Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष्याच्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष्याच्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्याच्या.

शब्दवेडा किशोर

White #शापीत जन्म अन् देह हा माझा....
शब्दवेडा किशोर
उभा देह हा माझा तारुण्याचा
असाच मी जाळला
कपाळ पांढरे आहे सदैव 
बोल ऐकुन लोकांचे
अंतरात्मा माझा आहे खुप पोळला

विखारी नजरेच्या त्या वासनांध काट्यांनी
रक्तबंबाळ मी सदैव होतेच आहे
प्रश्र मज पडे सदा असा की
का सदा स्त्रीच इथं समजाच्या
नियमांना बळी जाते आहे

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_पुस्तकातून

शब्दवेडा किशोर

White #पुढची फेरी....
शब्दवेडा किशोर
अजब अन् निराळा नियतीने आखलेला जीवनप्रवासच तो..सुरू झालाय..संपणार देखील आहे..प्रत्येकजण प्रवासी इथे...प्रत्येकाच्या नियतीने ठरवलेल्या आयुष्य नामक बसच्या फेऱ्या नित्यरोज सुरू आहेत.नवनवीन प्रवासी भेटतात व प्रत्येकाचे मोबदला शुल्क आधीच ठरलेले अन् आपला थांबा आल्यानंतर त्या आयुष्याच्या बसमधून पायउतार होणदेखील आधीच ठरलेले आहे अन् शेवटचा थांबा येईपर्यंत बस पुष्कळशी रिकामी होणार हे ही आधीच नियती कडून ठरलेले..मोजके काही जण शेवटच्या थांब्यापर्यंत वाहकासोबत असणार व तसंही ही फेरी पूर्ण होताच गोळा केलेल्या पैशाची थैली मागे सोडून निर्विकारपणे पुढे निघून जायचंय.
      आपल्या विश्वात आपले घर,आपले जग,आपले राज्य,आपले नगर असतं ते सारं मागे टाकून जिथून या बसफेरीसाठी आपली नियुक्ती झाली त्याच आपल्या त्याच आत्मतत्व असलेल्या जगात आपल्याला पुन्हा विलीन व्हायचंय...
अन् सज्ज व्हायचंय....पुढच्या अज्ञात फेरीसाठी....

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्यापुस्तकात

शब्दवेडा किशोर

White #जाताना तरी आज एकदा माझी होऊन जा......
शब्दवेडा किशोर
जाताना तरी आज एकदा माझी होऊन जा
त्या शेवटच्या भेटीमध्ये मज आयूष्यभराची साथ तू देऊन जा
भावनांना आवरन्याचं काम माझं मी करेन कसबसा
एकदा तरी तुझा हात माझ्या हातात देऊन जा
जाताना तरी आज एकदा माझी होऊन जा......
खूप काही साठले आहे मनात माझ्या
ते निदान आज तरी तू ऐकून जा
डोळ्यात साठलेले तुझ्या प्रेमाचे अलवार चाहूलीगत ते भाव
तुझ्याच त्या डोळ्यांनी वाचून जा
जाताना तरी आज एकदा माझी होऊन जा......
कळत नकळत जन्मलेल्या ह्या नात्याला
तु तुझ्या विश्वासाची साथ देऊन जा
पुढे कधी भेटू न भेटू पण
या घायाळ मनावर तुझ्या प्रेमाची फुंकर घालून जा
जाताना तरी आज एकदा माझी होऊन जा......

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_पुस्तकातून

शब्दवेडा किशोर

Unsplash #माझ्या आयुष्याचे पुस्तक....
शब्दवेडा किशोर
थांबली पुन्हा आज लेखणी माझी अन्
पुन्हा जरासे अडखडळे माझ्या शब्दांचे ते मर्मबंधमय श्वास
वाटलं मनी की नको पुन्हा ती कवितेची ही गुंफण
ओळींचा पुन्हा झाला जरासा ऱ्हास
पुन्हा नको ते गुंतणे कुणात कुणी म्हणायला पुन्हा की अरे रडू नको
जरासा मनमुराद तु पुन्हा नव्यानं हास
 वाटे मनी माझ्या आता की शेवट करावा या साऱ्या भाव भावनांचा
अन् नसावं आता कुणी मनात माझ्या खास
निजधामी आता मी आनंदाने गमन करावे
आत्म्यात ठेऊनी ती फिरुनी नव्यानं जन्मण्याची ती आस

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

White #प्रेमवेडा मी जणू शापित राजहंस 
शब्दवेडा किशोर 
काळोखाची ती शाल पांघरून ही रात्र सर्वदूर पसरलेली
हिवाळ्याच्या या थंडीमध्ये ती हुडहुडतच गोठलेली
आसमंतही रात्रीच्‍या कुशीत थकून डोळे मिटून निजला आहे 
अन् चांदण्‍याही त्या ढगाआड मंद होऊ लागल्‍या आहे 
अशा शांत-एकांत क्षणी मी मात्र तुलाच शोधतोय
या गर्द काळोखात तू नाहीस माहित असतानाही
मी उगाच आस लावतो
हा वेडेपणा असला तरी मला मात्र फार आवडतो
तुला शोधण्‍याचा हा खेळ जो मी आजही अगदी
मनापासून खेळतो

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

White #मी भाव अंतरिचे जाणिले....
शब्दवेडा किशोर
अंतर मिटवून मनामनाचे मी भाव अंतरिचे हे जाणिले
जाणिवांना माझ्या नव्याने स्वप्नांचे हे नवे पंख बघा जोडले
एक शापीत जोकर म्हणूनच आजवर मी माझे जीवन कंठिले
घेऊनी नवा जन्म मी पुन्हा नव्याने
माझे जुने ते शापीत जगणे पुन्हा आनंदाने स्विकारले
सदा इतरांच्या आनंदासाठी स्वतःच्या अस्तित्वाला मी जळते ठेवले
स्व-आनंद नंतर बघायचा असे ठरवून
स्वतःला जगाच्या हाती सोपवून पुन्हा नव्याने मीच
स्वतःला आनंदाने जगाच्या हातचं खेळणं बनविले
जन्मभर इतरांना हसवीन देईन सदा आनंद मी
अन् मरण्याआधी एक दिवस तरी मनभरून जगेन स्वतःसाठी
हेच स्वप्नं मी कायम मनी रंगविले
मी जगाच्या रंगभुमीवरचा एक शापीत जोकर
हे माझे नियतीने मज दिलेले ओळखीचे स्वरूप कायम जपायचे
हेच मनी ठरवून पुढे हसत जगायचे ठरवले

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

White #स्वप्नं पाहतोय तुझ्यासोबत.....
शब्दवेडा किशोर 
स्वप्नं पाहतोय तुझ्या डोळ्यात आपल्या निखळ प्रेमाचे
चोरपावलांनी अलगद तू माझ्या आयुष्यात यावं
अन् कारण बनावं माझ्या जगण्याचं
स्वप्नं पाहतोय तुझ्यासोबत त्या चांदण्या रात्रीचं जेव्हा
तुझा हात माझ्या हृदयाशी असेल अन् माझ्या कानी तुझ्या हृदयाचं धडकनं असेल
माझ्या अस्तित्वाचा मनमयूर तुझ्या मनाला साद घालत असेल 
ढगाआड लपून हा चांदोबाही मग माझ्यावरच जळत असेल
आकाशातले तारेही तुला पाहून आपसुकपणे डोळे मिचकावतात 
त्यांनाही तुझी ओढ असते म्हणून चांदण्याची साथ सोडुन तुझ्याकडेच ते धाव घेतात
स्वप्नं पाहतोय तुझ्यासोबत या आयुष्यरूपी त्या खडकाळ झऱ्यातून अणवाणी चलण्याचे 
तुझा हात असेल तेधवा मग माझ्या हातात मी सावरणं तुला हा विश्वास असेल तुझ्या मनात
मग तो झराही सुखावेल तुझ्या स्पर्शाने अन् पावलांच्या तुझ्या मनमधूर स्पर्शाने प्रेमाची पालवी फुटेल
त्या खडकाळ दगडांच्या मनात
स्वप्नं पाहतोय तुझ्यासोबत सांजवेळी समुद्राच्या वाळूत पाय रुतवून बसण्याचे तुझ्यासाठी
असलेल्या माझ्या काळजीचं जॅकेट तुझ्या खांद्यावर घालावं
 माझ्या खांद्यावर तुझं डोकं ठेवावं अन् बसावं जरासं आपण दोघे निःशब्द होऊन
क्षितीजापलीकडे नजर लावून उद्याची स्वप्नं पहात असू
त्या चमकणाऱ्या लाटांचे चेहऱ्यावर उडणाऱ्या त्यांच्या तुषारांचे
स्वप्नं पाहतोय तुझ्यासोबत एकाकी वाटेवर चालण्याचे एकमेकांना साथ देत स्वप्नांचे इमले रचण्याचे 
ती वाटही आच्छादून गेली आहे फुलांनी पालापाचोळ्यानी अन् त्यांच्या इच्छांनी
त्यांनाही त्यांच्या मनावर ठसे हवेत आहेत तुझ्या पावलांचे
स्वप्नं पाहतोय तुझ्यासोबत या बेभान पावसात भिजण्याचे 
मन बेभान होतं तुला पाहुन भिजलेल्या तुझ्या केसातून बटेवरून गालांवर
ओघळलेल्या पावसाच्या थेंबाने पण पावसालाही झिम्माड व्हायचं असतं
भिजलेल्या तुझ्या केसांच्या सुगंधाने    
बस्स....आता वाट पाहतोय फक्त मी त्या दिवसाची
जेव्हा तू माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करणार
सांग ना सखे..माझ्या मनाचा उंबरठा ओलांडून माझ्या हृदयाचं 
दार कधी ठोठावणार ?

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

White #चंद्राच्या साक्षीने आज..
शब्दवेडा किशोर 
चंद्राच्या साक्षीने आज मन माझे मी तुज अर्पियेले
काय करायचे तयाचे मी फक्त भाव जाणिले 
दुःख कुणाच्या वाट्याला आलं नाही
असे जीवनच कुणाचे झाले नाही
सोबत असेन मी तिमिरातही अन् तेजातही
चंद्राच्या साक्षीने आज.... ||१||
चंद्राच्या साक्षीने काजव्यांची रात्र होऊन तु अशी यावी 
लाजूनी हा चंद्रदेखील मग नभाआड जावा 
प्रेमाचा रंग तुझ्यावाटे चांदण्यात भरवून
त्या चांदण्यांना सुद्धा तुझी मग मोहीनी पडावी
रातराणीचा गंध होऊन सदा तू माझ्या तनामनात दरवळावी
मन आतुरले तुझी पाहुनी वाट डोळे भरुनी आले दाट 
मला तुझेच व्हायचे आहे घालतो कायम मी हीच तुजला
माझ्या अस्तित्वामधूनीया साद 
चंद्राच्या साक्षीने आज....||२||
मी तुझाच प्रियवर गं झालो तुज समर्पित झालो मी खुशीखुशी
सुखात चिंब न्हाऊनिया गेलो 
असे माझ्या मनी फक्त एकच आस की 
आपल्या युगलांची स्वप्ने पूर्ण व्हावीत
भावनांनाचे पाश नष्ट होऊन
अनादिअनंत आपल्या अनमोल नात्याची
 लतिका ही अशीच कायम एकरूप रहावी 
घेतो शपथ मी की लवकरच
आपल्या नात्याचा नव्याने मी
आयुष्यअध्यायाचा एक नवा शुभारंभ करणार
या शुभ्रधवल चंद्राच्या साक्षीने आज....||३||

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

White #कसल्या भिंती..
शबदवेडा किशोर 
कसल्या भिंती कसल्या रीती 
कसल्या ह्या रूढी अन् वाटा 
काही क्षणाचे येती आयुष्यात 
कसले हे सोबती
निव्वळ प्रवासी व क्षणांचीच भेट
अन् तेवढीच ओळख
पडदा पडताच
होतात पुन्हा अनोळखी

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

माझं नशीब इतकं खराब झालंय की
जर मी एखादी स्मशानभूमी जरी
राखायला घेतली
तर माणसं मरायचीसुद्धा
बंद होतील..
शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile