Find the Best मनात Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutरिपब्लिक डे क्यों मनाते है, मनाते है, बर्बादियों का जश्न मनाता चला गया, बर्बादियों का जश्न मनाता चला, मनाते meaning in english,
अश्लेष माडे (प्रीत कवी )
कधीकधी मनात खूप काही साठलेलं असतं, आणि तेच लिहावंसं पण वाटतं, पण, मन कुठल्या गुंत्यात गुंतलेलं असतं कळतच नाही मला, लिहायला बसतो तर, पेन पुढे वळत नाही, कागदावर पेन आणि शब्दांचा मेळ चं जुळत नाही. मनात काहूर माजलेला असतो तेव्हा शब्द पण आठवतात, पण ओळ च पूर्ण होत नाही, शेवटी ठेवतो बाजूला पेन आणि डायरी बसतो हनुवटीवर हात ठेवून, एकटाच विचार करत, असं का होते? हेच कळत नाही.... प्रीत
Keshav Suryavanshi
माझे मत-- माझे विचार मित्रांनो,ज्या व्यक्तीच्या मनात अभिन्न भावना असते- ती व्यक्ती सुबुद्धीवंत असते आणि जिच्या मनात भिन्नत्वाची भावना असते- ती व्यक्ती कुबुद्धिची असते.अॅड के.एम.सूर्यवंशी
अश्लेष माडे (प्रीत कवी )
#OpenPoetry कधी -कधी मनात असलेलं पण बोलायचं राहून गेलेलं, सगळं बोलून टाकावं आणि मनातलं ओझं हलकं करून घ्यावं. कुणाशी लपवून किंवा मनातल्या मनात ठेवून काय होणार? वेळ निघून गेली की, आपल्या भावनांना आज जिथे जागा मिळू शकते कदाचित उद्या तिथे जागा मिळणार की नाही हे कोण सांगू शकतो. वेळ बदलते, त्याबरोबर माणसे बदलतात आणि मग त्रास आपल्याला होतो. प्रत्येक व्यक्ती डोळे वाचू शकत नाही, चेहरा बघून भावना समजू शकत नाही. म्हणून अशावेळी आपलं व्यक्त होणं गरजेचं असतं. आपल्या भावना ज्याला सांगायचे आहे किमान त्याला तरी ते सांगून टाकावं. आणि मोकळं होऊन जावं, कारण, आयुष्यभर ते ओझं मिरवण खूप कठीण असतं. वेळ निघून गेल्यावर खूप पच्छाताप होतो. नंतर असं वाटते की, तेव्हा सांगितलं असतं तर बरं झालं असतं.. (प्रीत )
अश्लेष माडे (प्रीत कवी )
देव नाही गं मी तुझ्या मनात काय आहे ते ओळखणार, कारण, मी मनकवडा नाही, बऱ्याच गोष्टी तू मनात कोंडून ठेवतेस मला सांगत पण नाही आणि हेच मला पटत नाही, अगं सहजासहजी खरं प्रेम कुणालाही मिळत नाही, तुला मिळतंय तर, ते तुला काळत नाही, सांग ना तू मला का गुंतवून ठेवतेस आपल्या मनातलं का तू सांगत नाही, तुझा माझ्यावर विस्वास नाही? अगं खरं प्रेम करतो तुझ्यावर तुला काळात कसं नाही.. (प्रीत )
Keshav Suryavanshi
#OpenPoetry माझे मत -- माझे विचार. मित्रांनो, आपल्या मानवी मस्तीष्कात ,प्रत्येक क्षणाला जे विचार येतात- त्यात१००% पैकी १ ते २ टक्के नकारात्मकता असावी. त्यामुळे आपल्या मनात पर्यायी व्यावस्था निर्माण झालेली असते. समजा, आपणास डाॅक्टर व्हायचे आहे,त्यासाठी आपणास १२ वीत ९०% पेक्षा जास्त गुण हवेत ही सकारात्मकता आपल्या मनात येते.अपवादात्मक परिस्थितीत तेवढे गुण न मिळाल्यास,आपले मानसिक संतुलन बिघडते.अशावेळेस नकारात्मकतेत निर्माण केलेली पर्यायी व्यवस्था कामाला येते.अॅड.के.एम.सूर्यवंशी
अश्लेष माडे (प्रीत कवी )
बोलत ती ही नाही बोलत मी ही नाही, निशब्द ती ही निशब्द मी ही, वाट ती पण बघते वाट बघतो मी ही, मनातलं मनात ठेवते ती, ते शब्दात उलगडतो मी, नातं ती पण जपते नातं जपतो मी ही, भावना तिला ही आहेत भावना मला ही, भावना व्यक्त करतो मी, भावना लपवते ती, आंतरिक आमचं प्रेम जपते ती ही जपतो मी ही, दिवस संपतो रात्र ही संपते, मनात असतं बोलायचं खूप, पण अबोल असतं सगळं काही..... (प्रीत ) अबोल सगळं काही
अबोल सगळं काही
read moreRashi
मनात तुझ्या माझ्या असण्याची मनात तुझ्या माझ्या असण्याची ती जागा मी शोधत आहे आणि तू जवळ नसण्याचे दुःख भोगत आहे…. वाटलं होतं मनात तुझ्या माझ्या असण्याची जागा असेल तुझ्या माझ्यात गुंफलेला तो प्रेमाचा नाजूक धागा असेल पण असं काहीच नव्हतं माझ्यासाठी तुझ्या मनात आणि जेव्हां हे कळलं तेंव्हा सगळंच संपुन गेलं क्षणात मग वाटलं माझ्याशिवाय जगतांना कधीतरी तुला माझी आठवण येणार आणि आठवणींच्या लाटेवरी तु ही माझ्यासारखी भिजणार आयुष्याच्या वाटेवर चालताना कधीतरी तुझे पाय अडखळतिल आणि ते अडखळलेले पाय कधी न कधी माझ्याकडे वळतील बस त्याच एका आशेवरती मी आता जगत आहे मनात तुझ्या माझ्या असण्याची ती जागा मी शोधत आहे -राकेश शिंदे rakeshkavita.blogspot.in मनात तुझ्या माझ्या असण्याची #marathikavita #marathipoem #marathiquote #marathipoetry #Nojotomarathikavita #Nojotomarathipoem #NojotoPune #rakeshshinde
मनात तुझ्या माझ्या असण्याची #MarathiKavita #Marathipoem #marathiquote #marathipoetry marathikavita #NojotoMarathiPoem #nojotoPune #RakeshShinde
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited