Nojoto: Largest Storytelling Platform

New गढूळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गढूळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गढूळ.

Related Stories

    LatestPopularVideo

Shankar Kamble

*गढूळ झाले तळ मनाचे*
*आटून गेले नितळ झरे*
*ओलं सरता उरल्या भेगां*
*खोल उमटले घाव,चरे..!*

*रणरणणाऱ्या उन्हांत आता*
*झुळूक हरवली कुठेतरी*
*पदोपदी पेरले निखारे*
*फुंकर भासे दाह परी..!*

*आपल्याच जखमां कुरवाळीत*
*किती दिलासे उसने,खोटे*
*लपेटली जरी भळभळ ओली*
*सल मनाची मनांत दाटे..!*

*भार वाहूनी झाडं ही थकले*
*ऋतू बदलले काळ ओसरे*
*सुने घरटे काय उरले?*
*पंख फुटता दूर पाखरे..!*

*काय भरवसा फिरुनी येतील?*
*कोसळल्यावर टिपे गाळतील?*
*उन्हं जगाचे चटके देईल*
*पंखाची उब शोधत बसतील..!*

©Shankar Kamble #Foggy #गढूळ #तळ #माया #प्रेम #वेदना #वेदनांचागाव #काठावर

sandy

पहाटेपासूनच पाऊस कोसळतं होता. इतरत्र पाऊस फक्त पडतो, मुंबईत तो कोसळतो! 'रोमँटिक पाऊस' वगैरे शब्द मुंबईबाहेरचें. बाहेरचा येऊन कोणी मुंबईत पाव #story #nojotophoto

read more
 पहाटेपासूनच पाऊस कोसळतं होता. इतरत्र पाऊस फक्त पडतो, मुंबईत तो कोसळतो! 'रोमँटिक पाऊस' वगैरे शब्द मुंबईबाहेरचें. बाहेरचा येऊन कोणी मुंबईत पाव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile