Find the Best कधीयेशीलका Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
स्वप्नांत येणं जाणं तुझं सत्यात कधी येशील का ? पहाटेच्या स्वप्नांत पण असतेस, कधी तरी सकाळची कोकिळा होशील का ? शब्दांच्या दुनियेत हरवलेला मी कधी तरी मला शोधशील का ? डोळ्यात तुझ्या तुलाच वाचणार सांग माझे शब्द तु होशील का ? दुनिया माझी तु असशीलच मला जरासं तुझा होऊन देशील का? घट्ट मिठीत तुला घ्यायचं आहे तु ही स्पंदनं हृदयाची ऐकशील का? नाही होणार स्वप्न खरं माहिती पण, स्वप्नांत तु माझ्या येणं सुरूच राहील मी रोज नव्यानं तुला आठवणार कधी येशील का ? प्रश्न माझा तुझीच वाट पाहिल ! सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कधी येशील का? #कधीयेशीलका हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. चला तर मग लिहुया.
vaishali
तुझ्या भेटीस अतुरले हे मन सांग भेटण्या मज कधी येशील का ? पाहिलीत जी स्वप्न दोघांनी सांग साकार ती करशील का ? तुटलेले मन माझे सांग सवरण्या तू येशील का ? आयुष्याच्या वाटेवरती सांग साथ मला तू देशील का ? माझा होशील का ............... सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कधी येशील का? #कधीयेशीलका हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. चला तर मग लिहुया.
pooja d
गेलास कधी माझ्या जीवनातून परतून कधी येशील का?? अनोळखी देशात गेलास स्वतः च्या घरी पुन्हा कधी येशील का??? अस्तित्त्व मिटले तुझे आठवणीत माझ्या कधी येशील का?? सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कधी येशील का? #कधीयेशीलका हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. चला तर मग लिहुया.
dhanashri kaje
आयुष्यात माझ्या कधी येशील का अव्यक्त मनातील बोल कधी बोलशील का वाट पाहतो मी तुझी त्या किनारी माझ्या आयुष्याची नाव बनुन तु येशील का माझ्या मनातील भाव जाणतेस तु तरीही कधी मला ओळखशील का मी तुझाच आहे तु माझी होशील का आयुष्यात माझ्या कधी येशील का सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कधी येशील का? #कधीयेशीलका हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. चला तर मग लिहुया.
yogesh atmaram ambawale
तसे पाहता तू रोजच येते,दिवसातून अनेकदा भेटते. प्रत्येक भेटीत नवीन भासतेस,कविता तू माझी सतत सोबत असतेस. लिहितो जेव्हा मी तुला,तू सर्वांनाच आवडते, तरीपण मनात काहीतरी अपूर्ण असल्यासारखे वाटते. अविस्मरणीय राहावी सर्वांसाठी अशी कधी होशील का? शब्द नि शब्द प्रत्येकाच्या मनाला भावावा अशी कधी घडशील का?. हृदयात घर करून राहावी सर्वांच्या,आशा रुपात कधी येशील का?. इच्छा ही एकच माझी,कायम लक्षात राहावी अशी एकदा तरी भेटशील का?. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कधी येशील का? #कधीयेशीलका हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. चला तर मग लिहुया.
yogesh atmaram ambawale
स्वप्नात नेहमीच येतेस सत्यात कधी येशील का? कोण आहेस तू कधी दर्शन देशील का ?😊 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे कधी येशील का? #कधीयेशीलका हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. चला तर मग लिहुया.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto