Nojoto: Largest Storytelling Platform

New सुखाच्या सरीत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सुखाच्या सरीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुखाच्या सरीत.

Related Stories

    PopularLatestVideo

Chaitali Yengade

#सुखाच्या शोधात मीमराठी मुलगीकव्यारत्न प्राप्त#

read more
सुखाच्या शोधात मी:-

चार कोस कापून पळवाट 
धुंडतोय सुखस्वी नदीचा काठ
दुःखाची वाट दाट
पदरी पडतो वाळवंट.........
                                     ✍कु. चैताली प्र. येंगडे #सुखाच्या शोधात मी#मराठी मुलगी#कव्यारत्न प्राप्त#

Shubhada

अंधार भेदून घेते किलबिल तेज शलाका अलगद व्यापून घेते काळोखलेल्या वाटा जणू साद देते जगावे असे सुखाच्या कडेला विसावू असे #nojotophoto

read more
 अंधार भेदून घेते 
किलबिल तेज शलाका 

अलगद व्यापून घेते 
काळोखलेल्या वाटा 

जणू साद देते  जगावे असे 
सुखाच्या कडेला विसावू असे

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रानों💕 सुप्रभात आजचा विषय आहे एक धागा सुखाचा... #सुखाचा लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #५५

read more
एक धागा सुखाचा मिळता
मी फाटके आयुष्य शिवण्याचा प्रयत्न केला.
दुःखाचे ठिगळ उसवून आयुष्याचे,
पुन्हा सुखाच्या धाग्याने विणण्याचा प्रयत्न केला. नमस्कार मित्रानों💕
सुप्रभात
आजचा विषय आहे
एक धागा सुखाचा...

#सुखाचा
लिहीत राहा आणि व्यक्त होत राहा.
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine

Sarita Prashant Gokhale

सुमंदारमाला लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे अता जीवनाची निराशा पळ #मराठीकविता

read more
सुमंदारमाला

लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे
अता जीवनाची निराशा पळाली तुझ्या भोवताली सुखाच्या सरी
सख्या घेत आहे तिथे मी उभारी, सुखाच्या दिशेने मनाशी जुळे
दिशा धुंद झाल्या पुन्हा सांजवेळी वितळले सख्या मी पुन्हा अंतरी 

तुला हाक देता मला साथ दे तू हवा धुंद झाली निशा रंगली
नको दूर जाऊ अशा संधिकाली तुझ्या प्रेम वाटेत मी साजिरी
तुलाही मलाही मनी ओढ वाढे इशारे नशीले तनू दंगली
खुले ठेव डोळे शराबी नशीले मनाच्या प्रितीची कळी लाजरी

नको आठवाया विषारी शहारे नसे शांतवाया ठसे राजसा
छुप्या अंतराला तुझ्या जाणते मी नको आठवू त्या जुन्या तू व्यथा
बसावी नव्याने घडी मोडलेली करू पावलांची सख्या चाकरी
तुझ्या जीवनाच्या प्रवासामधे मी मला सांग साऱ्या मनीच्या कथा

©Sarita Prashant Gokhale सुमंदारमाला

लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे
अता जीवनाची निराशा पळ

Sarita Prashant Gokhale

वृत्तगंगा २४ कॅरेट उपक्रम क्रमांक-- १० सुमंदारमाला वृत्तलय लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा तुझ्या सोबतीच्या युगाची क #मराठीकविता

read more
वृत्तगंगा २४ कॅरेट
उपक्रम क्रमांक-- १०
सुमंदारमाला वृत्तलय

लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे 
सख्या घेत आहे तिथे मी उभारी सुखाच्या दिशेने मनाशी जुळे
अता जीवनाची निराशा पळाली तुझ्या पास आल्या सुखाच्या सरी
बसावी नव्याने घडी मोडलेली करू पावलांची सख्या चाकरी

नको दूर जाऊ अशा संधिकाली तुझ्या प्रेम वाटेत मी साजरी
खुले ठेव डोळे शराबी नशीले मनाच्या प्रितीची कळी लाजरी
छुप्या अंतराला तुझ्या जाणते मी नको आठवू त्या जुन्या तू व्यथा
तुझ्या जीवनाच्या प्रवासामधे मी मला सांग सा-या मनीच्या कथा

नको आठवाया विषारी शहारे नसे शांतवाया ठसे राजसा
अता पेलवेना निनावी तडाखे जुन्या काळजाला शोध माणसा
रहा पास माझ्या मला साथ दे तू हवा धुंद झाली निशा रंगली
तुलाही मलाही मनी ओढ वाढे इशारे नशीले तनू दंगली

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा-- सोलापूर

©Smita Raju Dhonsale वृत्तगंगा २४ कॅरेट
उपक्रम क्रमांक-- १०
सुमंदारमाला वृत्तलय

लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

तुझ्या सोबतीच्या युगाची क

CR.स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा-- सोलापूर

©Smita Raju Dhonsale वृत्तगंगा २४ कॅरेट
उपक्रम क्रमांक-- १०
सुमंदारमाला वृत्तलय

लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

तुझ्या सोबतीच्या युगाची क

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे दाही दिशा... #दाहीदिशा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndM #आई #YourQuoteAndMine

read more
थकलो जगुनी दुःखी जीवन,
सुखाच्या शोधात निघालो.
न मिळाले कुठेही सुख समाधान,
फिरुनी दाही दिशा पुन्हा घरी परतलो.
थकवा खूप जाणवला म्हणुनी,
काही क्षण आईच्या कुशीत घुसलो.
जाणवले लगेच मनाला,
खरे सुख आई जवळ 
मी उगाच दाही दिशा फिरलो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
दाही दिशा...
#दाहीदिशा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndM

vishnu thore

हंगामाचं गाव .. दु:ख विंचरता येत नाही सुखाच्या कंगव्यानं आणि देहाची गुलकाडी करून पेटवताही येत नाही आतल्या वेदनेचं चुलखांड.

read more
हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
दिवस कुरळ्या केसांसारखे 
उगवून येतात माथ्यावर जटील 
मोकळ होता येत नाही 
श्वासांच्या श्वापदांना 
व्यवस्थेच्या छिनाल हरकती 
कुठल्या मुळावर पोसत असतील ?
का उगवून येत असतील  
मनाच्या फांदीला 
अश्लील बांडगुळाचे हिरवे कोंब ?
व्यथेचा जथा 
कधी थांबत नाही रहदारीच्या मुक्कामाला 
एकांतालाच कळून येतं 
जगण्याचं शहाणपण...
तरीही 
हंगामाचं गाव आलं की 
पाय दचकून जातात वयाच्या वेशीवर .

-विष्णू थोरे  
९३२५१९७७८१ हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.

vishnu thore

हंगामाचं गाव .. दु:ख विंचरता येत नाही सुखाच्या कंगव्यानं आणि देहाची गुलकाडी करून पेटवताही येत नाही आतल्या वेदनेचं चुलखांड. दिवस कुरळ्या #nojotophoto

read more
 हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
दिवस कुरळ्या

Prerana Jalgaonkar

कालच आपलं स्वप्नं आज पुन्हा एकदा पाहूया चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया... तुझ्या नावासवे माझं नांव आज पुन्हा एकदा लिहुया चल आज पुन्हा एकद

read more
कालच आपलं स्वप्नं 
आज पुन्हा एकदा पाहूया
चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया...

तुझ्या नावासवे माझं नांव 
आज पुन्हा एकदा लिहुया
चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया...

हातात हात घालून चांदणं 
आज पुन्हा एकदा पाहूया
चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया...

आपल्या प्रीतीचा मोगरा 
आज पुन्हा एकदा फुलवूया
चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया...

आपल्या प्रेमाच्या सरीत  
आज पुन्हा एकदा चिंब भिजूया
चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया...

आपल्या ओठांचं गाणं
आज पुन्हा एकदा गाऊया
चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया...

--प्रेरणा  कालच आपलं स्वप्नं 
आज पुन्हा एकदा पाहूया
चल आज पुन्हा एकदा तिथंच भेटूया...

तुझ्या नावासवे माझं नांव 
आज पुन्हा एकदा लिहुया
चल आज पुन्हा एकद
loader
Home
Explore
Events
Notification
Profile