Nojoto: Largest Storytelling Platform

Best राजकारण Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best राजकारण Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutराजकारणाचा अतिरेक होतो का, आघाडीचे राजकारण in marathi, राजकारण शायरी, राजकारण शायरी मराठी, राजकारण कविता,

  • 16 Followers
  • 20 Stories

Freelancer

prayag pawar

prayag pawar

राजकारण...

करतात सत्तेसाठी नुसती हाव-हाव
शेतकऱ्यांच्या मालाला नसे काडीचा भाव
निवडणुका जश्या येतील तोंडी,
करतील प्रचाराची नुसतीच कोंडी

लाखो मतांतून निवडून येते एक नाव 
अन् गुलाल उधळतो गावो गाव
नेता आमचा काही पाच वर्षे टिकेना
जसा ताजा भाजीपाला मार्केट ला विकेना...

अतरंगी राजकारण्यांच्या अतरंगी खेळ्या
मात्र, पोलिस दादांच्या रात्र-दिवस पाळ्या
पडलेत यांचे विक्रमी आघाडीचे गट
अन् नुसतेच करतात एकमेकांवर कट

यांच्या नादात माझा देश पाठी राहतोय
सामान्य माणूस मात्र भरडला जातोय
दूरवर राहिलाय माझ्या देशाचा विकास
इतके 'राजकारण' चाललंय भकास...

©prayag pawar #राजकारण

Rajeshwari Ghume

घोटाळ्यांच्या घोटाळ्यात
अजून काही घोटाळे,
प्रत्येकाच्या मनात
मोहाच्या सापाचे वेटोळे...
सगळ्यांच्याच मनाला 
आहे याने डसलेले,
कुणीच नाही नवखा येथे
सगळेच आहेत मुरलेले...
घोटाळ्यातल्या मलईसाठी 
सारे जीव वखवखलेले,
घोटाळ्यांच्या घोटाळ्यात
अजून काही घोटाळे...
- वीणा #वीणा #scams #घोटाळे #राजकारण

suresh pawar

सत्तेची ओढाताण 
नेमकं कोण टाकतयं गुगली
धोनी विराट पण झाले हैराण
टीम मध्ये कसा आला गांगुली
सुरेश पवार #राजकारण

sandy

#राजकारण चिंगी म्हणते टिंग्याला चल रे भाऊ भातुकली खेळू टिंग्या म्हणे चिंगीला त्यापरीस 'राजकारण' खेळू हा रे कसला खेळ? अगं बाई जुनाच आहे खेळ विषाम्रुत खेळतो तसं तसंच असतं खेळायचं बाद होतोय वाटलं की अम्रुत मागत फिरायचं होते थोडीशी बोलाचाली पैशाची देणीघेणी

read more
 #राजकारण

चिंगी म्हणते टिंग्याला         चल रे भाऊ भातुकली खेळू
टिंग्या म्हणे चिंगीला            त्यापरीस 'राजकारण' खेळू
हा रे कसला खेळ?             अगं बाई जुनाच आहे खेळ
विषाम्रुत खेळतो तसं           तसंच असतं खेळायचं
बाद होतोय वाटलं की          अम्रुत मागत फिरायचं
होते थोडीशी बोलाचाली       पैशाची देणीघेणी

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile