Find the Latest Status about लावणी छंद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लावणी छंद.
Rajendrakumar Shelke
*मोहरली लेखणी साहित्य समुह आयोजित लावणी कार्यशाळा उपक्रम* *विषय:-घुंगरू* ********************************************************** वयात आली, अंगानं भरली,उपवर मी झाली, अंगापिंडान भरली काया, मुखावर पांगली लाली.!!धृ!! नाजूक पायी चाळ बांधले,थिरकत आले जवळी, प्रितीत घेऊन गोंजरा राया,भरल्या कातरवेळी घालवू नका वेळ,आता सांज बघा झाली.!!१!! अंगापिंडान भरली काया,मुखावर पांगली लाली..।।१।। चला सोबतीने जाऊ,ठसक्यात लावणी गाऊ, घुंगराची सारी माया,मनात भरून पाहू आस तुमच्या संगतीची लागली!!२!! अंगापिंडान भरली काया,मुखावर पांगली लाली. थयथय करता घुंगरू वाजे,शब्दांच्या तालात काळजाचा ठाव वाया जाई,मन वेडे घुंगराच्या नादात सख्या मला तुमची भुरळ ही पडली!!३!! अंगापिंडान भरली काया,मुखावर पांगली लाली....! ------------------------------------------------------ *✍️ प्रा.राजेंद्रकुमार शेळके* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke लावणी #feellove
Rajendrakumar Shelke
💃♥️ लावणी लेखन ♥️💃 तुमची मर्जी राखण्याचा, राया बांधला हो मी चंग या भेटीस साजणा तुमी, खेळू रातीस इश्काचा रंग ||धृ|| नेसला शालू भरजरी अंगावरी बघा उठून दिसते मी नवरीपरी.. तुम्ही यावं आज संगतीला माझ्या प्रीतीसाठी मन बावरले आज माझे तुमच्यासाठी...१ माझ्या काळजात होई धडधड सपनात झाली ती धरपकड सख्या अशा रंगल्या या गोड राती प्रित फुलेल आपुली इश्काच्या या खेळाभोवती...२ माझी जणू रसाळ, रूपवान काया मला मिठीत,घ्यावं तुम्ही राया पाकळ्या गुलाबी तुम्हांवर, उधळते साजना तू माझीच प्राणप्रिये, मला जवळी घेऊनी म्हणा....३ --------------------–--------------- ✍️राजेंद्रकुमार शेळके. -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke लावणी #withyou
prajjval
राजनीति बसती हो जिनके दिलों में यँहा। उनके दिलों में अच्छे काम नही बसते। बसता है मोह लोभ कुर्सी पे जमने का। उनमें कभी भी ईमान नही बसते। धर्म जाती रंग रूप सब खेल खेलते हैं। दिल से कभी भी पुण्य कर्म नही बसते। कहते हैं कि खुद को जो राम जी का भक्त यँहा। उनके दिलों में श्री राम नही बसते। #NojotoQuote #छंद छंद
Sandeep A More
लावणी... *घायाळ मी...* ना माणुसकी इथे मवळ सुखाची ही भुरळ दारिद्रयाचे हे दुःख जवळ वेदनेची कवळ चटक्यांचे फोड फुटले नाचून घायाळ मी झाले..।।धृ।। हा सुना दरबार भावनांचा आधार अश्रूचं हे उदार सोसती मनी भार जिवनी ना कोडे सुटले नाचून घायाळ मी झाले..।।१।। स्वप्न हे पायंदळी आहुती वेळोवेळी देह माझा हा जळी करपे जशी पोळी अश्रूही हे टपटपले नाचून घायाळ मी झाले..।।२।। रक्त मंची सांडले सुख मृदी गाडले आयुष्य ही रूसले नाटक हे संपले ताल कानी गुणगुणले नाचून घायाळ मी झाले..।।३।। -संदीप मोरे, नाशिक आशा ट्रेडर्स,अशोका फाउंडेशन,नाशिक #घायाळ मी... #करूणरस #लावणी #मराठी