Find the Latest Status about maharashtra karnataka border from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, maharashtra karnataka border.
Nagaraj K
White **ರತನ್ ಟಾಟಾ ಮತ್ತು ಟಾಟಾ ಟೆಕ್ನೋಲೊಜೀಸ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ** ರತನ್ ಟಾಟಾ, ಭಾರತೀಯ ಉದ್ಯಮದ ಪ್ರಭಾವಿ ನಾಯಕನಾಗಿದ್ದು, ಅವರು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಪ್ರಮುಖ ಹೂಡಿಕೆಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ, ಟಾಟಾ ಟೆಕ್ನೋಲೊಜೀಸ್ ಕಂಪನಿಯು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಉದ್ಯೋಗ ಸೃಷ್ಟಿಯೊಂದಿಗೆ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಮತ್ತು ವಿದ್ಯುನ್ಮಾನ ವಾಹನಗಳ (EV) ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಮಹತ್ತರವಾದ ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ತಂದಿದೆ. ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಟಾಟಾ ಗ್ರೂಪ್ ಹಲವು ಹೊಸ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದು, ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಮತ್ತು ನಾವೀನ್ಯತೆಯನ್ನು ಉತ್ತೇಜಿಸಿದೆ. ಟಾಟಾ ಮೋಟಾರ್ಸ್’ನ ಇಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಕಾರುಗಳು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಬಹಳ ಜನಪ್ರಿಯವಾಗಿದ್ದು, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಸಹಕಾರದಿಂದ EV ಚಲನೆ ಹೆಚ್ಚು ವೇಗ ಪಡೆದಿದೆ. ರತನ್ ಟಾಟಾ ಅವರ ದೂರದೃಷ್ಟಿಯಿಂದ, ಕರ್ನಾಟಕದ ಉದ್ಯೋಗ ಮಾರುಕಟ್ಟೆ, ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಸುಸ್ಥಿರ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಪ್ರಭಾವ ಉಂಟಾಗಿದೆ. ಅವರ ಸಾಧನೆಗಳು ಅನೇಕ ಯುವ ಉದ್ಯಮಿಗಳನ್ನು ಮತ್ತು ಉದ್ಯೋಗಸ್ಥರನ್ನು ಪ್ರೇರೇಪಿಸುತ್ತಿವೆ. 🚀 ©Nagaraj K #Thinking Ratan Tata & Tata Technologies in Karnataka Hinduism Extraterrestrial life Entrance examination Sushant Singh Rajput Kartik Aar
#Thinking Ratan Tata & Tata Technologies in Karnataka Hinduism Extraterrestrial life Entrance examination Sushant Singh Rajput Kartik Aar
read moreकाव्यांकुर तो_मयुर सं. लवटे
✨ अमरावती – माझं शहर, माझी ओळख ✨ अमरावतीच्या मातीला गंध आहे शौर्याचा खास, गल्ल्यागल्ल्यांत वाहतो इथं स्वाभिमानाचा श्वास, तुकडोजींचा संदेश घेऊन इथली धरती चालते, गाडगे महाराजांच्या संस्कारांत अमरावती शहर सारं बोलते… देवांनाही भावणारं स्वर्गापेक्षा सुंदर शहर अमरावती आहे, अंबा मातेचा मिळालेला माझ्या अमरावतीला वसा आहे, मेळघाटच्या वाघांनाही भावणारी माझी अमरावती आहे, विदर्भाचा अभिन्न अंग, अशी ही माझी अमरावती आहे... बडनेराच्या स्टेशनवर गाड्या चोवीस तास धावतात, माझ्या अमरावतीच्या आठवणी मनात कायम घुमतात, चिखलदऱ्याच्या डोंगरांत निसर्गाचं गोड गीत गातो, सतपुड्याच्या पायथ्याशी महादेवाचं शिवरात्रीला दर्शन घेतो… सेलूच्या वारीत टाळ, मृदूंगाचा नाद लहरतो, संतांच्या किर्तनात भक्तीचा गुलमोहर बहरतो, रात्रीचा स्ट्रीट व्ह्यू, बाईकवरचा गार वारा, मनातलं अमरावतीवरचं प्रेम जणू काळजाचा तारा… पलाश लाईनच्या गल्ल्यांमध्ये जगण्याची नशा दाटते, स्पर्धा परीक्षेच्या वळणावर मैत्रीचं सोनं दिवसागणिक वाढते, या शहराच्या रस्त्यांवर धुळीला देखील जान आहे, कारण इथला प्रत्येक दगड इतिहासाचा मान आहे… अमरावती फक्त नाव नाही, हा आत्म्याचा गाव आहे, प्रेम, जोश आणि सन्मानाचा इथं निखळ भाव आहे, ही माती आमची, हे सळसळतं रक्त तिच्या रंगात आहे, अमरावतीचा जयजयकार हृदयाच्या प्रत्येक ठोक्यांत आहे... ©मयुर लवटे #citylife #amravatikar #Life #Love #Poetry #maharashtra #marathi
#citylife #amravatikar Life Love #Poetry #maharashtra #marathi
read moreकाव्यांकुर तो_मयुर सं. लवटे
*⚔️ शिवरायांचा छावा... संभाजीराजे शिवाजीराजे भोसले ⚔️* सिंहगर्जना त्याच्या रक्तात आहे भिनलेली, स्वराज्याच्या मातीशी नाळ त्याची जुळलेली... जिथं अन्यायाचं सावट त्याला दिसेल, तिथं शिवरायांचा छावा संभाजी उभा असेल... मावळ्यांच्या रक्ताचा त्याने वसा तो घेतलेला, रणांगणात एकही लढाई न कधी तो हरलेला... दगड-गड्यांतून फुटलेला असा तो ज्वालामुखी, त्याच्याच तलवारीने होईल स्वराज्याचं स्वप्न सुखी... वाऱ्याशी स्पर्धा करणारा घोडा त्याचा, बघताच त्या वाघाला फुटे कुणा न वाचा... मौतही ज्याच्या एका नजरेला थरथर भीते, असा छावा रणांगणात स्वराज्यासाठी हुंकारते... शिवरायांचा वारसा उराशी त्याने कवटाळून, मातृभूमीचं रक्षण हाच त्याचा खरा धर्म मानून... तलवारीच्या एका वारात लागत असे दुश्मनांचा निकाल, त्या छाव्याच्या नजरेत दिसे माझ्या स्वराज्याची ढाल... त्याला फक्त राज्य नको, तर न्याय त्यास हवा, गोरगरिबांचा मरणपणाचा आधार त्यास हवा... ⚔️ छत्रपतींच्या रक्ताचा तो दिवा आहे, स्वराज्याच्या स्वप्नातला खरा छावा आहे! ⚔️ ©मयुर लवटे #ShivajiMaharajJayanti #shivajimaharaj #sambhaji #maharaj #maharashtra #marathi #kavita #Poetry #Life
#ShivajiMaharajJayanti #shivajimaharaj #sambhaji #maharaj #maharashtra #marathi #kavita #Poetry Life
read more