Nojoto: Largest Storytelling Platform

New टक्क लावूनी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about टक्क लावूनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टक्क लावूनी.

    PopularLatestVideo

Diksha Wardhe

दिवाळी साजरी करू दिवे लावूनी, नात्यातील प्रेम वाढवू फराळाचे ताट देवूनी

read more
सणाचा मान आहे फराळाच्या ताटाणि,
नात्याचा मान आहे नात्यातील प्रेमाने.
साखरेचे गोड गोड आहे हे लाडू,
नात्यातील प्रेमाचा गोडावा वाढवू.
साखरेच्या पाकात गुलाब जाम सोडु,
दिव्याची ज्योत पेटवून आनंद वाढवू.
फराळाचे ताट आपल्या हातांनी सजवू,
नात्यातील रागाला जरास दूर हटवू.









 दिवाळी साजरी करू दिवे लावूनी,
नात्यातील प्रेम वाढवू फराळाचे ताट देवूनी

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे तुझी पल्याडची वाट.. #तुझीपल्याडचीवाट चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
डोळे लावूनी बसतो त्या वाटेवर,
ज्या वाटेवरून तू जाते.
दिसते मात्र नेहमीच,
पण कधी भेट न होते.
भेटावे वाटे नेहमी
खूप काही तुला सांगावे वाटे.
पण कसे हे होणे,
नदीच्या आल्याडची माझी वाट,
तर तुझी पल्याडची वाट.😔 सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
तुझी पल्याडची वाट..
#तुझीपल्याडचीवाट

चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों सर्वांना विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा आणि 63 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा. आजचा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #दसरा

read more
श्री राम गुणांचा स्वीकार करा,
रावण रुपी दुर्गुणांचे दहन करा.
आला आला दसरा,
सुखास साद घाला,दुःख सारे विसरा.
तोरण लावूनी दारा,
आपट्याचे पान देत सण करा साजरा. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
सर्वांना विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा आणि 63 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा.
आजचा विषय

अंदाज़ ए बयाँ...

Oh My Hero शिवबा Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला ज़ात पात चे बंधन तोडून, न्याय द्या धर्माला निस्त मिश्या दाढ़ी वाढवुनी फिरतात मावळे गर

read more
Oh My Hero शिवबा 

Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला
ज़ात पात चे बंधन तोडून, न्याय द्या धर्माला 

निस्त मिश्या दाढ़ी वाढवुनी फिरतात मावळे
गरीब जणांना त्रस्त कराया यांना किती आवडे
तुमच्या नावा खाली ह्यांच्या भान नाही कर्माला

Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला...

अमचं तुमचं करू लागले स्वराज्याचे वीर 
शत्रू डोळे लावूनी बसले, "कब बटेगी खीर"
आपली बाणे भेदू लागली आपल्याच हृदयाला

Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला...

ह्यांची ताकत बदलू लागली इतिहासाचे धडे
स्वप्न ह्यांचे आणू लागले देशात अरथळे
तुम्हीच आता थांबवू शकता ह्या विषारी जीवाला

Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला...

रविकुमार Oh My Hero शिवबा 

Oh My Hero शिवबा, या पुन्हा जन्माला
ज़ात पात चे बंधन तोडून, न्याय द्या धर्माला 

निस्त मिश्या दाढ़ी वाढवुनी फिरतात मावळे
गर

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हिरवी संपत्ती.. #हिरवीसंपत्ती चला तर मग लिहुया. झाडे लावा,झाडे वाचवा #Collab #yqtaai Best YQ Marathi Qu #YourQuoteAndMine #yqmarathiquotes

read more
गावात राहणारा मी,
प्रेम माझे झाडेझुडपांवरी.
तोडली नाही कुठलीही झाडे,
रोपटे लावूनी ती अजून वाढविली.
धनवान खरा मी,
अमाप अशी माझ्याकडे हिरवी संपत्ती.
तोडले जात असताना झाडेझुडपे,
मी मात्र ती जगवली.
पर्यावरण वाचावे,शुद्ध मोकळी हवा खेळावी 
म्हणून मी ही हिरवी संपत्ती जमविली.
विनंती आपणास आपणही हेच करावे,
झाडे लावावी,झाडे वाचवावी.
कधीही जी संपणार नाही,
अशी हिरवी संपत्ती जमवावी. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
हिरवी संपत्ती..
#हिरवीसंपत्ती
चला तर मग लिहुया.
झाडे लावा,झाडे वाचवा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Qu

yogesh atmaram ambawale

झाली सारी तयारी मयताची,रडारड साऱ्या नातेवाईकांची.
खूप वेळ झाली म्हणत पार्थिव उचलले,
स्मशानभूमीच्या दिशेने साऱ्यांनी पाऊले उचलली.
जय राम श्री राम चा गजर सर्व मुखी,
खांदा लावूनी पार्थिवास दुःखात सहभाग दर्शवी.
मडका धरलेल्याच्या खांद्यावर ठेवी हात कुणी,
तर लाया,फुले वाहणाऱ्या सोबत इतर कुणी.
पोहोचताच स्मशानभूमीत आराम करण्या,जो तो जागा शोधी,
सरपण रचून पार्थिव ठेवता,पाणी पाजण्या भाचाला शोधी.
घोळके जमा जिथे तिथे,मयता बद्दल वार्ता इथे तिथे.
चांगले झाले सुटला म्हणे कुणी,तर खूप वाईट झाले असेही म्हणे कुणी.
दिली अग्नी,मूठ माती ही झाली,पळण्याची लगेच सगळ्यांची घाई झाली.
कुणीच न स्मशानात पार्थिव एकटाच जळत राही,
कुणाला घरी तर कुणाला कामावर जाण्याची घाई राही.
पाहता ही अंत्ययात्रा एकच गोष्ट लक्षात येई,
कितीही जुळली नाती तरी मनुष्य एकटाच जाई.
काही दिवस दुःख घरच्यांना तर काही क्षण समाजाला,
पुन्हा तेच वागणे सर्वांचे,आठवण फक्त वर्षावर्षाला. अंत्ययात्रा..
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #स्मशानभूमी #अंत्येष्टी #अग्नीदहन #शेवटचाप्रवास 
झाली सारी तयारी मयताची,
loader
Home
Explore
Events
Notification
Profile