Nojoto: Largest Storytelling Platform

Best प्रियकर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best प्रियकर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutप्रियकर means in hindi, प्रियकर in english, प्रियकर meaning hindi, प्रियकर कविता, प्रियकरासाठी कविता,

  • 7 Followers
  • 9 Stories

Shankar Kamble

गडद गहिऱ्या अंधाराच्या
मखमली सावल्या थांबल्या
पाठमोरी भार उन्हाचा
चिंब पदराआड लांबल्या!१!

सैल मोकळ्या जटा रेशमी
हळूच पूसती गूज कानी
शामल वर्णी गंध दाटला
मंद हासतो पानोपानी!२!

अधरी अवचित जुळून आले
गीत प्रसवले तुला माळले 
धागां–धागां गुंफून हृदयी
चित्र देखणे साकार झाले!३!

विणेच्या झंकारून तारा 
सूर छेडले तेच जुने
काय गवसले मजला आता?
भरली ओंजळ नसे उणे!४!

नक्षत्रांच्या शुभ्र मृत्तिका
पहाट वेळी ओघळल्या
दवबिंदूचे मोती बनूनी
धुक्यात हिरव्या झाकोळल्या !५!

©Shankar Kamble #Ray #रात्रि #रात #सखा #प्रियकर #कृष्ण #सखी #आठवण #याद

@wr. pallavi

Shashikant Kendre

या जगात सगळ्यात मोठा प्रियकर, किंवा प्रियसी,जर कोन असेल तर ते तुमच स्वताच"मन" आहे....!! शशी केंद्रे.... #मराठी #प्रियकर #प्रियसी #प्रेम  #nojoto

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile