Find the Best आठवणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutआठवणीने meaning in english, आठवणीतल्या कविता instagram, आठवणी मराठी शायरी, आठवणीची शायरी मराठी, शाळेच्या आठवणी शायरी,
Amita
कप्पा.... आज मी निवांत आवरायला घेतला कप्पा, आठवायला लागला मग, आठवणींचा एकेक टप्पा.... एकेक वस्तू कप्प्यातील, उलगडत होत्या आठवणी ज्याचे त्याचे मोल ठरती, करून पडताळणी.... गोजिरवाण्या अनेक गोष्टी जपून मी ठेवते वापरूया परत कधीतरी, असाच विचार करते... अडगळीच्या काही काही गोष्टी नजरेसमोर येतात खूप जपून ठेवल्यावर, आता नकोशाच होतात.... विस्कटलेला कप्पा आता येतो जरा रुळावर मनासारखा लागताक्षणी हसू झळके मुखावर.. मनाचाही असाच विस्कटलेला कप्पा! असंख्य आठवणींचा गाठतो टप्पा कधी कधी उतू जाता आठवणी मनासी आवरू कशी त्या क्षणी? मनाचा कप्पा, असाच विखुरलेला यत्न करूनही, मोकाट सुटलेला.. आठवणींचा पसारा, कधी अवरतच नाही.. नव्या जुन्या सयींचा माग सुटतच नाही.. अमिता.. ©Amita #आठवणी #MarathiKavita
Shankar Kamble
चोरपावली सांज दाटली रानभूल ही वाट हरवली थबकत आले भास अवेळी माखून काजळ रेघ ओली.. सताड उघडे दार नभाचे नक्षत्रांचे रम्य फुलोरे गळूनी गेले शिणले मोती भग्न हासती खिन्न मनोरे.. क्षितीजाच्या या गूढ पटली चितारलेली हळवी नक्षी तळहातावर गोंदून गेली रंग हळदी पिवळी पक्षी.. जलाशयाच्या संथ दर्पणी बिंब उमटले नवं तरुंचे मुखं न्याहळी अती कौतुके तरंग भरले डोह मनाचे.. सावल्यांचे खोल जाळे नाते विणती एक क्षणाचे धूसर झाल्या दृश्य प्रतिमा भाव कोंडले आर्त मनाचे.. ©Shankar Kamble #moonnight #आठवणी #सांजवेळ #सांजहीवेडलावी #संध्याकाळ #रात्री #तू #वाट #वाटतुझी
#moonnight #आठवणी #सांजवेळ #सांजहीवेडलावी #संध्याकाळ #रात्री #तू #वाट #वाटतुझी
read moreDileep Bhope
असे कुंद होते अचानक वारे सभोवती विजाळल्या ढगांनी कोणास द्यायचे उत्तर? श्वासांनी श्वासांचे भोगायचे शाप निरंतर मौनातल्या आठवणींना म्हणायचे 'या नंतर' ©Dileep Bhope #आठवणी
Rashmi Hule
काही नाती फार सुंदर असतात खूप जवळची आणी पवित्र असतात मग अचानक कधी काय होते समजत नाही ताणली जातात, अंतरतात अनोळखी... ओळखी... परत एकदा... अनोळखी होतात... आठवणींच्या पसार्यात कायम राहतात.. मनोमन शुभेच्छा आणी आशिर्वाद देत राहातात.. #आठवणी#शुभेच्छा सुप्रभात मित्र आणि मित्रानों आजचा विषय आहे विषय - "आठवणींचा पसारा" #आठवणींचापसारा
#आठवणी#शुभेच्छा सुप्रभात मित्र आणि मित्रानों आजचा विषय आहे विषय - "आठवणींचा पसारा" #आठवणींचापसारा
read morepallavi
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी अस म्हणतात पण तुझ्या माझ्यात अस होत नाही विसरायचं खूप प्रयत्न केला तुला पण विसरता मात्र येत नाही का केलंस इतकं प्रेम हे अजून ही कळलच नाही खूप केला विचार आणि मग लक्षात आलं तळ हाताच्या फोडा प्रमाणे जपलं होतंस मला मग तूच सांग इतकं प्रेम केल्यावर कसं विसरणार मी तुला ©lavanya clinic pallavi #Pallavi#lovestory #Prem #आठवणी
#Pallavi#LoveStory #Prem #आठवणी
read moreSamadhan Navale
कीती मांडु मनातील भावना मन हे रिते होतंच नाही, जेवढ्या मांडेल तेवढ्या.. धावून येतात आठवणी ! ©Samadhan Navale #आठवणी #brothersday
काव्यात्मक अंकुर
आठवणीत तुझ्या मी गुरफटलो काही असा सरीच्या तालावरी नाचतो मोर जसा ©काव्यात्मक अंकुर #आठवणी #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #nojotomarathi #marathi #lovequotes #Love #Memories #She #Love
#आठवणी #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #nojotomarathi #marathi #lovequotes #Love #Memories #She #Love
read more