Nojoto: Largest Storytelling Platform

New बालकविता संग्रह मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बालकविता संग्रह मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बालकविता संग्रह मराठी.

Stories related to बालकविता संग्रह मराठी

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

#Sad_Status मराठी कविता संग्रह मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता प्रेमाच्या

read more
White *एक वॅलेनटाईन असा...*

तिचा तो गुलाब नको मला
तिचा होकार सुद्धा नको मला,
एकटाच सुखी आहे आयुष्यात.
तिच्या खोट्या प्रेमाची भीक नको मला...

तिचा चॉकलेट - रुपी मोह नको मला
तिच्या स्वार्थी प्रशंसा सुद्धा नको मला,
स्वतःच विकत घेऊ शकतो सगळंच.
तिचे बिनकामाचे ते बाहुले नको मला...

तिचे आणा - भाका देणे नको मला
तिचे साथ देणे सुद्धा नको मला,
मी मलाच साथ देईन सदैव.
तिच्या ओठांचा स्पर्श नको मला...

तिच्या सोबतीची मिठी नको मला
तिच्या संगतीचा सहवास सुद्धा नको मला,
स्वतःच स्वतःच्या कुशीत झोप घेईन.
तिची प्रेम स्वप्ने नको मला...

तिची आठवण परत नको मला
तिची मनात साठवण सुद्धा नको मला,
एकटाच माझं आयुष्य पणाला नेईन.
तिचा अर्ध्यावरचा साथ नको मला...

काव्यांकुर तो _मयुर सं. लवटे
आर्वी वर्धा, महाराष्ट्र
मो. नं.:- 7028426669

©मयुर लवटे #Sad_Status  मराठी कविता संग्रह मराठी कविता प्रेम मराठी कविता मराठी कविता प्रेमाच्या

काव्यांकुर तो_मयुर सं. लवटे

#Thinking मराठी कविता संग्रह मराठी कविता मराठी कविता प्रेमाच्या

read more
White *🥔🍆 आलू-वांग्याची भाजी आणि प्रेम! ❤️*

प्रेम म्हणजे नव्हते कधीच महागडे हॉटेल,
ना गुलाबांच्या फुलांनी सजवलेले टेबल...

प्रेम होतं त्या मायेच्या स्वयंपाकघरातून येणारा सुवास,
ज्याला यायचा आलू-वांग्याच्या भाजीचा दरवळ खास!

ती म्हणायची, "आज काय खायचंय का तुला खास?",
मी म्हणायचो, "काहीही चालेल, तू बनवलेलं असलं की बास!"

ती अलगद हसायची, हळूच गोड लाजायची,
मग स्वयंपाकघरात जेवणासाठी एकटीच गुंतून जायची...

त्या चुल्ह्यावर भाजीसारखं प्रेम तिचं शिजवायची,
त्या फोडणीत माया, ममता तिची मिसळायची...

त्या वांग्यात प्रेमाचा गरम मसाला टाकायचा,
त्या आलू सोबत जगण्याचा गहिवर दाटायचा...

कधी मी नाक मुरडायचो, म्हणायचो "आजही वांगं?",
ती म्हणायची, "प्रेम केलं की आवडीनं रोज खावं!"

मग एक घास तोंडात माझ्या ती भरवायची,
त्या वांग्याच्या चवीतही प्रेम तिचं वाढायची...

आजही आलू-वांग्याची भाजी समोर कधी आली,
तर आठवतात तिच्या सोबतचे ते तिखट-गोड क्षण...

कारण प्रेम फाईव्ह स्टारच्या डिशमध्ये कधीच नसतं,
तर ते घरच्या गरम चपाती आणि त्या साध्या भाजीच्या घासात असतं!

❤️ प्रेम म्हणजे आलू-वान्ग्याची भाजी चं नातं,
साधं, पण आयुष्यभर सोबत राहणारं! ❤

काव्यांकुर तो _मयुर सं. लवटे

©मयुर लवटे #Thinking  मराठी कविता संग्रह मराठी कविता मराठी कविता प्रेमाच्या

Mayuri Bhosale

चारोळी मराठी कविता संग्रह

read more
White  चारोळी....
वाट दिसेल तुलाही 
खचून तू जाऊ नकोस 
विश्वास ठेव विधात्यावर 
प्रयत्न मात्र करायचा कधी सोडू नकोस

©Mayuri Bhosale चारोळी  मराठी कविता संग्रह

Narendra Vyawhare

#Book मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेम मराठी कविता संग्रह प्रेरणादायी कविता मराठी

read more
Unsplash शेताच्या त्या बांधावर 
माझं कुडाच ते घर 
स्वर्गालाही लाजवील ऐस माझ घरदार 
माय शोभे चुल्ह्या पाशी जैसी रखुमायी वाणी,
बाप माझा पुंडलिक करी सुखाची पेरणी 

ऐसा संसार संसार नाही आनंदाला पार,
स्वर्गालाही लाजवील ऐस माझं घरदार 

नाही कधी ताटातूट माझ्या माय नी बापाची,
बाप जरी तो कठोर माय हळव्या मनाची 
नसे पैसा जरी हाती, तरी केल सपान ते  पूर 
घाम गाळून बापानं शेत पीकविल सार 

घरोघरी असतात बाई मातीच्या गं चुली,
लेक करता घरचा, परक्याच धन मुली
कष्टा परिस ना वाट, शेतकऱ्याच्या घराला 
लेकराच्या सुखासाठी बाप स्वतः जुपे नांगरला 
ऐसा सोन्याचा संसार मला दाखवा जी बर 
स्वर्गालाही लाजवील ऐस माझं घरदार

©Narendra Vyawhare #Book  मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेम मराठी कविता संग्रह प्रेरणादायी कविता मराठी

komal borkar

#sad_quotes मराठी कविता संग्रह

read more
White फातिमा! 

निर्भयतेने लढणारी फातिमा
उस्मान शेखची बहीण होती
स्त्रि शिक्षणाची मशाल पेटविणारी
फातिमा  समाजाची ढाल होती!

परंपरेला न जुमानता 
घरोघरी जाऊन साक्षरतेचे धडे दिले, 
जात, धर्म बाजुला ठेवून
इथल्या बहुजनांना शिकविले! 

सावित्रीसोबत शिक्षण घेऊन
शाळेत जाऊन शिकवू लागली
शिक्षणाची ढाल पाठीशी घेऊन
पहिली मुस्लिम शिक्षिका झाली! 

घर सोडले फुले दाम्पत्याने
तेव्हा आसरा दिला फातिमाने
शाळा उघडली सावित्रीने
तेव्हा सहकार्य केले नैतिकतेने! 

अन्यायाचा प्रतिकार करत
न्याय दिला  गोरगरिबांना
स्त्रियांच्या पाठीशी खंबीर राहुन
कणखर बनवलं दीनदुबळ्यांना!

©komal borkar #sad_quotes  मराठी कविता संग्रह

Vishwa

#Emotional मराठी कविता संग्रह

read more

Anisha Kiratkarve

#lovelife मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता चारोळ्या शुभ सकाळ मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम स्टेटस

read more
Unsplash सांग कधी भेट झालीच आपली,

गालावर हसू आणशील का

अधुरे राहिले स्वप्न आपुले पूर्णत्वास नेशील का....

सांगशील का दुःख स्वतःचे , माझेही ऐकून
घेशील का ,
मी कधी ना तुझी जाहले ,तू तरी माझा होशील का .


तुझी यातना तुझे दुःख सारे काही ऐकून आहे,

विरहात तुझ्या मीही सख्या रोज प्रणयात  जळते आहे...

©Anisha Kiratkarve #lovelife  मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता चारोळ्या शुभ सकाळ मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता संग्रह मराठी प्रेम स्टेटस

Anisha Kiratkarve

#SunSet मराठी कविता संग्रह मराठी कविता कविता मराठी मैत्री मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह

read more
a-person-standing-on-a-beach-at-sunset आज असा कसा खेळ रंगला माझा माझ्याच मनावर्ती,
उगाच भांडते उगाच रुसते, नेमक बोलू कोणावरती...

खूप काही आहे बोलण्यासारखे ,पण बोलावेसे वाटत नाही,
कठीण होत आहे जगणे,जगता मला येतच नाही.....

आज पुन्हा वाटते तीच भीती पुन्हा आवडतोय एकांत
प्रेम कसे हे वाढत जाते काय कळेना दोघांत....

©Anisha Kiratkarve #SunSet  मराठी कविता संग्रह मराठी कविता कविता मराठी मैत्री मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता संग्रह

Samadhan Navale

#Sad_Status मराठी कविता संग्रह

read more
White ©samadhan patil Navale
गेले ते जुने वर्ष आता,
होतोय मनी हर्ष  आता ||
दुःखी कष्टी वर्षातुन, सुखद नूतन वर्षाकडे
असत्याकडून सत्याकडे.. गोंधळातून शांतीकडे,
करा तयारी स्वागताची, येणाऱ्या नव्या मित्राची
परंतु जून्या वर्षमित्राचा तिरस्कार कदा न करता

गेले ते जुने वर्ष आता ||

झाले गेले विसरून जाऊ, वर्षभराचे कौतुक पाहु
काय मिळवले किती गमवले याचा मनी हिशेब लावू,
गतवर्षी पासून अनुभव घेऊ, आता आम्ही शहाणे होऊ
संकल्प करुया नववर्षाचा,पीडीतांच्या आम्ही कामी येऊ
करुया सेवा या देशाची,जगता जगता मरता मरता

गेले ते जुने वर्ष आता ||

"नववर्ष सुखाचे जावो" असे सर्वां शुभेच्छा
आपल्या सर्व नित्यकार्या,करत रहा कायावाचा,
होऊ नका देऊ कधी,घात कुणाच्या विश्वासाचा
संकल्प करू अवघे धरू,चरण त्या सत्पुरुषाचे
लोककल्याणासाठी ज्यांनी,रान केले जीवाचे,
गौरवशाली इतिहासाची, पुज्य आपली भारतमाता
गेले ते जुने वर्ष आता, झाला मज हर्ष आता ||

©Samadhan Navale #Sad_Status  मराठी कविता संग्रह

Vilas Bhoir

#Newyear2024-25 निरोप समारंभ मराठी कविता मराठी कविता संग्रह मराठी कविता संग्रह मराठी कविता

read more
New Year 2024-25 नवी नवी नवलाई
ओठी आनंदाचे गाणे
नवीन आले हे वर्ष 
जाईल का रे सुखाने

एकामागे एक प्रश्न 
किती शोधावी उत्तरे
संकटातल्या चाहुलीचे
मागचे ते वर्ष सरे

नववर्षाच्या येण्याने 
विश्व अंबरी उजळु दे
सुख समृद्धी आनंदाचे 
स्वप्न रंगांनी भरू दे

त्याच त्या आठवणींना 
थोडासा विसावा देऊ
नवीन या स्वप्नांनी 
उत्तुंग भरारी घेऊ

गतकाळाचा डोई भार
विसरून जाऊ निराशा 
रुपरंग नवे नवेसे
नव्याने जागवु आशा
                                                 ~ विलास भोईर

©Vilas Bhoir #NewYear2024-25  निरोप समारंभ मराठी कविता मराठी कविता संग्रह मराठी कविता संग्रह मराठी कविता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile