Nojoto: Largest Storytelling Platform

Best तळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about तळपायाला खाज का येते, तळे meaning in english, तळे समानार्थी शब्द, तळपायाची आग होण्याची कारणे, तळपाय दुखणे यावर उपाय,

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Shankar Kamble

साचलेले बरेचं काही
खोल मनाच्या गूढ तळाशी
गाठ उकलण्या सैल धागे
सोड मौन तू बोल स्वतःशी..

काजळ काळे भरले अंबर
अवचित आली वळीवाची सर
जीर्ण पानगळ त्यागून आता
नवलाईचा फुलू दे मोहर..

द्यूत रंगले मनःपटलावर
मनाजोगते दान पडेना
चितारलेले चित्र देखणे
कुठे हरवले?का सापडेना?

नजरेला दे नजर तुझ्या तू
दर्पणात निरखून स्वतःला
घे भरूनी पोलाद मनगटी
चेतवून बघ सामर्थ्याला..

पाझरते बघ एकसारखी
अथांग थरथर स्पंदनाची
तख्त पालथे निशाण फडके
आव्हान ,गर्जना दे बंडाची..

©Shankar Kamble #SunSet #मन #तळ #बोला #मोकळे #आकाश #स्वातंत्र्य #पंख #वारा

Shankar Kamble

*गढूळ झाले तळ मनाचे*
*आटून गेले नितळ झरे*
*ओलं सरता उरल्या भेगां*
*खोल उमटले घाव,चरे..!*

*रणरणणाऱ्या उन्हांत आता*
*झुळूक हरवली कुठेतरी*
*पदोपदी पेरले निखारे*
*फुंकर भासे दाह परी..!*

*आपल्याच जखमां कुरवाळीत*
*किती दिलासे उसने,खोटे*
*लपेटली जरी भळभळ ओली*
*सल मनाची मनांत दाटे..!*

*भार वाहूनी झाडं ही थकले*
*ऋतू बदलले काळ ओसरे*
*सुने घरटे काय उरले?*
*पंख फुटता दूर पाखरे..!*

*काय भरवसा फिरुनी येतील?*
*कोसळल्यावर टिपे गाळतील?*
*उन्हं जगाचे चटके देईल*
*पंखाची उब शोधत बसतील..!*

©Shankar Kamble #Foggy #गढूळ #तळ #माया #प्रेम #वेदना #वेदनांचागाव #काठावर

Simran

mute video


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile