मोडून त्यांना पायाखाली तुडवू. करुनि कष्ट खाऊन भाकर गाठू यशाचा कळस , मराठी आहोत आम्ही हीच आमुची खरी ओळख..! आता तख्तासाठी नाही लढू फक्त रक्तासाठी आपल्याच माणसांच्या न्याय आणि हक्कांसाठी , हर हर महादेव , भवानी मातेचा करुनि न्यारा होऊनि पुन्हा एकत्र बदलून टाकू महाराष्ट्र सारा. कपाळी कुंकू डोक्यावर मखमली पदर दारी असते सौभ्याग्याची तुळस , मराठी आहोत आम्ही हीच आमुची खरी ओळख.....! नाही चालणार आता मनमानी अन्यायालाही आत्ता थारा नाही , छत्रपती शिवराय हेच आमुचे मुखी दुसरे नावाचं नाही. जरी वाहिले रक्ताचे पाट तरी आता घाबरायचे नाही , पुन्हा एकदा नव्याने उभारू आपल्या स्वराज्याची उंच गुडी. आमच्या सांडलेल्या रक्तातही दिसणार नाही आता काळोख, मराठी नाही तर गर्वाने महाराष्ट्रीयन हीच आमची खरी ओळख....! Pandhari Varpe 8698361992 ©Varpe Pandhari मराठी दिवस
मराठी दिवस
read moreजगदिश पुंडलिक भोईर
माय मराठी माझ्या मराठी भाषेचा गजर वाजूदे डंका तिचा जगभरात माझ्या मराठीचे बालने घराघरात अस्तीव तिचे दरवळूदे उराउरात माझ्या मराठीचे बोल भिडूदे गगनात वाहूदे झरे तिचे माणसाच्या मनामन मी बोलतो मराठी मी लिहितो मराठी मी बोलवितो मराठी मी जोडतो मराठी माझा मान मराठी माझी शान मराठी माझे ज्ञान मराठी माझा प्राण मराठी उत्तुंग मनाचा शेंडा फडकूदे मराठी झेंडा ताठ मानेने उंचवू हाती भगव्याचा दांडा भाग्य आम्हास आज बोलतो मराठी कवीसूर्य कुसुमाग्रजांस समर्पित,आदरांजली मराठी @ श्री. ज. पुं. भोईर.* ©जगदिश पुंडलिक भोईर मराठी भाषा दिवस
मराठी भाषा दिवस
read moresahil tayde
मराठी ही आमची फक्त भाषा नाही तर आमचा अभिमान आहे, मराठी ही आमची फक्त भाषा नाही तर आम्हाला भेटलेल वरदान आहे. मराठी भाषा महाराष्ट्रचीच नव्हे तर पूर्ण भारताची शान आहे, मराठी भाषेच्या एका एका अक्षरात आमचा प्राण आहे. मराठी भाषा हीच आमची प्राण आहे, मराठी भाषा ही आमच्या जीवनाचा आधार आहे, मराठी भाषेचा आमच्यामुळे नाही तर मराठी भाषे मुळे आमचा सम्मान आहे, म्हणूनच विश्र्वभरात मराठीचा जयजयकार आहे. - साहिल तायडे ©sahil tayde जय मराठी 🙏🏻 मराठी राज्यभाषा दिवस #WallTexture
जय मराठी 🙏🏻 मराठी राज्यभाषा दिवस #WallTexture
read morebalaji boinwad
भाषा देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!! हत्यार बुद्धीचे! या जीवनी!! भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!! ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!! ©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी
मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी
read moresomnath gawade
शालेय जीवनात "मी मुख्यमंत्री झालो तर".. हा निबंध नसता तर आज हा सत्तासंघर्ष उद्भवलाच नसता. #निबंध