Find the Latest Status about माणसाने माणसाशी माणसा सम वागणे lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे lyrics.
Varsha Bhole
कठोर हृदय नाही ना तुझे थोडे समजून घेणं ना मन माझे मनाला घोर लावते तुझे असे बोलणे हृदयी घाव देते तुझे असे वागणे.... ओढ होती मजला भेटीची तुझ्या समवेत निवांत बोलण्याची नव्हते काही दुसरे माझे असे मागणे हृदयी घाव देते तुझे असे वागणे.... साऱ्या सीमा झाल्या दूर तुझ्याच प्रेमाचा वाहतोय पुर समवेत आयुष्यभर तुझ्या चालणे हृदयी घाव देते तुझे असे वागणे.... ©Varsha Bhole #तुझे असे वागणे
प्रकाश साळवी
वागणे फुलांचे असे काय होते !! *** वागणे फुलांचे असे काय होते लाजणे तुझे ते असे काय होते ** मज पाहिले नजरेने जरासे हासणे गालात असे काय होते ** सांडली शर्म तुझी अवेळीच ग चालणे तुझे ते असे काय होते ** नजर अशी का सैरभर झाली बोलणे तुझे ते असे काय होते ** मोगरा असा पुन्हा गंधित झाला गंधणे तुझे ते असे काय होते ** तु कळी कोवळी आहे चाफेकळी फुलणे तुझे ते असे काय होते ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. 9158256054 वागणे फुलांचे असे काय होते !!