Find the Latest Status about सागराचे पाणी कधी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सागराचे पाणी कधी.
Lotus Mali
White तुला आठवते का रे? परतीच्या त्या वाटेवर शपथ दिली घेतलेली तुला आठवते का रे? भेटीत त्या पानावलेली डोळे पुन्हा कधी भेटणार हा प्रश्न तुला आठवते का रे? तू मला बोललास हा क्षण इथेच थांबावा त्यातच सारे आयुष्य सरावे तुझे नी माझे तेही तुला आठवते का रे? थांब जरा वेळ म्हणून हात धरून मारलेली ती मिट्टी खरंच तुला आठवते का रे? का हे सर्व क्षण आता फक्त उन् फक्त माझ्याच आठवणीत राहणार का रे? https://lotusshayari.blogspot.com/ ©Lotus Mali #love_shayari तुला आठवते का रे? परतीच्या त्या वाटेवर शपथ दिली घेतलेली तुला आठवते का रे?
#love_shayari तुला आठवते का रे? परतीच्या त्या वाटेवर शपथ दिली घेतलेली तुला आठवते का रे?
read moreSangeeta Kalbhor
अगदी निखालस.. असंही नाही आणि तसंही नाही... पण खरं सांगू का? एक अतृप्त स्त्री सदैव माझ्यात असते रे.. म्हणजे असं बघ.. तन माझे नाहीचं इतरत्र कुठे कुठेही रमणार... सौभाग्याच्या सीमेशिवाय... पण तरीही ..हो तरीही...एखादा असा श्वास हवा वाटतो मला जो माझ्या अतृप्त असलेल्या मनाला तृप्त करेल आणि एक ..फक्त एक श्वास माझ्यात असा भरेल जो सगळ्या उणिवांना सातासमुद्रापार दूर फेकून देईल... मी घोळक्यात असो की असो मी एकांतात...माझ्या चेहऱ्यावर येणारी ती उदासवाणी रेघ दिसूचं नये माझ्या चेहऱ्यावर असे मला सातत्याने वाटते...आणि म्हणूनच हा आर्त भाव व्यक्त करण्याचा अट्टाहास बघं... तू ही म्हणशील काय हे खुळ घेऊन बसलीयेस डोक्यात...काहीचं वाटत नाही कसं तुला हे सगळं व्यक्त व्हायला... पण खरं सांगू... नाही वाटत मला रे... तुला माहिती आहे... अजून माझ्या अधरांवरची ती गुलाबी लाली तशी तशीच आहे... मला वाकोल्या दाखवत.. मला चिडवत... हो... नाही उतरला कधी अधर माझ्या अधरांवर कारण मला माझ्या अधरांना अशा अधरांत सोपवावेसे नाही वाटत ज्या अधरांना अधरात सामावताना मला ग्लानी वाटेल... मला ते अधर निर्व्यसनी हवेत ... मला ते अधर कमळाच्या फुलांगत हवेत... जे मातीतही उगवून देवीदेवतांच्या चरणी अर्पिले जातात... गोड गुपित आहे हे माझे... असो... मी अशीच आहे रे... नाही म्हणजे नाहीचं... राहिल्या काही भावना उपाशी तर काय बिघडते पण तत्वांशी नाही बरं वैर करायच.... ए ऐक ना.... तू तो माझा श्वास होशील का... अधरांशी हितगुज करणारा आभास होशील का... नाही...म्हणजे तुला तिथूनच आल्या पाऊली जावे लागणार हे निश्चित... आणि हो जाण्याच्या तयारीने यावेस ... आलास तर.... पण अधरांचे संगीत मात्र ऐकायचे आहे हं मला... अगदी निखालस...... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor अगदी निखालस.. असंही नाही आणि तसंही नाही... पण खरं सांगू का? एक अतृप्त स्त्री सदैव माझ्यात असते रे.. म्हणजे असं बघ.. तन माझे नाहीचं इतरत्र क
अगदी निखालस.. असंही नाही आणि तसंही नाही... पण खरं सांगू का? एक अतृप्त स्त्री सदैव माझ्यात असते रे.. म्हणजे असं बघ.. तन माझे नाहीचं इतरत्र क #कविता
read moregaTTubaba
अश्रू भिजल्या पावसाचे पुन्हा नेहमीसारखे दिसेनासे होतील पाणी वाहून जाणार खरे पण दुःख कसे जाणारं ? राहिलेले मनात साचून प्रेमापोटी हवेच्या, देणाऱ्या झाडांना स्पर्श करून वाळलेल्या प्रत्येक पानांमध्ये येईल श्वास भरून .... न लिहिलेली कहाणी कोण जाईल वाचून अर्धी तिच्या सवे अर्धी तिच्या वाचून ....! ©gaTTubaba जेव्हा मिळाली पावसाला वादळी हवा त्याच्यासाठी जीवघेणा नजरेचा खेळ नाही नवा क्षणार्धाची साथ जेव्हा जाईल ती सोडून
जेव्हा मिळाली पावसाला वादळी हवा त्याच्यासाठी जीवघेणा नजरेचा खेळ नाही नवा क्षणार्धाची साथ जेव्हा जाईल ती सोडून #शायरी
read moreओम नमः शिवाय
शरीराची वाढलेली चरबी पाणी होऊन लघवीतून बाहेर पोट सपाट वजन कमी ! vajan Kami karne gharguti upay #Videos
read moreJaymala Bharkade
व्यवस्थेला कधी पाझर फुटेल !! माय हारणी मया बापाची ही काळी धरती माय वावराला काटे कुपाटे लावून राबे रात्रं-दिन संपत्ती काय तर म्हणे मई बैलाची जोडी लय हाय बैल गाडी हाकतो राजाच्या छाताडावणी कुणात हिम्मत नाय बाप्पा मया शेतकरी बापवणी ऊना तानात राबून नांदे झोपडीत महलावानी शेतकरी करे कष्टाने घामाचं सोन कधी उनाने बेजार कधी पुराने बेहाल उभा संसार सारं निसर्गाचं हाती किती कष्ट करे.. याच अंदाज नाय !! जगले कित्येक मया बापाच्या भरोशी व्यापारी तर त्यांनीच पोसले खरे तरी आता हतबल झाला कसा शेतकरी म्हणे पेरणी ला घेतलेली कर्ज कस फेडू ? निराधार कसा झाला हा उभ्या जगाचं पोशिंदा म्हणे महागाई फार, नाय भाव मालाला या व्यवस्थेला कधी पाझर फुटेल !! ©Jaymala Bharkade Farmer..life 💔 & The entire system..which make him depressed 🥲 #व्यवस्थेला कधी पाझर फुटेल
Farmer..life 💔 & The entire system..which make him depressed 🥲 #व्यवस्थेला कधी पाझर फुटेल #मराठीकविता
read more