Nojoto: Largest Storytelling Platform

New चालत्या बसमध्ये Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चालत्या बसमध्ये from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चालत्या बसमध्ये.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हवाहवासा... #हवाहवासा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
आठवतो आज ही मला तो हवाहवासा वाटणारा प्रवास,
ज्यात काही काळासाठी लाभला होता मला तिचा सहवास.
अनोळखी ती मी ही तिला अनोळखी होतो,
तरीही जुनी ओळख असल्यासारखा मी वागत होतो.
गर्दी खूप होती बसमध्ये बसायला ही जागा नव्हती,
नीट लक्ष दिल्यावर समजले तिची सीट रिकामी होती.
आलो जवळ बॅग उचलायला लावली,
बसलो सीटवर तेव्हा मनाला शांती लाभली.
कंडक्टर आला नि तिकीट विचारले,
जायचे होते जिथे मला तिनेही तिथलेच तिकीट काढले.
बोलावे तिच्याशी मनी खूप ईच्छा झाली,
"गर्दी खूप आहे ना बसमध्ये" बोलून सुरुवात केली.
मीच बोलत राहिलो ती फक्त हू हू करत गेली,
स्टॉप आला आमचा नि बस ही थांबली.
मी उतरलो खाली माझ्यामागे ती ही उतरली,
दिला आवाज रिक्षावाल्याला बसुनी रिक्षात निघून गेली.
माझी दिशा वेगळी तरीही नजर तिच्या रिक्षावरच राहिली.
आला जेव्हा आज YQ वर "हवाहवासा" विषय तेव्हा ही सफर आठवली,
प्रवासाची ही गोष्ट मनात कायम घर करून राहिली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हवाहवासा...
#हवाहवासा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuoteAndM

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझी अवस्था... #माझीअवस्था #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. तुमचे विषय #YourQuoteAndMine

read more
नुसतीच दगदग,खूप सारा त्रास,
माझी अवस्था काय सांगू मन होते उदास.
कामाचा व्याप,मुलांचा अभ्यासाचा ताप,
त्यात कामावर येता जाता वाहतूककोंडीचा जाच.
जीव नकोसा होता,खूप वैतागतो,
काय सांगू माझी अवस्था कसा मी राहतो.
पण मग शांत बसतो जेव्हा हे समजतो,
माझ्या सौ च्या त्रासापुढे माझी अवस्था काहीच नाही हे जाणतो.
ती बिचारी सकाळी-सकाळी लवकर उठते,
मुलांना शाळेसाठी तयार करते.
शाळेत सोडुनी मुलांना लगेच स्वयंपाकाला लागते,
उरकुनी स्वयंपाक घाईघाईत कामाला निघते.
संध्याकाळी पुन्हा तीच दगदग असते,
येताच कामावरून स्वयंपाकाच्या मागे लागते.
स्वयंपाक उरकून होताच मुलांचा अभ्यास घेते.
मी तरी बाईक वरून येतो,
ती मात्र बसमध्ये वाहतूक कोंडीतून थकून येत असे.
तिची ही अवस्था पाहता,
माझी अवस्था मला काहीच वाटत नसे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझी अवस्था...
#माझीअवस्था
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
तुमचे विषय

yogesh atmaram ambawale

हल्ली बऱ्याच ठिकाणी खूप घाणेरडी,गलिच्छ,किळसवाणी अशी भाषा ऐकायला मिळते.. #yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गलिच्छ #किळसवाणी फालतू_बात #yqtaai #फालतू_बातें

read more
फालतू बोलणे...

किती गलिच्छ बोलणे ह्यांचे,आणि किती घाणेरडी भाषा,
विचारांची पायरी घसरत चाललीय ह्यांची,कुठेही ह्यांचा तमाशा.
चालताना,फिरताना किंवा चौकात कुठेही उभे असताना,
बेफिकिर मुले हल्लीची,काहीच वाटत नाही ह्यांना घाणेरडी भाषा वापरताना.
रिक्षात असो किंवा बसमध्ये,किंवा असोत कुठल्याही दुचाकी वाहनावर,
मोठ्या मोठ्याने इतके घाणेरडे शब्द वापरतात,जीभ नसते ह्यांची थाऱ्यावर.
छान सुंदर नाव ठेवलेले असतात आई-वडिलांनी, आपल्या ह्या मुलांची,
पण हे पोरं जेव्हा जमा होतात,सत्यानाश करतात त्यांच्या नावाची.
ऐकायलाही खूप घाणेरडे वाटते,असे एकमेकांना हल्ली हाक मारतात,
बोलताना एकमेकांशी,प्रत्येक शब्दात आई-वडिलांची आठवण काढतात.
कुठल्या शहरात,कोण पोरं कसे वागतात,हे काय मला माहित नाही,
पण आमच्या शहरातील भाषा ऐकून,कानावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाही
आई-वडिलांची आठवण तर असतेच ह्यांना एकमेकांशी बोलताना,
पण शरीरावरील कुठले अंग ही सोडत नाहीत, एकमेकांना हाक मारताना.
अभिमान असतो प्रत्येकाला आपल्या शहराचा,पण मला लाज वाटते,
शेवटी सत्य ते सत्य,काहीही झाले तरी स्वीकार करावेच लागते.
तसे अभिमानास्पद कित्येक गोष्टी आहेत माझ्या शहरात,ज्या अभिमानाचा भाग आहे,
पण अशा गलिच्छ,घाणेरड्या भाषा बोलणाऱ्या लोकांचाच मला राग आहे. हल्ली बऱ्याच ठिकाणी खूप घाणेरडी,गलिच्छ,किळसवाणी अशी भाषा ऐकायला मिळते..
#yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गलिच्छ #किळसवाणी #फालतू_बात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile