Find the Latest Status about पहिला पाऊस कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहिला पाऊस कविता.
avinash atkad
#DearZindagi "तु बरसत रहा असाचं, मी भिजत असेल, सोबत 'ती' ही असेल, सोबत मी ही असेल, तुझा पहिला थेंब मी अलगद हातावर टिपेल, तुझ्या चिंब बरसणा-या सरींमध्ये मी न्हावून निघेल, सोबत 'ती' ही असेल, सोबत मी ही असेल, तु बरसत रहा असाचं, मी भिजत असेल, प्रेमाचे गीत जोमाने वाजत असेल, दोन्ही मनाच्या तारा त्यावर गुणगुणत असेल, सोबत 'ती' ही असेल, सोबत मी ही असेल, तु बरसत रहा असाचं, मी भिजत असेल, आमच्या पहिल्या पावसाचा किस्सा असा काही असेल, तो सदैव आमच्या स्मरणात बसेल, सोबत 'ती' ही असेल, सोबत मी ही असेल, तु बरसत रहा असाचं, मी पुन्हा एकदा भिजत असेल... 😘😘 -Gattu- 😘😘😍 (मुंबईत पहिल्या पावसाचे जोरदार आगमन) #पहिला पाऊस , पहिली कविता..
Kailas Tidke
असा कोणताही पाऊस मृदगंध निर्माण करत नसतो.. तोच करतो जो पहिल्यांदा हृदयात मुरतो.. ®कैलास #पहिला पाऊस
Saniya Mujawar
पहिला पाऊस पहिल्या पावसाची सर येते. सर्वांग चिंब करून जाते. ओल्या मातीचा गंध येतो. मन बेधुंद करून जातो. वाऱ्याची झुळूक अचानक येते गत आठवणींना उजाळा देते. सारी सृष्टी नवतरूनी सारखी सजते. जणू काय ती हिरवळीचा शालुच परिधान करते. वेली ना बहर येतो. झाडावर मोहर पसरतो. हिरव्यागार तृण च्या शालिवर . मयुर पिसारा फुलवून नाचतो. वारा घळतोसद, झुळझुळ झऱ्यांचा आवाज. मन माझे बेधुंद होऊन, नाचत पावसात. पहिला पाऊस
Devanand Jadhav
मृगाच्या शिडकाव्यात गंध मातीचा येई पहिल्याच पावसाने धरणी धुंद होई ✍🏻 •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav पहिला पाऊस
somnath gawade
बहुप्रतीक्षेची घटका संपता.. धरणीस मिलण्या आतुरलेला थेंब नभाचा अन प्रेमी युगा-युगाचा नवचैतन्याची उर्मी घेऊन नवोन्मेषाचे अंकुर फुलविण्या मेघराज तो राजन सृष्टीचा आला आला प्रियतम माझा मृदगंधाची अत्तर लेऊन उभा राहिला जणू विठ्ठल राजा धरणीचा रोमांचित होई कण-कण आनंदाचा आज हाच तो एक क्षण... सोमचंद्र पहिला पाऊस
Dr Mangesh Kankonkar
तुझ्या माझ्या सारखा तो पण आसुसलेला सर्वांच्या भेटीसाठी , कधी अनुभवला का त्याचा खोडकरपणा , कधी वाटले का त्याला पण खुप ओरडावे , कधी अंदाज लावला का त्याच्या वेडेपणाचा , कधी हसलात का त्याच्या हसण्यासोबत , कधी त्याला मिठीत घेतले का प्रियकरा सारखं , हो तोच तो तुमचा माझा आपल्या सर्वांचाच लाडका , पहिला पाऊस !!!!! -मंगेश काणकोणकर. पहिला पाऊस