Nojoto: Largest Storytelling Platform

New माझिया प्रियाला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझिया प्रियाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझिया प्रियाला.

    PopularLatestVideo

Vilas Bhoir

माझिया अंगणी सुखाचा मोहर....... #poem

read more
मायेच्या मातीत रुजलेलं घर
आभाळाची छाया घालते पांघर 
तुळशीचे रोप शोभते सुंदर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

जाई जुईसवे मोगऱ्याची वेल
सुगंधी फुलांनी भरावी ओंजळ
उधळूणी गंध जाय नभपार
माझिया अंगणी सुखाचा मोहर

सांजवेळी रोज लागतसे दिप 
सदनाचे माझ्या मोहक हे रूप 
अनमोल सौख्य नांदते अपार 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

नवख्या नात्यांची प्रीत उंबऱ्यात
जपलेली आहे संस्कारांची ज्योत 
पाहुनिया वाटे नवासा प्रहर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

नजरेत सारे ओळखीचे झाले 
मनातले शब्द ओठांवर आले 
अंगावर येते वाऱ्याची फुंकर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

                     कवी - विलास भोईर 
                    ( माझिया अंगणी सुखाचा मोहर )

©Vilas Bhoir माझिया अंगणी सुखाचा मोहर.......

Kunal Salve

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे माझिया मना, जरा थांब ना... #जराथांबना ही ओळ कवी सौमित्र यांच्या कवितेची आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
माझिया मना, जरा थांब ना
नाहीत उरल्या आता प्रेमाच्या भावना 
नशिबाचा खेळ असतो रे सारा 
कोण कोणाचा नाही इथं,
तु एकदा मला तर पाहाणा ! शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
माझिया मना, जरा थांब ना...
#जराथांबना
ही ओळ कवी सौमित्र यांच्या कवितेची आहे.
#collab #yqtaai

pooja d

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे माझिया मना, जरा थांब ना... #जराथांबना ही ओळ कवी सौमित्र यांच्या कवितेची आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
माझिया मना, जरा थांब ना
सतत त्याच्याकडे धावत जाऊ नको ना ।।

 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
माझिया मना, जरा थांब ना...
#जराथांबना
ही ओळ कवी सौमित्र यांच्या कवितेची आहे.
#collab #yqtaai

Atul Waghade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे माझिया मना, जरा थांब ना... #जराथांबना ही ओळ कवी सौमित्र यांच्या कवितेची आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
माझिया मना जरा थांब ना
घाल आवर वेडी प्रीत 
थांब जरा थांब ना..!

नको ते स्वप्न नको ती आशा
भंग होण्यावाचून त्याला थांबवना
हरविण्या अगोदर 
स्वतःला आवर घाल ना
माझिया मना जरा थांब ना....

ती प्रीत गोंड मीत 
खेचू लागे हवी हवीशी लागे
सांग ना त्याला 
ती ठेच समोर किती लागे
ढळण्या अगोदर मावळण्या अगोदर 
त्याला सांभाळ ना..
माझिया मना जरा थांब ना..!

-Atulwaghade



 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
माझिया मना, जरा थांब ना...
#जराथांबना
ही ओळ कवी सौमित्र यांच्या कवितेची आहे.
#collab #yqtaai

Atul waghade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे माझिया मना, जरा थांब ना... #जराथांबना ही ओळ कवी सौमित्र यांच्या कवितेची आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
माझिया मना जरा थांब ना
घाल आवर वेडी प्रीत 
थांब जरा थांब ना..!

नको ते स्वप्न नको ती आशा
भंग होण्यावाचून त्याला थांबवना
हरविण्या अगोदर 
स्वतःला आवर घाल ना
माझिया मना जरा थांब ना....

ती प्रीत गोंड मीत 
खेचू लागे हवी हवीशी लागे
सांग ना त्याला 
ती ठेच समोर किती लागे
ढळण्या अगोदर मावळण्या अगोदर 
त्याला सांभाळ ना..
माझिया मना जरा थांब ना..!

-Atulwaghade



 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
माझिया मना, जरा थांब ना...
#जराथांबना
ही ओळ कवी सौमित्र यांच्या कवितेची आहे.
#collab #yqtaai

Sarita Prashant Gokhale

काव्यप्रकार:- काव्यबत्तीशी काव्यलेखन वर्ण:-९/७/९/७ शीर्षक:-मोहरते लेखणी #rain #poem

read more
काव्यप्रकार:-
काव्यबत्तीशी काव्यलेखन 

वर्ण:-९/७/९/७

शीर्षक:-मोहरते लेखणी


रोज शब्दांच्या पूजेसाठी  
मोहरते लेखणी
गंधाळते माझिया हाती
पानावर देखणी   !!१!!

घेता लेखणीस समीप
भावना खुलवते
शब्दांसवे मनाची माझ्या
पालवी फुलवते    !!२!!

फुलवत नेई साहित्य 
पानोपानी येताना 
शब्द सारे दरवळती 
सजवून घेताना     !!३!!

सुटे सुवास साहित्याचा
लेखणीतून पानी 
येते कविता ओठांवर
गुणगुणते गाणी    !!४!!

होते शब्दांमुळेच जादू
यश ती उभारते 
लेखणी मोहरते अशी
साहित्यिक नाव कोरते  !!५!!

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा-सोलापूर
✍🏻

©Smita Dhonsale काव्यप्रकार:-
काव्यबत्तीशी काव्यलेखन 

वर्ण:-९/७/९/७

शीर्षक:-मोहरते लेखणी

Rashmi Hule

मेरे मन... जरा रुकना. विचारों को समेटना. सुख में तुम गुम नही होना दुख में निराश ना होना. अपेक्षा का परबत ना रचना. उसके तले दबकर जिवन खत्म हो #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जराथांबना

read more
माझीया मना थांब ना जरा
अवरुन घे विचारांचा पसारा
पाखरणीत सुखाच्या हूरळून
नको जाऊ... 
दुखाःतही वेड्या खचून नको जाऊ...
नको उभा करुस अपेक्षांचा डोंगर
होईल घुसमट तुझीच,जिवनाला लागेल घरघर
शांत ठेव स्वतःला,आत्मविश्वासाने वावर.. 
यश तुझेच आहे फक्त प्रामाणिकपणे कष्ट कर.. 
 मेरे मन... जरा रुकना. विचारों को समेटना. सुख में तुम गुम नही होना दुख में निराश ना होना. अपेक्षा का परबत ना रचना. उसके तले दबकर जिवन खत्म हो

Sarita Prashant Gokhale

देवराज प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले त्या भ्रमात चालता अभंग फार गायले कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले माउलीस गातगात पंढरीस गाठले दे #मराठीकविता

read more
देवराज 

प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले
त्या भ्रमात चालता अभंग फार गायले
कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले
माउलीस गातगात पंढरीस गाठले

देवराज विठ्ठलास एकदा विचारले 
संकटात पामरास का असेच टाकले 
का तुझ्या मनातले असेल प्रेम आटले
तू मलाच सांग आज साकड्यात टाकले

एक नाम अंतरात मी सदैव जोडले
मंदिरात कीर्तनात तेच नाम ऐकले
दर्शनात मी समोर एक रूप  पाहिले 
जीवनात मायबाप विठ्ठलास मानले

सत्व तोच पाहतो असाच खेळ मांडतो
पुण्यवान लेकरास आसपास वाटतो
साद घाल विठ्ठलास तोच फक्त ऐकतो
पंढरीत एक देव या जगास तारतो

©Sarita Prashant Gokhale देवराज 

प्राक्तनात माझिया नसेल न्याय वाटले
त्या भ्रमात चालता अभंग फार गायले
कोण मी क्षणैक मीच नाम घेत थांबले
माउलीस गातगात पंढरीस गाठले

दे

Suhas Athawale

आज हि आठवतो मझं तो गुलाब, ज्या साठी पायपीट केला दिड कि.मि. (१.५ कि.मि.) लांब..., म्हणाली होतीस येतेय; जरा वेळ थांब..., अण्, आणला मि गुलाब; म #roseday #मराठीकविता

read more
आज हि आठवतो मझं तो गुलाब,
ज्या साठी पायपीट केला दिड कि.मि. (१.५ कि.मि.) लांब...,
म्हणाली होतीस येतेय; जरा वेळ थांब...,
अण्, आणला मि गुलाब;
मार्केट यार्ड जरी होत लांब;
तूच तर म्हणाली होतीस जरा वेळ थांब,
पायपीट प्रवास करून आला मला घाम...,

आठवतोय माझं तो गुलाब;
मिळवली जवळीक जि होती माझिया पासून लांब,
काळजाच्या कोपऱ्यात आजही ताजा आहे तो गुलाब,
ज्याने सोडविला गुंता; तुझ्या माझ्या नात्यात...,

सांभाळून ठेवलाय आठवणीत; मि तो गुलाब;
आणता-आणतां फुटला होता मला घाम...,
मार्केट यार्ड तर होत ना लय लांब...!!
आज हि आठवतो तो आठवणीतील;
तुझ्यासाठी आणलेला तो गुलाब!

©Suhas Athawale आज हि आठवतो मझं तो गुलाब,
ज्या साठी पायपीट केला दिड कि.मि. (१.५ कि.मि.) लांब...,
म्हणाली होतीस येतेय; जरा वेळ थांब...,
अण्, आणला मि गुलाब;
म

Suhas Athawale

प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा आहे अंधारात्, आठवते मझ ती काळी रात, जाहला होता माझा तयासमवेत घात, दिली होती तिला मी साथ; भरल्या नभाने दाखविली होती #Dark #मराठीकविता

read more
प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा आहे अंधारात्,
आठवते मझ ती काळी रात,
जाहला होता माझा तयासमवेत घात,
दिली होती तिला मी साथ;
भरल्या नभाने दाखविली होती तिनेच् तर मझ वाट,

प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा होती तिही अंधारात्,
गवसन घालुनी घातली मझ साद;
ऐकवत होतीस मझ तु; तुझे झालेले सगळेच वाद,
दिली मी साथ; नाही मिळाली मझला तुझी दाद,

प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा होतो मी अंधारात्,
ना ऐकलीस् माझिया हृदयाची कधी हाक;
झालीस तु निष्ठुर; नजर अंदाज केलास माझा प्रवास,
विसरूनच गेलीस वादात; सोबतही आहे हा "सुहास"...!

प्रकाशाच्या उंबरठय़ावर "सुहास" हाकत होता‌ प्रवास; जो होता अंधारात्,
साद घालत होता मनोमन; अमावस्येच्या चंद्रात,
तु तर मुक्त झाली होतीस; वादाच्या बंदनात,
प्रकाशाच्या उंबरठय़ातुन निघुन गेलीस; मझ अडकवुन अंधकारात,

प्रकाशाच्या उंबरठय़ा पलीकडे उभा आहे तो आज;
जपुन ठेवलाय आठवणीत तुझाच तो साज,
म्हणतोय; उघडेल कधितरी माझ्यसाठी ति; दिलाच दरवाज्,
कातिल नजरेच्या "अमृता'त चिंब न्हाऊनी; वाजवेल तो पखवाज....!
प्रकाशाच्या उंबरठय़ा पलीकडे उभा आहे तो सुहास...

©Suhas Athawale प्रकाशाच्या उंबरठय़ावर उभा आहे अंधारात्,
आठवते मझ ती काळी रात,
जाहला होता माझा तयासमवेत घात,
दिली होती तिला मी साथ;
भरल्या नभाने दाखविली होती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile