Nojoto: Largest Storytelling Platform

Best खरं Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best खरं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutखरंच का, खरंच meaning in english, खरंच ना, खरंय ना, खरं प्रेम एकदाच होत,

  • 11 Followers
  • 11 Stories

Shankar Kamble

*अंतराच्या मनःदर्पणी*
            *बिंब स्वतःचे खरे उमटले*
*अवशेषांचे भग्न मंदिर*
         *किती मुखवटे गळून गेले..*

*क्षणा -क्षणाला रूप पालटे*
             *रंग बदलतो चालीने* 
 *पाय चाटतो श्वान बिचारा* 
            *लाळ घोटतो सोयीने..* 

 *भुलले सारे वरल्या रंगा* 
             *भाव आता मोल नाही* 
 *सरळ चालते नदी कितीही* 
              *पाणी मात्र वक्र जायी..* 

 *सदा दावते उपजत वृत्ती* 
             *दर्पण,आईना इतरांना* 
 *कुणी दावता स्वतः आरसा* 
             *ठेच लागते सन्माना..* 

 *कधी पृथा ना दर्पण बोले* 
             *लख्ख वदते सदैव वाचा* 
 *गुण-दोषासह ग्रहण करावे* 
        *नच असावा एकची साचा..* 

 *आरसपाणी सौंदर्याची* 
           *एक खूण जरी नसे तुला* 
 *निर्मळ अंतर गंगेचे जळ* 
          *मदन सावळा तोच मला..*

©Shankar Kamble #AWritersStory #आरसा #दर्पण #आरसा #आईना #मन #अंतर्मन #खरं #सत्य

Jugal Madwal

(जेव्हा भांडण झाल्यावर प्रियसी प्रियकराला भेटायला येणार असती तेव्हा प्रियकराच्या मनात काय चालू असत ) भांडण !!!! माझे तुझे डॊळे एकमेकांना भिडतील जेव्हा माझ्या मनीचे गूज तुझ्या मनाला कळेल तेव्हा बोलणार नाही म्हणशील रूसून बसशील जेव्हा...

read more
(जेव्हा भांडण झाल्यावर प्रियसी प्रियकराला भेटायला येणार असती तेव्हा प्रियकराच्या मनात काय चालू असत )

भांडण !!!!


माझे तुझे डॊळे एकमेकांना भिडतील जेव्हा 
माझ्या मनीचे गूज तुझ्या मनाला कळेल तेव्हा
बोलणार नाही म्हणशील रूसून बसशील जेव्हा...

Sachin Zanje

प्रेम हे..

read more
सुर मी 
तर ताल तू..
अज्ञान मी
खरं ज्ञान भंडार तू..

शब्द मी 
तर रचना तू.
कवी मी 
पण कवीता तू...

नदी मी
पण समुद्र तू.
झाड मी 
खर निसर्ग तू...

चित्र मी 
पण रंग तू..
पुस्तक मी 
खरं कांदबरी तू..

ढग मी 
पण पाऊस तू.
धुके मी
खरं इंद्रधनू तू..

फुल मी 
पण सुगंध तू.
आवड मी 
खर छंद तू..


कवी -कु सचिन झंजे. प्रेम हे..

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
देव नाही गं मी 
तुझ्या मनात काय आहे 
ते ओळखणार, 
कारण, मी मनकवडा नाही, 
बऱ्याच गोष्टी तू मनात कोंडून ठेवतेस 
मला सांगत पण नाही 
आणि हेच मला पटत नाही, 
अगं सहजासहजी खरं प्रेम 
कुणालाही मिळत नाही, 
तुला मिळतंय तर, 
ते तुला काळत नाही, 
सांग ना तू मला का गुंतवून ठेवतेस 
आपल्या मनातलं 
का तू सांगत नाही, 
तुझा माझ्यावर विस्वास नाही? 
अगं खरं प्रेम करतो तुझ्यावर 
तुला काळात कसं नाही.. (प्रीत )

Vinayak Das

#Involvement is needed

read more
गुंतण महत्वाचं.कळतयं पण... 😊 पण आलाचं ना. हो, कळतयं पण भीती वाटते.. नाहकच असेल कदाचित पण आहे. आजच पहिल्यांदा भेटलो आणि गुंतलो.. खुप बोलावं वाटतं अश्या वेळी, पण विषय सुचतं नाहीत. तसे मला सावरायला जुने प्रश्न दिमतीला येऊन उभे होतेच या ही वेळी. 'तिला काय वाटेल?''काही गैरसमज तर नाही ना करुन घेणार ती?''हि पहिलीच भेट खरं तर, ही योग्य वेळ आहे का?' आणि तोच जुना प्रश्न 'खरंच आहे का आपली पात्रता,त्या योग्यतेची?' आणि या सर्वांसोबत एक नवाच प्रश्न आज नव्याने आला, 'तू पुन्हा प्रेमात कसं काय पडू शकतोस, काय ही तुझ्या पहिल्या प्रेमाची प्रतारणा तर नाही ना?' (खरं तर हा प्रश्न निरर्थक, पण तरीही आपलं अस्तित्व सिद्ध करून गेला)

प्रश्न, पहिलेही मला निशब्द करायचे आणि आज ही त्यांनी तेच केलं.ती मात्र निर्भिडपणे माझ्याशी संवाद साधत होती. शेवटी आपलंच मन आपली गोची करतं हे मात्र खरं. मी फक्त तिच्या प्रश्नांना उत्तर करत होतो. तिच हसणं न्याहळत होतो, कदाचित ती माझ्या अवघडलेपणावरचं तर हसंत नाहिये ना, असं ही वाटुन गेलं. पण छे हो, इतक नितळ, निरागस हास्य ते, त्यावर इतका कोता संशय घ्यावा.. माझीच मला लाज वाटली. मी निर्धाराने भावनांना सावरून होतो. भीत सुध्दा होतो... काय सांगव, हा बांध कधी तुटेल ही. बराच काळ या सुख वर्षावा भिजत असतांना, वेळ आपलं कार्य साधतचं होती, अविरत वाहण्याचं. खरं तर ज्या वेळी वाटंत असत, वेळ जरा काळ थांबावा तो तेव्हाच इतक्या लवकर निघुन जातो ना.... असो, दोन तासच ते, फक्त तिच सोबत असणंच, मनाला उधाण देणारं होतं... गुतांयच नाही अस मनाशी ठरवलेलं असतांना ही, तिच्यात नकळत गुंतत जाणं, अनोखं होतं, विस्मयातीत करणारं होत,

बाकी सगळं विसरायला लावणारं होतं. आज हे सगळं तुला सांगायच ठरवुनच आलो होतो, शेवटी तुच तर हक्काची मैत्रिण आहेस ना माझी...

माझ्या प्रिय डायरीस्

तुझा 'राही औरंगाबादी' #involvement is needed

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile