Find the Latest Status about बापलेकी कीर्तन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बापलेकी कीर्तन.
आशिष गंगाधरजी चोले
साऱ्यांच्याच मनाला भासे लेकीचा गारवा तिच्या स्वभावातून वाहे नित्य अमृताचा गोडवा लेकीचा गोडवा सदा दरवळावा अन लेकीसाठी बाप शोधे विसावा जगण्यास बळ देई जणू नक्षत्र की परी भुर्रकण उडून जाईन कुण्या परक्यांच्या घरी लेक जाई जरी सासरी तरी मन असे बापाच्याच घरी तिच्या जन्माच्या रडगाणी वाजे बापाच्या अंतरी खूपदा दुखते तिचे ही काळीज तरी हास्य हेच उपाय लेक बनते कधी कधी स्वतःच्या बापाचीच माय लेकीचा गोडवा सदा दरवळावा अन लेकीसाठी बाप शोधे विसावा हे ईश्वरा माझ्या लेकीला लाभो संसार सुखाचे अतूट राहो नाते सर्व बापा लेकींचे लेखन:- आशिष गंगाधरजी चोले बापलेकी
राजेंद्रभोसले
कीर्तननाचे रंगी नट नाचे पण सध्या...... पोपटपंची अध्यात्म रुजू लागले तेव्हा बेकारांची ,पोटभरूनची संख्या वाढली या राजवटीत अभंगाचे अनेक अर्थ लावू लागले गोष्टीरुप व्याख्यानास काही कीर्तन समजू लागले गायनाच्या चढ्या ताना मारणारे सरस ठरले गळ्यात माळा अंगावर विविध नक्षी काढणारे , दाढ्या वाढवून केस वाढणारे भुरटे पाहिले अध्यात्माच्या बाता मारणारे संख्या वाढतच आहे त्यात आई बाबा विषय घेऊन घोकंपट्टी नकलाकार यांनी कहरच केला डोळ्यात मगरमच्छ चे पाणी आणणारे , व्यावसायिक ही अनुभवले परदेशातील भावनिक गोष्ठी सांगून लोकांना शहाणपणाचे सुतलाक डोस पाजनरें, नाटकी कलाकार ही पाहिले विनोदाच्या ग्रामीण भाषेचा तडका पुस्तकपंडितांचे वाभाडे काढताना पाहिले राजकीय पुढाऱ्यांचे भाट ही अनुभवले टीव्ही वर तर जाहिराती पहिल्या माना डोकावून रडणारे भाडेकरू रसिक ही पाहिले कीर्तन चांग कीर्तन चांग