Nojoto: Largest Storytelling Platform

Best वीणा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वीणा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutवीणा वादिनी का अर्थ, वीणा का अर्थ, वीणा meaning in english, वर दे वीणा वादिनी, वीणा काम,

  • 13 Followers
  • 96 Stories

Rajeshwari Ghume

Rajeshwari Ghume

Rajeshwari Ghume

वाफाळलेल्या चहा सारखं असावं आयुष्य...

चहाचा पहिला घोट घेताना जसा चटका बसतो तसं धडा देणार असावं आयुष्य...

मग हळूहळू फुंकून वाफ बाजूला करून चहाचा घोट घेतो तसं गैरसमजाचे, संशयाचे ढग बाजूला सारून आयुष्याचा आस्वाद घेणार असावं आयुष्य...

चहाचा एक एक घोट जसा चुसक्या मारत घेतो आपण तसा प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणार आणि देणार असावं आयुष्य...

अद्रकच्या कडकं स्वादासारख खंबीर असावं आयुष्य...आणि साखरे सारखं सगळ्यात मिसळून गोड करणार असावं आयुष्य...

आणि चहा संपताना कसा अजून प्यावासा वाटतो, तसं आयुष्य संपताना थोड अजून जगावस वाटावं असं असावं आयुष्य....

- वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #चहा #आयुष्य #tea #tea_lover #tea_and_life

Rajeshwari Ghume

किती जाहले रुसवे फुगवे तरीही,
सख्या तूच आहे माझ्या हृदयाची गती रे...

जरी आज दूर असशील सख्या तू,
मज ध्यानी, मनी अन् स्वप्नी तूच तू रे...


- वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #प्रेम #तू_आणि_मी 

#MySun

Rajeshwari Ghume

काल तू तसा,
अन् आज हा असा,
कोण जाणे तू,
उद्या असशील कसा?

अनंत रंग तुझे,
तुझ्या नाना कला,
कसे ओळखावे मी,
तू खरा आहे कसा?

- वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #प्रेम 

#Butterfly

Rajeshwari Ghume

या चार ओळींमध्ये 
मी काय काय मांडू??
भावनांचे इतके रंग 
कोठे अन् कसे सांडू??
- वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #भावना #emotions

Rajeshwari Ghume

पूर्वीही तू असाच जायसाच
मागे वळुनही न पाहता,
आताही जातो अगदी तसाच
कुठल्याच नात्यात न अडकता...


- वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #तो #BreakUp #प्रेम #एकतर्फी 
#Break_up_day

Rajeshwari Ghume

आज पुन्हा एकदा
माझ्या स्वप्नांची गोधडी,
मी गुंडाळून ठेवली
उद्याच्या आशेवरती ...
उद्या पुन्हा एकदा 
अंथरीन तिला,
नवी छोटी स्वप्न माझी
जोडून ठेवीन तिला,
परत एकदा तिच्यावर
लोळून घेईन मनसोक्त...
नाहीच झाली काही 
स्वप्न पूर्ण उद्याही,
तर ठेवीन पुन्हा गुंडाळून
परत एकदा उद्याच्या आशेवरती ...
-वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #आशावादी #आशा #स्वप्न #अधुरीस्वप्न #गोधडी

pareek boy

"सागर तू बन जा कश्ती मुझे बना ले, अपने में डूबोकर अपने में मिला ले।।" #AnjaliSinghal #hindishayari #Twitter #वीणा #सरस #बज़्म #शायरांश #हिन्दवी #Akshaykumar

read more
न जाने किस कश्ती मे,
…………सवार हो तुम:

काश कोई लहर तुम्हें,
मुझ तक पहुँचा पाती….✍🏼

©pareek boy "सागर तू बन जा कश्ती मुझे बना ले,
अपने में डूबोकर अपने में मिला ले।।"

#AnjaliSinghal #hindishayari #Twitter #वीणा #सरस #बज़्म #शायरांश #हिन्दवी

#Akshaykumar

Rajeshwari Ghume

भावनिक भूक अनावर झाली की 
माणसाला तत्वांचा ही विसर पडतो, 
मग तो बुद्धीला न पटणा-या 
गोष्टींचाही स्विकार करतो....
-वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #emotional_support #Emotional #emotionally
loader
Home
Explore
Events
Notification
Profile