Find the Best खूप Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutखूप ka virudharthi shabd, खूप समानार्थी शब्द, खूप प्रेम करतो तुझ्यावर, तुझ्यावर खूप प्रेम करतो, खूप सुंदर आहे,
अश्लेष माडे (प्रीत कवी )
एखादी व्यक्ती जेव्हा आपली सवय होवून जाते, त्याच्या बोलण्याची, वागण्याची, बघण्याची आणि सहवासाची, तेव्हा त्याची सवय विसरणं खूप अवघड असतं ना.. नको तेव्हा त्या व्यक्तीच्या msg, call ची वाट बघणं, हाच नित्यक्रम बनतो आपला. कारण, आपल्या हृदयातील त्या व्यक्तीचं स्थान रिक्त करणं खूप कठीण असतं.. त्या व्यक्तीला विसरणं कठीणच असतं, त्या व्यक्तीला न बघता राहणं कठीण असतं, ती व्यक्ती नकळत हृदयाच्या कोपऱ्यात इतक्या खोलवर गेलेली असते, की, तिथून काढणं कठीण असतं.. तेव्हा नाही थांबवू शकत स्वतःला त्या आठवणीत कविता करणं.. खूप अवघड असते ही सवय तोडणं, नाही जमत विरहात जगणं.... प्रीत (प्रीत )🙏
Janardhan Sanap
मी सुखात असतांना, माझ्याकडे समाधानाने बघणारा....आणि मी अडचणीत असतांना, माझा हात धरून चालणारा...माझ्या आनंदात, आनंद मानणारा..आणि माझ्या असावांत, धाडस पुरवणारा..तूच तर आहेस माझा प्रिय मित्र..! सर्व मित्रांना मैत्री दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा आणि मनापासून कृतज्ञता..कारण तुम्ही आहात म्हणून 'मी' आहे.
अश्लेष माडे (प्रीत कवी )
,मैत्री दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना
,मैत्री दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो मी रोजच नवनवीन स्टेटस टाकत असतो. ह्याचं अर्थ असं नाही की, मी खूप रिकामा आहे किंवा दुसरं कोणतं कामच नाही मला. तर हे स्टेटस टाकण्याचा उद्देश हाच की, माझ्या भावना, माझे विचार, माझे अनुभव आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचविणे. मी जे स्टेटस टाकतो कदाचित ते काही जणांना नसतीलही आवडत, मात्र काही वाचक उत्सुक असतात ते स्टेटस वाचायला. टीका करणारे असतातच पण म्हणून लिहिणं सोडणार काय? जे वाचतात आणि आपल्या छान छान प्रतिक्रिया देतात त्यांचं खूप खूप आभार. महत्वाचं हेच की, ह्या सोशल मीडिया च्या जगात पुस्तकांचे वाचन खूप कमी झाले. मात्र बहुतेक आजकाल सोशल मीडिया वर खूप सक्रिय असतात. आणि वाचतात देखील. त्यामुळं मलासुद्धा माझ्या भावना, अनुभव, विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया चाच आधार घ्यावं लागतो. काही चुकलं तर माफ करा. आणि समजावून सांगा मला. नक्कीच आपल्या प्रतिक्रियांना माझं शोभेसं उत्तर मिळेल. धन्यवाद 🙏(प्रीत )
अश्लेष माडे (प्रीत कवी )
#OpenPoetry कधी -कधी मनात असलेलं पण बोलायचं राहून गेलेलं, सगळं बोलून टाकावं आणि मनातलं ओझं हलकं करून घ्यावं. कुणाशी लपवून किंवा मनातल्या मनात ठेवून काय होणार? वेळ निघून गेली की, आपल्या भावनांना आज जिथे जागा मिळू शकते कदाचित उद्या तिथे जागा मिळणार की नाही हे कोण सांगू शकतो. वेळ बदलते, त्याबरोबर माणसे बदलतात आणि मग त्रास आपल्याला होतो. प्रत्येक व्यक्ती डोळे वाचू शकत नाही, चेहरा बघून भावना समजू शकत नाही. म्हणून अशावेळी आपलं व्यक्त होणं गरजेचं असतं. आपल्या भावना ज्याला सांगायचे आहे किमान त्याला तरी ते सांगून टाकावं. आणि मोकळं होऊन जावं, कारण, आयुष्यभर ते ओझं मिरवण खूप कठीण असतं. वेळ निघून गेल्यावर खूप पच्छाताप होतो. नंतर असं वाटते की, तेव्हा सांगितलं असतं तर बरं झालं असतं.. (प्रीत )
प्रा.शिवाजी ना.वाघमारे
नाही खूप काही असत नाही या शब्दांत पण सर्वाना ते कळतं नाही अबोल शब्दाचा भाव काय आहे तो व्यक्त केल्याशिवाय उमजतच नाही मनात खूप मोठं वादळ असत हे कुणाला जाणवतच नाही गर्दीत ही कोणीतरी एकटच भिरभिरत असत हे दिसतच नाही माझं मन ही असच झालं हे कुणाला कळतच नाही मन नेहमी प्रेमात काळजीत असत हे कुणाला कळतच नाही छोटस मन माझं छोटीशी स्वप्नं समजतच नाही मन माझं कुणी समजून घेत नाही.. #NojotoQuote नाही
नाही
read moreRK Raj Chaure
हा प्रसंग कोना एकाच्या आयुष्यातील नसून प्रत्येकाच्या आयुष्यात वाट बनून एनारा आहे.खडतर प्रवास ,काही गोष्टींचा त्याग ,खूप सारी स्वप्न उराशी बाळगून जगणाऱ्या प्रत्येक व्यक्ती चा कधी ना कधी या वाटेशी संपर्क येतोच.अस नाही कि प्रत्येकालाच अडचणींचा सामना करावाच लागतो.काही जणांचा प्रवास खूप साधा आणि सरळ असतो.आणि तोच साधा सरळ पणा त्याच आयुष्य साधं सरळ करून टाकतो.त्याच आयुष्य हे फक्त एका वर्तुळापर्यंतच असत.ज्यांच्या बाहेर त्यांची ओळख शून्य असते. #NojotoQuote
vishal patil
खूप miss करतो ते सकाळी 5 वाजता उठून प्रभातफेरीची तयारी करन,एका महिन्यापासून आपला जोडीदार fix करून ठेवणं,ते शाळेच्या dress ला प्रेस करून ठेवणं,ते नवीन मोजे,नवीन बूटआणि तो सकाळी-सकाळी शाळेतून देशभक्ती गीतांचा आवाज आता हे सर्व कुठंतरी हरवत चाल्लय कुठंतरी संपत चाल्लय जे दिवस आंम्ही अनुभवले ते दिवस आजची पिढीला नाही मिळत...खूप सुंदर दृष्य असायच ते प्रभातफेरीच. गावातून जायचं,देशाच्या घोषणा द्यायच्या,ते सर्व जणू आता फक्त एक कल्पना म्हणून उरलीय, खंत वाटते याची कि आपला समाज पुढे चाललाय पण आपन संस्कृती विसरतोय...
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited