Find the Latest Status about नशीबाचा खेळ कसा चालला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नशीबाचा खेळ कसा चालला.
Pratik Patil Patu
खेळ विष-अमृताचा... तुझ्या आठवणी विषारी दररोज मारतात तुझ्याच आठवणी कशा मज दुःखात तारतात खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! सुखात तुझी आठवण तीळ-तीळ तुटते मन जरी क्षण हे सुखाचे तरी का भोगते मन ,वेदना विषाच्या खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! प्रतिकूल समयी माझ्या मी दुःखात बुडताना अमृतापरी आधार हा तुझ्या आठवणींचा खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! एकाक्षणी त्रास एकाकी होतो ह्रास एकांती हव्यास का तुझ्या आठवणींचा खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! #love #poetry खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!
Sk Mobile Repairing
कोणावरही प्रेम करणे,हा वेडेपणा. कोणीतरी आपल्यावर प्रेम करणे,ही भेट. आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यानेही आपल्यावर प्रेम करणे ही ,भेट ... ©Sk Mobile Repairing शेवटी नशीबाचा प्रश्न आहे #ishq
Sangram Anil autade
मावळतीस चालला भास्करा मावळतीस चालला भास्करा नमन करतो मी रे तुला ! तू आहेस एका जागेशी पृथ्वी फिरते गरागरा हे विज्ञानाचं तत्वद्यान पटत नाही रे मला मावळतीस चालला ...... ऊन वारा पाउस याचा आहे तू उद्गाता आम्ही भूमीची लेकरे तू तिचाही वाटे पिता उन्हाळ्यात तुझ नसणे हिवाळ्यात तुझ असंन हवं हवस वाटे मला मावळतीस चालला ..... मावळण्यान तुझ्या खग घराकडे येती पिल्ल त्यांची आनंदाने चिवचिव करती सांजवेळची चिवचिव मनास प्रसन्न करती मावळतीचा संधिप्रकाश हवाहवासा वाटे मला मावळतीस चालला.... लेकरांच्या आशेनं मायेची पावलं घराकडे चालली वासराच्या हंभरण्यान गायी गोठ्याकड धावली लेकरं किराळली वासर हंभरली सर्वास आनंद झाला. मावळतीस चालला भास्करा घरी स्वयापकाची गडबड झाली गायीची धार काढली पठण श्लोकाचा करुनी दिवा लावला देव्हाऱ्याला मावळतीस चालला भास्करा S.A. # मावळती चालला भास्करा
priyanka
"कोणाच्या ही मनाशी खेळणे" हा सध्या आवडीचा खेळ आहे; मग त्यात स्वतःची हार झाली तरी चालेल पण समोरचा दुखावला गेलाच पाहिजे. खेळ
Sujata Chavan
sunset nature कुणी नसतोच मुळी कुणाचा तरी मांडायचा सारीपाट आयुष्याचा.... खेळायचा मग डाव नात्यांचा आणि शेवटी.... एकट्यानेच निरोप घ्यायचा या जगाचा.... Yedu...!! ©Sujata Chavan #खेळ#
Kunal Salve
सोडून मला तू खेळ नवीन मांडला अर्ध्यावर बाद मी मेळ ना माझा मला लागला आस होती एक मला खेळात मला तू परत आणशील पास घेऊन मला नव्यानं डाव पुन्हा मांडशील #खेळ
gauri kulkarni
(काल्पनिक) कधी कधी फोन बंद करून बघावा 15 मि. , 1 तास मग 3 तास अजिबातच वाजला नाही की कळते आपली किंमत. तसे काही आपण खूप महत्वाच्या व्यक्ती आहोत असं नाही. पण तरीही कुठेतरी मनाचा एक कोपरा दुखावतो. कारण त्या कोपऱ्याला एक अदृश्य अशी अपेक्षा असते कुणीतरी मनापासून आठवण काढावी. तळमळून फोन करावा , संपर्क झाला नाही तर सैरभैर होऊन धावत यावं प्रेमापोटी. उगाच लोकांना काय उत्तरं द्यायची या विचारात नाही. पण नाही घडत असं काही आणि भविष्यातही कदाचित कधीच घडणार नाही याची कुठेतरी जाणीव होते. खट्टू होतं मन पण काही क्षणांपुरत कारण त्याला माहित असतं जिवंत राहायचं तर त्या कोपऱ्याकडे लक्ष देऊन चालणार नाही. तो कोपरा कितीही खरं बोलत असला तरी. आणि मग स्वतःच स्वतःला फसवण्याचा खेळ सुरू होतो.अन् सुरूच राहणार असतो श्वास संपेपर्यंत...... #मनाचा खेळ
nitsmit penshanwar
आज देखिले ते चंद्र तारे जे दिसले पाण्याच्या प्रतिबिंबातुन सारे अंधारात ही जे ना दिसले ते होते फक्त स्वप्नांचे खेळ सारे ।। स्मितनित (पेंशनवार) ©nitukolhe smitnit खेळ #City