Find the Best बघ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about बघतात का, मौसम बघुनिया, बघताय काय, बघून माझं बघा, चालून आले बघता बघता,
Rohit Aher
एक फुल खुडून बघ, केसात तुझ्या माळून बघ ! अप्सरा ही वाटेल फिकी, जरा आरशात निरखून बघ ! रोहित !!
Geeta Darakhe❣️
कामाला कामाची गरज नको 😌पुरावा माणुसकीचा माणुसकीला स्वार्थाची ओढ नको जग वेळया थोडं बेभान होऊन माणुसकीला थोडं हृदयात ठेऊन निस्वार्थ तू कधी होऊन तर बघ आनंद त्या क्षणाचा घेऊन तर बघ जग कधीतरी त्या खारुताई सारखा सोड स्वार्थ तू त्या पछाडलेल्या प्राण्यासारखा माणुसकीला तुझ्या कधी नको देऊ दुरावा माणूस म्हणून जगतोय याचा कधी तर दे पुरावा सूर तुझ्या जीवनाचा तूच पकडू शकतोस माणुसकीला माणसाच्या तूच ओळखू शकतोस स्वार्थ तुझ्या जीवनातला तूच टाळू शकतोस…❣️geet❣️
vaibhav padmakar Dharmadhikari
तू मुक्त आहेस.... भावनांचं गाठोडं घेऊन जातांना कधी थकली तर विसावा घे त्या आठवणींच्या झुल्यावर बघ मन शांत होईल.... दुरावलेल्या वाटा शोधतांना होतेच दमछाक तर कधी येतं नैराश्य तेंव्हा तो अस्ताला गेलेला सूर्य बघ उद्या उगवण्यासाठी बुडालेला क्षणात दूर होईल ते मळभ अन पेटशील तू नव्याने त्या निरागस पण संपण्यासाठी पेटलेल्या दिव्यासारखं... सुखाला शोधावं वाटलंच कधी तर तो नभात हरवलेला चंद्र बघ म्हणजे तुला तुझ्या दुःखाची खंत वाटणार नाही .... तू मुक्त आहेस त्या हरणी सारखी चपळ अन चाणाक्ष सुद्धा तेंव्हा विसावा घेऊन उठली ना तर उधळू दे तुझ्या भावनांचे वारू चौफेर अन घुमूदे तो जल्लोष जो तुला बंधनात ठेऊ पाहत होता.... वैभव धर्माधिकारी
R.K.
विणवुनी थकलो तुला तरी तू ऐकलं नाहीस, अशी काय चूक केली मी की माझ्याशी बोलत नाहीस, या वेड्या प्रेमविराचे एकदा ऐकून बघ, ऐक ना अग एकदा परत माझ्याशी बोलून बघ। R.K.
Pragati Meshram
Path चिन्धी चिन्धी घलावत , वाट सरता सरना ... आयुष्याला उत्तर नाही...प्रश्न सरता सरना । वाट पाहता पाहता झाला अंधार अंधार ... आंधरच्या पुढं जाव ..अशी आयुष्याची वाट ।। मिढे दोन घास... माये च्या पदरी पदरी ... ओ जडित घेत बघ... माय दुःख च्या लहरी...। माय बाप माझे बघ ..आहे देवाच ग रूप .. पय पय जोड़ून चालवे संसाराची ज्योत । जीवनाची दोरी आणि.... आहे प्रेमाची ग भूक द्यावे थोड़ प्रेम साऱ्या .. मिढे जगनयात सुख आयुष्याची वाट
drdeoshinde48
Success जन्म घेऊन आलीस तू जरा मनासारखं जगून बघ सुख तर कोणालाही हवे हवे वाटते दुःखाचे पहाड हि कधी तू सर करून बघ तू अनेक यशाचे सुख अनुभवले असेल पण अपयशाला तू कधी निरखून बघ जगणं कठीण असत मरण सोप असत कधी दोन्हीमधल्या वेदना हि जरा झेलून बघ जीवन हे एक मोठं कोड आहे तुही जरा त्याला सोडवण्याचा प्रयन्त करून बघ always be@ positive👍
Narendra Zadekar (Ek NOOR)
घे विसावा ,मेघराजा फार झाले,थांब थोडा बघ घराचे हाल झाले,पाहिले मी रूप येथे पावसाचे, बघ धरेचे अंग आता गार झाले, रौद्र केले रे नदीला तू जलाने, थांब आता सर्व हाहाकार झाले, ये म्हणालो तर असे का यायचे रे, घर कसे हे आज बुडते पाल झाले, जोडतो मी हात माझे, घे विसावा आसवांनी आज डोळे लाल झाले, जा तिथे तू सूकलेल्या माळराणी, दुष्कळाचे ज्या ठिकाणी वार झाले Aditya Parkhe
Mahesh Lokhande
पर्जन्यदेवता नमो पर्जन्यदेवता नमो दयासागरा लक्ष करांनी वृष्टी करी येऊ दे महापूरा थांब म्हणणार नाही मनसोक्त पडून घे पण पाण्याविना आम्हा मारू नको रे रोपे तहानेने सारी बघ व्याकूळ झाली का सांग दुष्काळाची ही पाळी आणली तृणअंकुरांचा काय झाला गुन्हा का रे फुटत नाही आज तुला पान्हा पाने पाने तहानेने बघ रे सुकली ममतेची भीक मागूनी थकली आता तरी फुटू दे प्रेमाचा झरा नमो पर्जन्यदेवता नमो दयासागरा नमो पर्जन्यदेवता
Bharati2 Sawant
चित्रचारोळी मंद झुळूक वाऱ्याची गंधित करून बघ गेली मोगऱ्याच्या परिमळाने काया माझी धुंद झाली बगीचाही गंधाळला मोगर्याच्या सुगंधाने सर पावसाची येताच कळ्या उमलतील नव्याने हा खट्याळ रानवारा भिरभिरतोय या काना सखीला माळ हा गजरा सांगतोय का या सजना घालूनी फूंकर कळ्यांना घुमतोय बघ हा धुंद वारा माळून गजरा सखीला फुलवतोय बटांचा पसारा सौ.भारती सावंत