Nojoto: Largest Storytelling Platform

New स्वप्नातली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about स्वप्नातली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्नातली.

    LatestPopularVideo

Arun Chinchangi

आकाश भिसे

माझ्या गावातली पहाट

पहाटेच्या सुमारास मंद गार वारा वाहतो आहे काय...
मायेच्या पंखाआड झोपलेली पक्षांची पिलं चिवचिव करायला लागतात काय...
पक्षी आपल्या पिलांना अन्न शोधण्यासाठी भटकंती करायला लागतात काय...
भुकेजलेली गाई म्हशींचे वासरं धारेसाठी हंबरडा फोडीत आहेत काय...
तोच तो सूर्य डोंगराआढ सोनेरी किरणांच्या नवीन आशा घेऊन उगवत आहे काय...
गवतांच्या पात्यांवरील दवबिंदुना पाहून वाटते कि, भास्करने हिरे फेकले आहेत काय...
नदी नाल्याच्या पाण्यावररील वाफानी जणू ढगांचा आकार घेतला आहे काय...
डगमगलेली वेली मान वर करून पाहत आहेत काय...
शेतांमधली सूर्यफुलाची झाडं सूर्याकडे टक लावून पाहत आहेत काय...
गावातील तरुण मंडळी तालीम करत सूर्यनमस्कार घालत आहेत काय...
राऊळांमधून भगवंताच्या नावाचा व घंटीचा गजर ऐकू येतोय काय...
"सकाळच्या पारी हरिनाम बोला" आसा गोड आवाज कानी पडतोय काय...
माय माउली आपलं घर स्वछ करून दरवाजामध्ये रांगोळी काढत आहेत काय...
भोळी भाबडी व समाधानी माणसं ती आणि माणुसकी तर लई हाय...
दररोज आपला भूतकाळ विसरून उत्साहानं धडपड करायला लागतात काय…
सर्वानी ठरवलंय कि, आपल्याला प्रगतीचे शिखर गाठायचे हाय...
आणि हेच माझ्या गावातल्या पहाटेच सुंदर दृष्य हाय...
आणि माझ्या कायम आठवणीत राहणार माझ हे गाव हाय...


                                                           © कवी: आकाश रामराव भिसे #स्वप्नातली_पहाट

Arun Chinchangi

Arun Chinchangi

#स्वप्नातली परी...

वाटतं...मलाही असावं कोणी जीवाभावाचं
तो भाव माझ्या जीवाचा तूच असशील का ?
सांग, माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...?

घालतोय साद तुला...
ती साद माझ्या हृदयाची तु ऐकशील का ?
रंगवायचंय चित्र आयुष्याचं मलाही...
त्या चित्रातील ते रंग आयुष्याचे तू बनशील का ?
सांग, माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...?

गायचंय बेभान होऊन प्रेमगीत तुझ्यासवे...
त्या गाण्यांचा माझ्या आवाज तू होशील का ?
व्हायचंय लिहतं तुझ्याचसाठी...
ते शब्द तु माझे होशील का ?  
सांग, माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...?

बांधायचीय न सुटणारी कधीही...
ती गाठ जीवनाची तु बनशील का ?
पहायचंय...अन् पाहतच तुला रहायचंय...
मग ती नजर तु माझी होशील का ?
सांग, माझ्या स्वप्नातली परी तु   होशील का...?

घुसमटलेत श्वास तुझ्या अाठवांनी...
त्या घुसमटल्या श्वासांना मोकळे  तु करशील का ?
निर्जीव झालाय हा देह सखे...
या देहात तु प्राण नवा फुंकशील का ?
सांग, माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...?

निरर्थक आहे हे जगणं तुझ्यावाचून...
आता या जगण्याला अर्थ तु नवा देशील का ?
तुझ्याशिवाय नाहीच जगायचं...
जगण्याचं माझ्या ते कारण तु बनशील का ? 
सांग, माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...?

बुडायचंय आकंठ प्रेमात तुझ्या...
साथ आयुष्यभर तु मला देशील का ?
मी म्हणजे तु अन् तु म्हणजेच मी...
समीकरण हे जीवनाचे माझ्या तू बनशील का ?
सांग, माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...?

वाट पाहतोय अगदी वेड्यासारखा...
प्रेमवेड्याची या ती वाट स्वर्गीय तु बनशील का ?
सांग, सखे माझ्या स्वप्नातली परी तु होशील का...? 

 ✍ - अरुण शि.चिंचणगी.                                                                                                                                                                                                                                                                                                  माणगांव ता.चंदगड  जि.कोल्हापूर
२३/१०/२०१९ #स्वप्नातली_परी...

Sanket D Thorat

Aarya Rathod

स्वप्नातली परी

read more
स्वप्नात बहरुन  
              आली ती
             परी सारखी
      मन गेलाय फुलून माझ,
           ती फूलासारखी...

          कुठ गेली शोधतो
           मि तीला स्वप्नात,
           कुठ गेली शोधतो
           मि तीला स्वप्नात...

             नदीच्या काठी 
             हिरव्या रानात
           मन शोधतो तिला
            स्वप्नाच्या भानात...
           
           स्वप्नाला नवे नवे
               पंख आली
              भहरुन गेली
               गगन सारी...

           आली जवळ ती,
          काही तरी बोलली
            माझ्या कनात...

             नदीच्या काठी 
             हिरव्या रानात
           मन शोधतो तिला
            स्वप्नाच्या भानात...

          _ अरविंद राठोड स्वप्नातली परी

kamble prashant

स्वप्नातली ती #violin

read more

Aarya Rathod

माझ्या स्वप्नातली परी...

read more
*माझ्या स्वप्नातली परी*
**********

   माझ्या स्वप्नानातली 
        परी असावी ती,
               जनु
         नव्या पंखानं
       सजविन मी तिला

         कोमल कोमल
          हातांचे स्पर्श 
               तिचे 
        घेऊन आभाळात 
            फिरविन मी
                तिला...

          दुःखाची  सावली 
       कधी पडू देणार नाही
              तिच्यावर

          दुःखाची  सावली 
       कधी पडू देणार नाही
              तिच्यावर,

                कारण
        आयुष्यभर फुलात
          ठेविन मि तिला
   
      _ अरविंद राठोड माझ्या स्वप्नातली परी...

yogesh atmaram ambawale

घारे घारे डोळे तुझे,भुरे भुरे केस
तुझ्या हृदयात येऊन राहण्या,
पार केली माझ्या मनाने वेस. #बार्बी #स्वप्नातली परी
#कल्पना #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with Kalpana Halge

उ.सु

मला माझ्या स्वप्नातली राणी हविय..!! poem marathipoem love nojoto onesidelovers

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile