Find the Latest Status about marathi kavita grace from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi kavita grace.
kavi Aniket Dabhade
9579027461 ©kavi Aniket Dabhade #marathi #मराठीकविता
Pearl Prachi
Gratitude & Grace for Glory ©Pearl Prachi grace #Grace #gratitude #glory #Life
Rashi
White अपुऱ्या कविता तुझ्यासाठी लिहलेल्या कित्येक कविता आजही राहिल्या आहे त्या अपुऱ्या चल भेटून आपण पुन्हा एकदा त्या अपुऱ्या कवितांना पूर्ण करूया मनात कोंडलेल्या त्या भावनांना चल आज शब्दांमध्ये फिरुया एक एक शब्दाला हळुवारपणे तळहातावर उचलून आपण ठेऊया रुसवे फुगवे हसू सगळं कही चल आपण शब्दांना सोबत मांडूया आणि शब्द मांडता मांडता एक मेकांना समोर ठेऊन भांडूया कवितेच्या अर्धवट ओळींना घेऊन चल ना गं आपण एकदा भेटूया तुझ्यासाठी लिहलेल्या कवितांना चल आज खरंच पूर्ण करूया तुझी माझी ओळख खरं तर ह्या कविते पासूनच आहे म्हणून ह्या अपुऱ्या कवितेंना आजही माझ्याकडे जपूनच आहे ©Rashi Apurya Kavita #Aathwani #athwan #MarathiKavita #marathi #kavita #emotional #RakeshShinde
kiran
White पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर, झेलणारा तितकाच 'आपलासा' असावा लागतो. ... .. ©kiran #ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience
Amita
Village Life लेखणीतूनी ...... वाटे मजला सारखे, पुन्हा पुन्हा जगावे प्रेम करावे शब्दांवर, अन् सुरात गीत गावे.... खळखळ जळात, पावले उसळून घ्यावी मंजुळ गाणी गळ्यात, प्रीतीची गावी.... व्योमात विहंगथवा, एकटक बघावा मोगरा कधीतरी, केसात सजवावा.... आयुष्य इतुके सुंदर, डोळ्यात साठवावे काव्यात मनीच्या, उत्स्फूर्त प्रकट व्हावे.... अमिता✍️ ©Amita #marathi #MarathiKavita
Amita
राधा -- मुरारी कुठे लोपला नाद वेणुचा कुठे हरपला वास हरीचा विरून गेली कुठे निळाई शोधून थकले ठाई ठाई गोकुळीचा श्रीरंग सखा हरवलास तू कुठे असा लपंडाव नको रे सारखा कासावीस झाली राधिका तेथूनी आली हाक अंतरी वास असे हरीचा चराचरी वृथा जाहली कळकळ सारी साक्षात उभा श्याम मुरारी.... अश्रु ओघळे गालावरती रास रंगला राधेसोबती विसरून मीपण भान हरपती मीपण नुरले गोकुळीच्या धरती.... अमिता🌸✍️ ©Amita #Kanha #marathi