Nojoto: Largest Storytelling Platform

Best लॉकडाऊन Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लॉकडाऊन Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about पुन्हा लॉकडाऊन, पुण्यात पुन्हा लॉकडाऊन, लॉकडाऊन वाढला,

  • 8 Followers
  • 8 Stories
    PopularLatestVideo

somnath gawade

#लॉकडाऊन इफेक्ट्स

read more
वो भी क्या दिन थे;
छुट्टीयों के लिए हम
तरसते थे।
लेकिन, आज छुट्टीयों की
छुट्टीयां कभी खत्म
होगी इसकी राह 
 देखते है हम। #लॉकडाऊन इफेक्ट्स

somnath gawade

#लॉकडाऊन इफेक्ट्स

read more
 हल्ली घराने
बंदीघराचे तर
स्वयंपाकगृहाने
खाद्य चौपाटी चे
रूप धारण केलंय.
  ☺️😊
 #लॉकडाऊन इफेक्ट्स

Deepali Mestry

घर के लिये निकले ही थे
की रा़स्ते थ़म गये
अब न जा़ने तुम तक पहुंच भी पा़येंगे या नहीं
डरते हैं जिंदगी ना थ़म जाये कहीं

शब्दवेडी #मुसाफ़िर#लॉकडाऊन#घर#परीवार

Yogeshwar Narwade

कविता
#लॉकडाऊन नको पुन्हा

लॉकडाऊन आता नको पुन्हा
बसेल रोजगारावर कुर्हाड
हातावर पोट असणार्यांनी
कुठे हलवावे त्यांचे बिर्हाड..

माझ्या शेतकर्याचा शेतमाल
आता बाजारात येत राहील
खुप खर्च केला त्याने त्यावर
पण लॉकडऊनने तो वाया जाईल..

नाही मिळाला जर रोजगार त्याला
ज्याचे सदैव हातावर आहे पोट
या लॉकडाऊनने होईल तो ञस्त
कशी जमवेल तो पोटासाठी नोट..!

जगाच्या पोशिंद्याचा विकावा 
उत्तम भावात शेतमाल
लॉकडाऊन पडले तर होईल
त्या मालाचा पुरता बेहाल..!
 
आता नको पुन्हा लॉकडाऊन
हि आहे आम्हा सर्वाची विनंती
आम्ही सर्व नियमांचे पालन करु
हेच सांगणे या कवितेअंती..!

कडक प्रतिबंध लावुन प्रसंगी
सॕनीटायझर मास्क करा कंपलसरी
पण नको आता पुन्हा लॉकडाऊन
हिच इच्छा सरकार,शासन दरबारी..!

लेखन
योगेश नरवडे
बीड

©Yogeshwar Narwade #WallTexture

शुभम दि. कांबळे

तू सोबत असतीस,
तर हे लॉकडाऊन... 

अजून वाढावं अशी मागणी,
मी देवाकडे केली असती...

तुझ्या सहवासात असल्यावर,
कशाचीच फिकीर राहत नाही...

आन कशाचं भानही राहत नाही..

- शुभम दिपक कांबळे #लॉकडाऊन

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

mute video

Shashikant Kendre

लॉकडाऊन मध्ये लाॅक झालेला
काळ अठवत होतो.
पापण्यांना झूकत करून तो काॅलेजचा..
काळ अठवत होतो.

तीच्या ए खडुस कसा आहेस
पासुन.... ते.. 
ए नकटे  तु फक्त माझीच आहेस 
ही रित अठवत होतो 
आपल्याच प्रेमाचा होता एक काळ
 तो काळ अठवत होतो 

क्लास रूमधल्या डोळ्यांतल्या 
डोळ्यांतला नजरेचा काळ अठवत होतो. 
नजरेन प्रश्न अन नजरेनेच उतर देण्याचा 
तो खुनवा खुनविचा काळा अठवत होतो. 

तो गालावरचा मधाळलेला स्पर्श जाणवत होतो
ओठांवरच्या पाकळ्यांत अडकलेला तो ओंठ 
अठवत होतो. 
तीच्या पाठिवरती लिहलेली ती कवीता
 आजून पाठ करत होतो. 
लाॅकडाऊन मध्ये लाॅक झालेला तो काळ अठवत होतो

ते संभाषणे, ती वचने, त्या स्मृती मी नव्याने उजळीत
होतो काळ लाॅकडाऊन झाला आहे. 
मी मात्र मनाने त्याला सोडवीत होतो
लाॅकडाऊन मध्ये लाॅक झालेला तो काळ सोडवीत होतो. 
शशी केंद्रे.... 💙 #लॉकडाऊन #newquote #marathiquotes

suresh pawar

लॉकडाऊन
मैलो न मैल चालल्यानंतर तो झाडापाशी येऊन थांबतो
वदवून घ्या हवं ते साहेब असं त्या कॅमेराला तो म्हणतो

झूम करून कॅमेरा पाहत असतो त्याच्या डोळ्यातले थेंब
एका वेळची भाकर मिळते बदल्यात त्याला जेमतेम
कुठून आलात कुठं चाललात होतो प्रश्नांचा भडिमार
बायको पोरं अन गाठोडं एवढंच सोबत संसार
दूर असतं गाव अजून पण प्रवास असतो पायी
हळू चाला म्हणतो कॅमेरा पण त्यांना असते घाई
ना मास्क ना साबण कित्येक दिवस एकच शर्ट 
बाळ्याही असतो शांत आता एरवी ज्याला तो म्हणायचा कार्ट
सारं सारं काही आता कैद केले होते कॅमेरात
अजून एक भाकर दिली म्हणत लागेल पुढल्या प्रवासात
वाढेल आता टीआरपी म्हणून दादा खुश होता
रुबाब त्या दादाचा एकदम कसा पॉश होता
परतीच्या प्रवासात मग पोलिसांनी अडवले
पास काढायचे विसरला बहुदा मग परत त्याला पाठवले
फिरून फिरून दमला आता पैसे होते पण सारेच होते बंद
शेवटी तो ही माणूसच मग पोटाला लागले भुकेचे छंद
योगायोग म्हणा वा नियतीचा खेळ 
तेच भेटले कुटुंब पुन्हा ज्याची कॅमेराने मागितली होती वेळ
माणूस जरी अबोल त्याने डोळ्यांतून सारे ओळखले
आपला तुटका संसार त्याने तिथेच मग टाकले
त्याचीच भाकर त्याला देऊन साहेब खाऊन घ्या म्हंटला
सकाळ पासून हिंडताय जरा जेवून घ्या म्हंटला
आता अश्रू बोलत होते तो नुसता पाहत होता
विठ्ठलच की रे समोर माझ्या असा स्वतःला सांगत होता
अनेक बातम्या ज्याने आजवर हिट केले होते
घरी जाऊन आजचे शूटिंग त्याने गुपचूप डिलिट केले होते
त्याने गुपचूप  डिलीट केले होते...
रचनाकार,
©सुरेश गोविंद पवार #लॉकडाऊन #lockdown


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile