Find the Latest Status about शोधले पाहिजे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शोधले पाहिजे.
Vilas Bhoir
उंच आभाळात पाहिल्यावर समजले पावसाचे येणे थांबले आहे हितगुज तुझ्यासवे करताना कळाले मेघांनी बरसून घेतले आहे पांघरलेली सागर निळाई त्यात शांत निसर्गाची हिरवाई चोहिकडे नटलेल्या नवलाईस नयनात माझ्या पाहिले आहे चाहुल इवल्या स्वप्नांची घेऊन एकटाच उभा झाडांपाशी पाहुन वाट तुझी मन माझे थकले आहे रानावनात नाचणारे मोर अन् आवाजांचे मंजुळ स्वर गुणगुणतांना एकांताच्या वाटेवर कोकिळेसम ऐकले आहे सावरावे कसे स्वतःला मनात राहतो नि:शब्द अबोला म्हणून मोकळे मन करण्यास तुला शोधले आहे ~ विलास भोईर ( तुला शोधले आहे ) ©Vilas Bhoir तुला शोधले आहे! #clouds
कवी - के. गणेश
संयम पाहिजे.. इथं सुखाच्या फुलासाठी संयम पाळला पाहिजे.. अन् अंधारातल्या काट्यांचा आज अर्थ कळला पाहिजे.. मनाची दोरी ओढत जगण्यातही त्याग पाहिजे.. उशिराने का होईना आलेली जाग पाहिजे.. ऊन पडूनच सावली येते थोडं तरी सोसलं पाहिजे.. रोजच्या मौज मस्तीवर कधीतरी रुसलं पाहिजे.. आज दुःखाच्या अंधारातही आपण तगलं पाहिजे.. अन् उद्याच्या सूर्यासाठी आनंदाने जगलं पाहिजे.. नियम अन् संयमाचं गणित कळलं पाहिजे. त्या निष्पाप झाडाशी जगणं जुळलं पाहिजे.. copyright के. गणेश ९०२८११०५०९ संयम पाहिजे
Pooja Navale
चेहरा कितीही लपवला तरीही चेहर्यामागचं दुःख कधीच लपत नसतं सुख कितीही ओसंडून वाहत असलं तरी मनातलं दुःख हे चेहऱ्यावर दिसतच व्यक्ती तुम्ही लाख ओळखाल हो फक्त चेहरा ओळखता आला पाहिजे चेहरा ओळखता आला पाहिजे %$%$
Shiv
हो, नवरा पाहिजे पण दुसऱ्याच्या गळ्यातला ताईत नको तर माझ्या गळ्यातला मंगळसुत्र हो, नवरा पाहिजे! ©Shiv हो नवरा पाहिजे ❣️ #Thinking
Suraj Ghorpade
*मदत करायची जिद्द पाहिजे,अडचणीत आपले असो किंवा परके रक्तात माणुसकी पाहिजे.....*💯✅