Find the Best थेंब Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutथेंब meaning in hindi, अश्रूंचा एक थेंब, थेंब आज हा पाण्याचा कविता lyrics, थेंबा थेंबा न लावणी, थेंब आज हा पाण्याचा,
Shankar kamble
*दशाक्षरी काव्यरचना.* *मेघ दाटले....* *मेघ दाटले काजळ काळे* *मनी हर्षाचे झुले उमाळे* *मोर पिसाचे फुलले डोळे* *मातीचाही गंध दरवळे* *वाट पाहिली चातकापरी* *अलवार येती मृगसरी* *तनां-मनां या भिडल्या धारा* *सूर अवचित ओठावरी* *थेंब नाचे टपटपणारे* *खळखळ नादे जळभारे* *अवखळ चंचल हे वारे* *सृजनाला ये उधाण सारे* *बीज अंकुरे धरणी पोटी* *येती जुळूनी मीलन गाठी* *साज मखमली झऱ्या काठी* *इंद्रधनू मग येई भेटी* *पानोपानी छटा उमटल्या* *गर्द पोपटी हिरव्या ओल्या* *बहरून आल्या नभांगणी* *घन सावळ्या हरिणी न्हाल्या* ©Shankar kamble #पाऊस #पाऊसधारा #पाऊसाततुझीआठवण #पाऊस_पडून_गेल्यावर #पाऊसाला #थेंब #थेंबाचे #सरी
FalgunWords
#थेंब मातीचा सुवास पेटलायं, अंगणी पाऊस पडलायं.. एक तो गगनातला.. एक हा नयनातला.. त्याचा पाऊस, धरेस आधार, माझा पाऊस, मलाच भार.. एक पाणी, पडून गोड धार, एक पाणी, पडून खारे क्षार.. कुठल्या धारेत भीजायचं मी, कि अंग क्षारेत सुखवायचं मी.. सांग मला सत्वर, प्रश्नाचं ह्या उत्तर.. थेंब अजून उदास पडलायं, अंगणी पाऊस पडलायं.. एक तो गगनातला.. एक हा नयनातला.. त्याचं बरसणं, बूलंद दणक्यात, माझं बरसणं, मंद हुंदक्यात.. त्याच्या संगे विजेची लय कडकडणारी, माझ्या संगे मनाची सय तडफडणारी.. त्याचं कोसळनं, पूराचे पाट, माझ्या पूराची, छोटीशी वाट.. त्याच्या सप्तरंगाचा, नभी मुक्तछंदाचा.. इंद्रधनु तो झकास पडलायं.. अंगणी पाऊस पडलायं.. एक तो गगनातला.. एक हा नयनातला.. त्याच्या गाण्यांत, चिवचिवाट वणातला, माझ्या गाण्यांत, शुकशुकाट मनातला.. त्याचं संगीत, जणु सुरांचा मळा, माझा येथ, अजून कोरडा गळा.. खुलवेल कळी, कोण जाणे कोण वेळी.. प्रत्येक थेंब खास पडलायं, अंगणी पाऊस पडलायं.. एक तो गगनातला.. एक हा नयनातला.. मातीचा सुवास पेटलायं, अंगणी पाऊस पडलायं.. एक तो गगनातला.. एक हा नयनातला.. :- "फाल्गुन." #leaf
Vrishali G
थेंब थेंब पाण्याचे करतात आठवणी जाग्या .. आपल्या सहवासाच्या आपल्या मैत्रीच्या आपल्या प्रीतीच्या ❤ आपल्या एकांताच्या आणि आता आपल्या विरहाच्या .. ....
....
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited