Nojoto: Largest Storytelling Platform

New महापूर एक भयाण अनुभव Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महापूर एक भयाण अनुभव from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महापूर एक भयाण अनुभव.

    PopularLatestVideo

Pratiksha Sanap

महापूर

read more
पावसाचा पत्ता चुकला 


असा कसा रे तु पत्ता चुकला 
संपूर्ण मराठवाडा पावसाला मुकला 
कोणता दिला होतास पत्ता मी तुजला 
पण तु तर कोल्हापुर ला सजला ......

आलास तु सांगली मध्ये धो -धो 
मग आमच्याशी च का खेळतोय असा खो -खो 
तुज्या एक -एक थेंब साठी प्राण तळमळतो  
उद्भवलेल्या या रोगराई ने जीव आता मळमळतो महापूर

Shital Sankhe

#जीवघेणा_ट्रॅक

 थकवा उशाशी घेवून
   ते  निजले होते 
रात्रीचे अंधार काहीसे
  दुर्देवच ठरले होते

काळाने नियतीला जणू
  बाजूला  सारले होते
चिरडून जाण्याइतपत नशिबाने
 आधीच पिढले होते

समज कशी यावी 
ज्ञान -अज्ञान संभ्रम होते
निवाऱ्यात पाखरांना 
आर्ततेने पोहचायचे होते

खडतर रस्ता पायदळी
तुडवत ते अंतर कापत होते
थांबले अन् निजले तेथेच
मृत्यूने कवटाळले होते

चित्कार,आक्रोश अंधारला 
असेच अघटीत घडले होते
रक्ताचे थारोळ्यात चिंधड्या 
पाहून सारे हळहळले होते 

शोककळा पसरली 
सर्वत्र त्याचेही कारण होते
जीवघेणा ट्रॅक निर्जीव
गेलेली माणसं सजीव होते

©®सौ.शितल हर्षल संखे #भयाण

Roshan Sagar

महापूर

read more
मानावेसे तुजला हे कृष्णा
     अन् पंचगंगा
दाखविलीसी माणसाला 
      त्याची जागा....
 
          लयं मातला हा सारा
   माणूस जाती-जातीत वाटला..
      केली असेल त्याने प्रगती
नाही सोडलाविला त्याने जातीचा खटला..

        देवाने माणसाला धर्मात 
             वाटून द्यावे..
       काय तुझी कमाल आज
 साऱ्या जाती धर्माला वाहून न्यावे....

         देवाला न कधी जमले
    ते ना कधी त्याला जमणार..
        तुझ्या पाण्याचा  प्रवाहाने
माणसाने देवाची नाही सैनिकाचे पाय पडावे....

   तुला ह्या पावसाचे तांडव
       करणं गरजेचं होतं..
त्यामुळेच तर जाती-धर्म
    एकत्र तुला करणं  होतं....

       जेव्हा जेव्हा या भूतलावर
  माणसे जातीमध्ये वाटले जातील..
          मला वाटते तेव्हा तेव्हा
 तू त्यांना त्यांची दया दाखवशील ....

कृष्णा माये आज कोल्हापूर
        पाण्यात मात्र आहे..
 बकरी ईद अन् गणपती पूजा
      पण दस्तावले  आहे....

     नको देऊ हे सणासुदीचे
          क्षणीकचं सुख;..
          दे आम्हाला वाटून
     माणुसकीचे सुख असो की दुःख.... महापूर

Deepak Shinde

महापूर..

read more
mute video

Kailas Tidke

महापुरात बुडताना गावाला कळल आपला दुष्काळच होता बरा 
जीवघेण्या ओलेपणापेक्षा जाळणारा उन्हाळाच खरा..
®कैलास #महापूर

Mahesh Lokhande

माणुसकीचा महापूर #poem

read more
माणुसकीचा महापूर

आठव त्या सार्‍यांना 
जीव ज्यांनी वाहिला
देशसेवेचा  झरा 
ज्यांमध्ये राहिला

माणुसकीचा महापूर
मी येथे पाहिला
देशप्रगतीसाठी
घाम येथे वाहिला

भाऊ बनून जो तो
भावासाठी धावला
बंधूप्रेमाचा पाझर
फुटताना पाहिला

भूकेल्यास घास
तहानेल्यास पाणी
देई अंथरूण
 कोणासही कोणी

पूरग्रस्तांसाठी जो तो
गेला धाऊनी
शक्य जे ते जो तो
आला करूनी


स्वातंत्र्यदिनाला या
सार्‍यांना सलामी
भूकंप पूरग्रस्त
ना कधी होवो कोणी

कवी-महेश लोखंडे माणुसकीचा महापूर

अश्लेष माडे (प्रीत कवी )

भयाण शांतता

read more
आमचं तासंतास बोलणं ही कधी-कधी निष्फळ ठरतं. जेव्हा मनातलं मनातच राहून जातं. तिचं आणि माझही. 
तिने मनातलं ओळखावं, भावना समजावं, अबोल न राहता व्यक्त व्हावं. असं काहीतरी मनात असतं माझ्या, पण तेव्हा बोलणं संपून जातं, आणि मनातलं मनातच राहून जातं.. पण त्या गप्पांना अर्थ नसतोच मुळी. जिथे भावना ओळखता येत नाही.. त्या बोलण्यात एक भयाण शांतता असल्यासारखं वाटतेय. भयाण शांतता

Harsh

#कोल्हापूर चा महापूर

read more
निसर्गाचे रूप (10-8-,2019)-हर्षल चौधरी 
                                   
काय आहे ही निसर्गाची किमया,
         कधी येतॊ राग याला,तर कधी दया. 
कधी घेऊन येतॊ 'सोसाट्याचा वारा '
      तर कधी आणतो हा 'पावसाच्या धारा. 

पावसाळी होतो हा हिरवागार, 
    उन्हात देतो मात्र सूर्यकिरणांचा मार. 
कधी घेईन येतॊ सुंदर अशी पहाट, 
   कधी आणतो सुमुद्राला उंच मोठी लाट. 

कधी डोकावतो हा माणसाच्या सुखात,
           येतॊ तेव्हा  तो पावसाच्या रूपात. 
तेव्हा जातो तो माणसाला 'रडवून '
    धो धो पडून टाकतो सगळं काही 'बुडवुन'.   

येतॊ कधी बनून हा 'महापूर',
     लावून जातो तेव्हा 'एकजुटीचा सुर '.
घेऊन येतॊ कधी 'दुष्काळाची पीडा', 
    जातो शिकवून माझ्या शेतकऱ्याला धडा. 

भूकंप आणून करतो,आपल्याला हा दुखी. 
     राग आला की आणतो हा  'ज्वालामुखी'. 
हे सगळे आहेत निसर्गाचेच गुण, 
  जातो आपल्याला हा, खुप काही शिकवून. 

माणसानेच बिघडवले त्याचे संतुलन, 
     तो करतो मात्र सदैव आपलं रक्षण. 
निसर्गालाच बनवा आता,  खरा आपला' मित्र '
      प्रार्थना करा कमी होऊदे कृष्णा मायेचे  पात्र... #कोल्हापूर चा  महापूर

Sachin Zanje

२०१९माझ कोल्हापूर शहर महापूर

read more
महापुर २०१९ कोल्हापूर शहर

सुसाटाच्या सुटलाय हा वारा
थंडगार मारी अगांवरी शहारा
पाण्यात बुडलाग हा माझा निवारा
भटकंती जीवना सारखा  झालाय 
               बघ असा हा आमचा कोंडमारा...

सोडूनिया सारे 
धाव जगण्यासाठी घेतीली.
पाहुणीया आमची ही परिस्थिती
साथ ह्या माणुसकीने दिली..

एकवटला हा सारा 
माझ्या कोल्हापूर चा भाग 
आता नाही फिकिर 
तु किती ही लाग..

आई जगदंबेची आहे
सार्या कोल्हापूर जनतेवरी माया 
धाव घेईल लेकरासाठी
संकट ती  ताराया..

प्रत्येक मावळ्यांच्या 
हदयात आहे राजा माझा जाणता.
म्हणूनच संकटावर मात केली आम्ही म्हणता म्हणता
अशी ही माझी  कोल्हापूर ची जनता.
I love you Kolhapur
कवी - सचिन झंजे २०१९माझ  कोल्हापूर शहर महापूर

Bittu Kumar Mandal

एक अनुभव

read more
वक़्त से पहले हादसों से लड़ा हूँ
मैं अपनी उमर से कई साल
बड़ा हूँ।  एक अनुभव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile