Find the Best पहिलापाऊस1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
पहिला पाऊस हा आठवणी किती देऊन गेला सुगंध मातीचा दरवळला आणि देह वेडा चिंब त्यात दंगून ओला झाला ! समोर तू सौंदर्य तुझं श्रुंगारानी भरलेलं थेंब थेंब तू बरसत होती नयनांनी तुझ्या मला पाहता ती वीजही तुझ्यासमोर काहीच नव्हती ! झालो तूर्तास मी तुझ्यात बावरा भिजून तुझ्यात साराच गेलो तुझ्या अदा पाहुनी मोहक मी पाऊसाची एक संततधार झालो ! शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - पहिला पाऊस #पहिलापाऊस1 तुमचे विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया. आजच्या माझ्या पण आवडत्या विषयावर.
Rashmi Hule
तुफान वारा अन पहिला थेंब पावसाचा अत्तरालाही लाजवेल असा गंध मातीचा ओलावला कण अन् कण धरतीचा आतुरला भीजण्या रंग हिरवेपणाचा Rashmi तापलेल्या तनुची ओढ भिजण्याची ओलेत्या ऋतुच्या ओल्याच स्पर्शाची भिजला तो रंध्र अन् रंध्र कायेचा आनंदसोहळा पहिल्या वहिल्या पावसाचा Rashmi Awesome climate 🤗😃 Meaning :- Tej havaye, aur pahali bund barish ki Etra bhi sharma jaye aisi khushabu mitti ki Har jarra bhiga hua dhartika Aur bhigane ko aatur rang hara pedo ka... Bhigane ki abhilasha tapate tanu ki Usapar sparsh bhige rutu ki
Atul waghade
पहिला पाऊस असाच जसा प्रितीने फुलले मोगरे फुलात त्या मातीचा सुगंध दरवळतो तसाच त्या पहिल्या प्रेमाचा हवा हवा तिचा साथ तिला पण वाटते त्याने पण बघांवे भिंचतांना मला पावसात हा पहिला पाऊस असाच तो,ती आणि बरेच काही त्या पहिल्या पावसात.... -Atulwaghade शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - पहिला पाऊस #पहिलापाऊस1 तुमचे विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया. आजच्या माझ्या पण आवडत्या विषयावर.
Atul Waghade
पहिला पाऊस असाच जसा प्रितीने फुलले मोगरे फुलात त्या मातीचा सुगंध दरवळतो तसाच त्या पहिल्या प्रेमाचा हवा हवा तिचा साथ तिला पण वाटते त्याने पण बघांवे भिंचतांना मला पावसात हा पहिला पाऊस असाच तो,ती आणि बरेच काही त्या पहिल्या पावसात.... -Atulwaghade शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - पहिला पाऊस #पहिलापाऊस1 तुमचे विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया. आजच्या माझ्या पण आवडत्या विषयावर.
yogesh atmaram ambawale
कधीच न बिघडणारे एक समीकरण, पहिला पाऊस आणि त्यात तुझी आठवण. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - पहिला पाऊस #पहिलापाऊस1 तुमचे विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया. आजच्या माझ्या पण आवडत्या विषयावर.
yogesh atmaram ambawale
पहिला पाऊस, मातीला सुगंध देऊन जातो.कुणाची तरी कमी भासवून जातो. बालपणाची आठवण करून देतो.कांदाभजी ची तोंडावर चव देतो. पहिला पाऊस, खूप आनंद देतो,तर खूप भीती ही देतो. मुलं घाबरतात इतका विजेचा कडकडाट देतो. मनात धस्स होते इतका ढगांचा गडगडाट ही देतो. कित्येकांना जवळ आणतो,तर कित्येकांना दूर ही करतो. पहिला पाऊस शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद देतो. बरसणाऱ्या धारांचे मधुर संगीत देतो. वादळी वाऱ्यासह आल्यास कित्येकांना बेघर ही करतो. पहिला पाऊस, जितका हवाहवासा वाटतो, तितकाच मुसळधार बरसता नकोसा ही वाटतो. पहिला पाऊस जो तो आपल्या मर्जी ने पाहिजे तसा अनुभव घेतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - पहिला पाऊस #पहिलापाऊस1 तुमचे विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया. आजच्या माझ्या पण आवडत्या विषयावर.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto