Find the Latest Status about शशी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शशी.
उमा जोशी
मावळतीला जाता दिनकर सांज उतरते गर्द होतसे अंधार आणि रात्र पसरते लुकलुक करती नभी तारका चंद्र हासतो अलगद शीतल वाऱ्याची ती झुळुक येते झाडे वेली निजल्या असती नदीकिनारी वाळूवरती चंद्र चांदणे मोहक पसरी हळूच चुंबन काठाचे त्या लाटा घेती नभी चांदणी शुक्राची ती हसे लाजरी अशीच अलगद सरेल रजनी पहाटवेळी दिसू लागता सूर्यकिरणांची प्रभा आगळी जगास साऱ्या जाग येईल पुन्हा नव्याने मुले माणसे कामात व्यग्र असती सगळी वाट पाहते धरा तरीही ती रात्रीची अशी असे ही प्रीत आगळी शशी धरेची नित्य भेटती एकमेकांस दोघे रात्री यांच्या सम ती नसे प्रीत हो जगी कुणाची ---- उमा जोशी २०/०३/२०२१ ©उमाच्या मनातलं #गोदातीर्थ #अनलज्वाला #शशीधराप्रीत #moonlight
Shashikant Kendre
इस दुनिया में सबसे बड़ा क्राइम दो प्रेमी को जूदा करणा हैं शशी #इस_दुनिया_में_सबसे_बड़ा_क्राइम_वो_हैदो_प्रेमी_को_जूदा_करणा✍️ #शशी