Nojoto: Largest Storytelling Platform

New मनातील भावना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनातील भावना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनातील भावना.

    PopularLatestVideo

D S

मनातील भावना

read more
जेव्हा तु माझ्या वर रागवून...
तुझे गोरे-गोरे गाल लाल-लाल करते ना ??
तेव्हा तो रंग जास्त शोभतो तुझ्या वर !!! मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
प्रयत्नांची सिडी लांबलचक असली की?? 
यशाची गाथा ऐकणार्यांच्या शरीरात 
ऊर्जा संचार करू लागते!!! मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
ज्यांना कळते...
भावनांचे गांभीर्य.... 
तेच खुलवतात कागदाचे
 सौंदर्य!!! मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
स्थिर वाहणारा समुद्र नेहमीच भावतो .......
एक वेगळीच जवळकी भासते..  
पण याचा विचार कोणीच करत नाही की???
खळखळणार्या सागरा पेक्षा ?????
स्थिर दिसणाऱ्या सागराची खोली मापने कठीण असते..
तसेच काहीसे मनुष्याचे देखील तसेच असते...
मनुष्य भलेही शरीराने शांत दिसु द्या?????    
पण मनुष्याचे मन कधीही स्थिरस्थावर नसते ...
शांत दिसणारा मनुष्य जगाशी अलिप्त राहून  
एका वेगळ्याच जगात स्वता; स्वता;च्या 
मनाशी झुंज देत असतो ...
मनातील विचारांचे थैमान आणि
 प्राणघातक प्रश्नांचे वार
 मुक्या बोलाणे सहन करत असतो... 
 हि झुंज किती वेदनादायी 
आणि प्राणघातक असते ...
हे सांगने अथवा त्याचे अनुमान लावणे देखील ...
कठीण असते!!!!! मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
तुझ्या आगमनाने सारा 
आसमंत फुलला...
अन् 
माझ्या वेड्या मनाला 
तुझा मोह न टळला!!! मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
भाकरीच्या तुकड्या साठी किती हा संघर्ष??
पोटाचे खळगे भरण्यासाठीचे अतोनात प्रयत्न .....
आयुष्याच्या या चक्रात समाजाकडून होणारी अवहेलना......
तरी आमची जगण्यासाठीची धडपड ...
भाकरीचा तुकडा मागतो???
 पण ..
अपमानास्पद शब्दांचे वार, तुच्छ वागणूक देतात..
  पोटा साठी भाकरीचा तुकडा देणे मात्र टाळतात .
जगाची रितच निराळी ???
ज्यांची ओंजळ गच्च भरलेली आहे ...
त्यांचीच ओंजळ भरवणार...
आणि 
ज्यांची ओंजळ रिकामी आहे ...
त्यांची रिकामीच ठेवणार!!!! मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
मनाची घुसमट झाली की ???
मनाच्या गाभाऱ्यात अगणित अनपेक्षित 
प्रश्नांच्या जोलामुखीचा उद्रेक होतो....
शांत मनाला नकळत विचारांची परिसीमा ओलांडण्यास भर पडतो  ......
मग रंगते भावनांची मैफिल...
हृदयाचे बंद कावड उघडते...
    आठवणींचे ओसाड माळ रान अलगद बहरते....
मग झुरते,भांडते,स्वता;लाच कोसते, 
भावनांच्या मैफिलीत रंग भरणारे अश्रू .....
पापणी ओलांडून गालावर ओघळतात...
तेव्हा कोठे जोलामुखी शांततेचे रूप धारण करते!!!!

@ekshabdvedi मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
***मन***
भावभावनांचे अगणित रंग मनात 
उधळतात....
किती चंचल असते ना हे मन ???
बुद्धीला हुलका देऊन भिरभिरणार्या पाखरा प्रमाणे रमतगमंत फिरते ....
फिरता-फिरता भूतकाळात डोकावते ....
अलगद जुन्या जखमांवरील खपली काढते.....
 तर कधी....
 भविष्यकाळात जाऊन असंख्य स्वप्न रंगवते.......
मनाचे चोचले पण निराळेच .....
जे मिळत नाही ???
तेच तर हवे असते मनाला .....
कठीण कहाणी आहे न दिसणाऱ्या
मनाची!!!!!! मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
सातत्याने वाटते मनाला????
कोठे तरी दुर जावे...
अनोळखी जगात जावून विसावा घ्यावा..
तेथे आठवणींचे माळ रान ओसाड असावे...
एक छोटेसे नंदनवन असावे .....
चंद्र,चांदण्या सोबतीला असाव्या...
तेथे वाट बघणारे,प्रेम करणारे कोणीही नसावे...
एका आनंदाच्या बोटीत स्वार व्हावे...
खळखळून हसावे..
मनसोक्त  जगावे...
असे कोठे तरी जावे
सातत्याने वाटते मनाला!!! मनातील भावना

D S

मनातील भावना

read more
टाळ,मृदुंग,हाती वीणा
मुखी अभंगाची वाणी...

तुझ्या सावळ्या रूपात गुंतले
तुझ्या चरणी मी झुकले...

चंद्रभागेत नाहले 
तुझ्या भक्तीत मी वाहिले ...

तुझ्या जयघोषात रंगले 
भक्तीच्या सागरात मी दंगले...

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा
अंत:करणानी केली तुझी सेवा...

तुझाच हेवा,तुझाच ठेवा मजला
भाव अंतरी भक्तीचा पुजला !!! मनातील भावना
loader
Home
Explore
Events
Notification
Profile