Find the Latest Status about अनाथांची आई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अनाथांची आई.
somnath gawade
अनाथांची माय आज हजारो लेकरांना पोरकं करून गेलीस. अनाथांनाही वाली असतो ही शिकवण देऊन गेलीस.. भावपूर्ण श्रद्धांजली माय! 💐💐💐 #अनाथांची माय
vaishali
🙏अनाथांची माय 🙏 चिंधी बनून तू ग जन्माला आलीस त्या चिंधीची तू सिंधूताई झालीस घेऊनि खोटा आरोप सासरच्यांनी हेटाळले नाही दिली साथ माहेरच्यांनीही फेटाळले संघर्षमय जीवन तुझे नाही मानलिस हार परिस्थितीशी लढलीस नव्हता कोणाचाच आधार दुःख स्वतःचे लपवून सुख साऱ्यांना वाटले जरी स्वतःचे होते आयुष्य हे फाटलेले अनाथांची माय तू दिलास सगळ्यांना आधार आज हरवले छत्र मायेचे करुनि जगाचा उध्दार वटवृक्षापरी तू उभी किती वाढले तुझ्या मायेच्या सावलीत दर्शन देवाचे घडले आज खरे या माऊलीत तू रचला इतिहास नवा तुझ्या कर्तृत्ववाने हळहळला आज महाराष्ट्र माऊली तुझ्या जाण्याने 🙏🙏🙏🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏🙏 अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐😔
Kushab Fajage
ओठांवर तिच्या कधी बदुवा नव्हती..😷 बस ती एक आई होती जी कधी नाराज नव्हती..😘 #NojotoQuote आई #आई#आयुष्य
Pratik Patil Patu
आई म्हणजे आई असते तिला कोणतीच उपमा नसते उपमानाला लाजवणारी, ती प्रचंड शक्ती असते. तुझ्या व्याप्तीचे वर्णन नयन माझे कसे करणार मुंगीच्या डोळ्यांना, वटवृक्ष कसा दिसणार. तुला वटवृक्ष मानलं तरी तो वृक्ष फिका पडतोय ग तुला देव म्हटलं तरी तेसुद्धा कमीच पडतंय ग देवाला तर मी मानतच नाही मी कट्टर नास्तिक तुझ्याचमुळे चमकणारा मी तुझा प्रतीक... आई... #आई #yqtai
Radhika verma( Ridhi )🥰😍
'Winter' in 3 Words ठडी आई ठडी आई, ओढ़ के बैठो घर में रजाई, बाहर बच्चों निकलना मत, पतले कपड़े पहनना मत, पहन लो कपड़े ढेर सारे, सोओ,पढो करो रटाई, खाना खाओ चाटो खटाई, ठडी आई ठडी आई। ठगी आई ठगी आई
Renu Malia
वो ज़माना ही अच्छा था, जब चिट्ठियां लिखा करते थे।मोबाइल मे वो बात नहीं।चिट्ठियां दूर वालों को भी पास कर दिया करती थी।और मोबाइल पास वालों को भी दूर कर रहे हैं। ©Renu Malia चिट्ठी आई है,आई है चिट्ठी आई है। #worldpostday
Jairam Dhongade
आईविना.... नयनात आसवांचा दाटून पूर गेला, आईच आज नाही, फाटून ऊर गेला! जन्मास घातलेला तो सुदिन आज आला, हृदयात कालवा अन् साराच नूर गेला! केले कधीच नाही मी साजरे सणाला, तू आमच्यात नाही, उल्हास दूर गेला! जाऊन लोटले ना तुज चार मास आई, आळवित राग जाता, माझाच सूर गेला! आषाढ मास आता बरसेल कैक वेळा, कसलीच ओल नाही, आला नि भूर गेला! आईविनाच यंदा सालात वाढ होई, भलताच देव खेळ्या, देऊन तूर गेला! जाणे तसेच येणे हाती न माणसाच्या, घ्या काळजी जराशी, करता कसूर गेला! ® जयराम धोंगडे, नांदेड ©Jairam Dhongade #आई