Nojoto: Largest Storytelling Platform

New पावसात खेळणारी मुले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पावसात खेळणारी मुले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पावसात खेळणारी मुले.

Stories related to पावसात खेळणारी मुले

    LatestPopularVideo

Vilas Bhoir

पावसात भिजतना

read more
पावसात भिजताना 
मज गारवा छळतो
सोबत नसताना तु 
मी एकट्यात असतो

बरसल्या धारा जरी
आज अंगणात माझ्या
आठवात प्रिया तुझ्या
मी अजुनही रमतो

किती आले अन् गेले
असे बरसून पावसाळे
तरीही त्याच दिवसांना
मी कित्येकदा स्मरतो

वेधांळलेल्या मनाला 
तुझाच एक सहारा
म्हणून सारखा प्रिये
मी तुझ्यातच रुजतो

बरसला कुठेही जरी
हा रिमझिम पावसाळा
जिथे भेटलो तिथेच 
मी पावसात भिजतो

©Vilas Bhoir पावसात भिजतना

Walden_Raj...

Vaidehi gadgil

फुलासारखी मुले।।।।। #Quote

read more
कोमेजून जाण्याआधी त्याना प्रेम द्या।।।। 
फुलांमध्ये आणि मुलांमध्ये इतकासा फरक नसतो।।।। फुलासारखी मुले।।।।।

प्रकाश साळवी

# कोसळणाऱ्या # पावसात

read more
कोसळणाऱ्या पावसात
आपण चिंब भिजावं
आणि आपल्या मनाला
पण चिंब चिंब भिजवावं
**
ओल्या ओलेत्या वसनात
मनसोक्त वावरवं 
तीच उर्मी घेऊन
एक गच्चं "आलिंगन" द्यावं
**
कोसळणाऱ्या पावसात येऊ देत 
उधाण आपल्या प्रीतीला
तोच तोच गारवा घेऊन
विसरू या रीतीला
**
प्रकाश साळवी
०१/०६/२०२०
सकाळी ०९:०१ # कोसळणाऱ्या # पावसात

Abhay Mohod

पावसात भिजण्याचे.... #poem

read more
तू नसताना राहीले नाही
भान ऋतु बदलण्याचे,
यावर्षी ही राहून गेले
पावसात भिजण्याचे

चेहर्‍यावरती येऊन पडावे
सडे थंडगार पाण्याचे,
त्यावेळी ही स्मरण व्हावे 
तुझ्या बेधुंद हास्ण्याचे

का वाटावे भय मनाला
मुसळधार पाण्याचे,
का वाटावे अप्रुप जीवाला
मुकाट रिमझिमण्याचे

अजुनही आहे वाट्यास माझ्या
झोपेत जागण्याचे,
कधी संपेल कार्य तुझे
हे मला दुखावण्याचे

लागे वेध पुन्हा मनाला
नव्याने जगण्याचे,
पण तरीही ना होई धाडस
तुला विसरण्याचे
 पावसात भिजण्याचे....

Swapnil Bambole

रिमझिम पावसात तू

read more

अत्रंगी रे...!!!

Akash Kothadia

तू भिजलीस पावसात अनं ..... !!

read more

viraj gosavi

कोकणात भर पावसात फणस...! #मराठीविचार

read more

vaishali

रिमझिम पावसात (अष्टाक्षरी कविता)

read more
🌹रिमझिम पावसात🌹

रिमझिम पावसात
असे हात तुझा हाती 
पावसाच्या येण्याने ही
सुगंधित झाली माती

गोरे गोरे रूप तुझे
पावसात ग भिजले
पावसाच्या थेंबानी हे
तुझे यौवन सजले

पसरला हा गारवा
मिठी तुझी उबदार
लाज लाजुनी झालीस
सखे तू ग चुर चुर

लाजू नकोस ग प्रिये
अशी जवळ ये माझ्या 
मकरंद टिपू दे ग
सखे ओठातला तुझ्या

नको करुस बहाणे
होऊ एकरूप आज
तुही घाल आज सखी
माझ्या मिठीचा ग साज रिमझिम पावसात (अष्टाक्षरी कविता)
loader
Home
Explore
Events
Notification
Profile