Find the Latest Status about चिरतरुण श्रावण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चिरतरुण श्रावण.
Durga Deshmukh
🌧️🌧️🌧️ ग्रीष्मातल्या वेदनेवर फुंकर आला घालवत माझाच श्रावण कठीण खडतर भेगामधुनी बहरत आला माझाच श्रावण काटे तुडवित वाटेवरचे फिरवित होते नशीब मला फुलापानांच्या पायघड्या आला खुलवत माझाच श्रावण मनामनात भरली तुझी न् माझी प्रेमकहानी कागदावरती सांडुन रंगआला रंगवत माझाच श्रावण ह्दयामध्ये श्वास कोंदले इतक्या होत्या विरह व्यथा नजरेमध्ये चेहरा दिसता आला हसवत माझाच श्रावण आनंदात दुष्काळाच्या सोसवेना मला झळा कंठ कोरडा कोरडा श्वास आला भिजवत माझाच श्रावण अभिमानाच्या ताठ शिरेने जमळा मेळा गंगामाई न्हाऊन जाताना आला झुकवत माझाच श्रावण दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh माझाच श्रावण
माझाच श्रावण #मराठीकविता
read moreRJG Creation