Nojoto: Largest Storytelling Platform

Best गारवा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गारवा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about झोपतो गारवा लावणी, झोपतो गारवा, गारवा कविता,

  • 12 Followers
  • 21 Stories
    PopularLatestVideo

Ganesh Shinde

घन बरसला बनुनी धारा,
मोहरुनी हरित झाली धरा,
कोमजले मन करुनि उल्हसित,
क्षणात खुलवी हा गार वारा। #पाऊस
#घन
#धरती
#हिरवळ
#गारवा
#yq_gns

Yogita Takatrao

mute video

Sujata Chavan

उधळला सभोवती
   रंग गुलाबी गारवा...
मनी दाटे तव
   धुंद प्रेमाचा उमाळा...

कणाकणात भिनला तुझा
   श्वास बनून गारवा...
प्रितीस साद घाली
   मन सखा पारवा...

उधाण आसमंतात
  धुंद पसरला गारवा...
अल्लड एकांतात
   अलवार गाऊ मारवा...

                अंजु...!!

©Sujata Chavan #गारवा#

Deep Bawara

रिमझिम रिमझिम पाऊस धारा
बेधुंद मोसम नदीचा किनारा

अंग अंग भिजले जलसरीत 
ओल्या अंगी बघ उठतो शहारा

मनात वादळ उठले मिनमिनतो "दीप"
अंधाऱ्या राती जसा चमकतो तारा

मिठीत तुझ्या विसावले जग माझे 
वेड्या जिवा भेटला तुझा सहारा

हिरवळ दाटता मोहरते सृष्टि 
गोऱ्या अंगी झोंबतो गार वारा

©Deep bawara #वारा #मराठी #मोसम #गारवा 

#WorldAsteroidDay

काव्यात्मक अंकुर

#गारवा #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #marathi #nojotomarathi #rain #Road #Travel #Journey #barish #poem

read more
mute video

ग्रंथावली काव्यरेषा

#गारवा
या थंडगार वाऱ्यात
नजरेसमोर तू असतांना
प्रेमाची तुझ्या उब भासते,
थेंब अन थेंब या पावसाचा
ओंजळीत साठवुन आयुष्य भर 
त्याला जपावे वाटते...
स्पर्शून जाता तू मला नभ 
पांघरलेले आसमान ही मनात 
लाजते,
निस्सिम प्रेम करावे तुझवर
जसे धरनी पावसाचे सुगंधी नाते..
कवेत येताच तू माझ्या
अंगावर शहारा बहरतो
थरकाप होतो अन भावनांना पाझर
फुटते...
सामावुन घेतो जेव्हा नयनांत 
माझ्या तुला तु माझी अन् मी 
तुझा एवढेच जग उरलेले असते...

-संदीप मोरे ,नाशिक #paus #garva #Prem 

#Riverbankblue

मैत्रेय

हा सुखद गारवा
स्पंदनात मारवा
मन होई पारवा
सखे तुझ्याविना

मैत्रेय(अंबादास) #गारवा

Yash Borade

read more
काल दुपारी भर उन्हात मला तुझी आठवण येत होती...
त्या कडक उन्हात सुद्धा तुझा
आठवणीत गारवा वाटत होता...
त्या गारव्याचा कण ना कण नाश बनून माझा श्वासात भिनला होता ..
जणू काही तुझा श्वासच तो गारवा बनला होता

यश.✍️

_VS_love_poetry.

me..

read more
"तुझ्या आठवणी कवेत, घेणारा हा आसमंत सारा.
जसा गारवा येऊन, बिलगतो जनू प्रेमळ वारा."
"पाहता तुला भासतो, रुपेरी हा चंद्र तारा.
जसा गारवा येऊन, बिलगतो जनू प्रेमळ वारा." me..

Varsha Patil

गारवा

read more
गारवा
बेधुंद हवा हा गारवा
भुलवी कसा मना मना
हा गारवा---
धूंद हवा ही कशी
लकेर वाऱ्याची फिरी
गंध फुलांचा तिच्यासवे
भुलवी कसा तना मना 
हा गारवा---
पक्षी विहरती नभी
प्रतिबिंब दिसे सागरी
गुंजन तयाचे ऐकता
बहरी मन क्षणाक्षणा
हा गारवा- --
वळणावरी गवतफुले
झुलती रानपाखरे
दृष्य तयाचे पाहता
फुलवी कसे तुम्हा आम्हा
हा गारवा,----- गारवा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile