Find the Latest Status about गारदी म्हणजे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गारदी म्हणजे.
Santosh Jangam
Subodh Joshi
गारदी तेंव्हा ही होते गारदी आज ही आहेत शासना पासुन दूर मोकाट सुटलेले " ध " चा " मा " केलेला खलिता हाती पडताच उसळले, उधळले ,धावले कृतांत काळ होते गारदी ते कोवळी पोर ती आनंद, माय-बापा अन् जनास एकटीच खेळे अंगणी निरागस, निष्पाप कळी एक नवथर पोरवयीन पोर ते खेळण्या बागडण्यात दंग पाहूनी कृतांत त्या गारद्यांस धाव घेई महालात कळीस त्या काय कळे निरागस हास्य मुखी विराजे गारद्यांसी काय कवतूक त्याचे बळे उचलती कवे घेती लिलया पाहूनी काळकराल गारद्यांस " काका मला वाचवा " धावे सैरावैरा दाही दिशा दुमदुमे आर्त टाहो महाली कळीस कळले, उमजले हैवान हे तर सारे कळवळून, जोडूनी दोन्ही कर म्हणे सोडा नं मला, " दादा, भाऊ, काका " धावले गारदी, धरिले त्यास एकाच घावात, छेदीले शिरास तुटूनी पडती, सैतान, शीलभ्रष्ट क्षणात अचकट, विचकट हास्य त्यांचे आसमंतात नवथर पोर ते रक्ताच्या थारोळ्यात कळी तीही उमलण्या आधी रक्तरंजित, रक्तबंबाळ गारदी तेंव्हा ही होते गारदी आज ही आहेत शासना पासुन दूर मोकाट सुटलेले ©Subodh Joshi गारदी Santosh Kumar Pooja Udeshi pinky masrani Sonika Pal सपना मीना
Ritu Patil
प्रेम म्हणजे जगातील सर्वात सुंदर अनूभुती..... प्रेम म्हणजे हृदयाला कोणीतरी मनापासुन आवडणे.... रोज त्याच्या नकळतपणे त्याला बघून त्याची प्रतिमा डोळ्यात साठवणे म्हणजे प्रेम..... सकाळची पहिली आठवण आणि राञी झोपण्यापूर्वी येणारा विचार म्हणजे प्रेम..... त्याच्या आठवणीतच राञीची झोप मध्येच तुटणे म्हणजे प्रेम... मनात सारखे त्याचेच विचार चालू असणे म्हणजे प्रेम..... त्याच्याशी बोलूनच मनाची तहान भागून मन तृप्त होणे म्हणजे प्रेम.... दूर असली तरीही त्या व्यक्तीला कुठेतरी जवळपास शोधत राहणे म्हणजे प्रेम..... राग असूनही त्याच व्यक्तीशी बोलण्याची ओढ असणे म्हणजे प्रेम.... त्या व्यक्तीच्या मैसेजची रोज वाट पाहणे म्हणजे प्रेम... तसेच मैसेज न आलेला पाहूनही नाराज होणे म्हणजे प्रेम.... मी स्वतःहून काॅल, मैसेज करणार नाही... तिला / त्याला गरज असेल तर करेल असा मुद्दाम ॲटीटयूड दाखवून बोलणे पण तरीही बोलण्याची ओढ असणे म्हणजे प्रेम.... त्या व्यक्तीशी बोलताना चेहऱ्यावर सतत एक गोड स्माईल असणे म्हणजे प्रेम.... त्याच व्यक्तीचा कानात बोलण्याचा सतत आवाज घुमत राहणे म्हणजे प्रेम... सतत काळजी वाटत राहणे म्हणजे प्रेम..... नुसतं नाव ऐकून पण हृदयात एक अनामिक हुरहुर लागणे... हृदयाची धडधड वाढणे म्हणजे प्रेम.... प्रत्येक प्रीतशब्दाला कवितेच्या रुपात विणायला आवडणे म्हणजे प्रेम.... बोलत नसतांना आठवण आल्यावर एकांतात बसून रडणे म्हणजे प्रेम..... गार वार्याच्या झूळुकसोबत, पावसाच्या रिमझिम सरींसोबत, सकाळच्या कोवळ्या किरणांसोबत, फुलांच्या मोहक सुगंधासोबत.... बहरलेल्या ऋतूसोबत आपल्या आवडत्या व्यक्तीची आठवण येणे म्हणजे प्रेम.... प्रेमात कधीही तुझं माझं नसतं... जे काही असतं ते सगळं आपलं म्हणून असतं...... प्रेम करावं तेवढं कमीच असते कारण प्रेमाला कोणतीही सीमाच नसते...... 🍓S@♏i🍓꧁ ✯༒𓆩𝓡𝓚 ༒✯꧂? ©sami Patil प्रेम म्हणजे जगातील सर्वात सुंदर अनुभुती....❤️❤️
Monika
प्रेमा मध्ये वाद नाही संवाद असावा,राग नसून अनुराग असावा, एकमेकांसाठी जीव देण नसावं, तर एकमेकांना जीव लावणं असावं, एकमेकांच्या विषयी नेहमी आदर असावा, मी आणि माझं असं काही नसावं, आपण आणि आपल हे असावं, म्हणतात घर,प्रॉपर्टी आणि चांगल्या पगाराची नोकरी असलेला जर मुलगा जर कोणत्याही मुलीला मिळाला तर तीच आयुष्य खूप सुखद होईल,तस हे योग्य आहे. पण सर्व सुख असून ही कणभर ही प्रेम तो मुलगा तीला देऊ शकला नाही तर अश्या सुखद आयुष्याला काय बर अर्थ आहे. आता हेच पहा ना कृष्णासाठी राधा ही रडली आणि मीरा ही रडली पण,दोघींनी ही त्याच्या वर प्रेम केल पण त्याची प्रियसी ही राधा च आहे ना, म्हणून प्रेम आंधळं ही नसाव, आणि स्वार्थी पणा ही नसावा. प्रेम म्हणजे आहे तरी काय एकमेकांची ओढ की फक्त मोकळ्या वेळातला टाइम पास, ©Monika #girl प्रेम म्हणजे नक्की काय?