Nojoto: Largest Storytelling Platform

Best marathiserial Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best marathiserial Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

मराठी मालिका #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #माझेविचार #marathiserial #Collab लिहायला काय मी लिहून जाईल, पण भीती वाटते,लिखाणावर आक्षेप घेऊन, लगेच घरावर महिलांचा मोर्चा येईल. लिखाण काही इतके खोचक नाही की काही समस्या येईल, तरीही त्यांच्या आवडीच्या मालिकांवर लिहीलं म्हणून हरकत घेतली जाईल. म्हणून मी थोडा घाबरतो आहे,

read more
लिहायला काय मी लिहून जाईल,
पण भीती वाटते,लिखाणावर आक्षेप घेऊन,
लगेच घरावर महिलांचा मोर्चा येईल.
लिखाण काही इतके खोचक नाही की काही समस्या येईल,
तरीही त्यांच्या आवडीच्या मालिकांवर लिहीलं म्हणून हरकत घेतली जाईल.
म्हणून मी थोडा घाबरतो आहे,
स्त्रियांच्या आवडत्या मालिकांवर लिहायला थोडा विचार करतो आहे.
पण खरंच खूप वैताग येतो,कामावरून घरी जावं तर ह्या मालिकांचा हैदोस असतो.
कुठल्याही मालिकेत शिकावे असे क्वचितच असते,
तरीही त्याच मालिकेचे पुढे काय होईल हे टेन्शन असते.
पण एका गोष्टीच मात्र खूप हसू येत,
जे पात्र आता आवडत आहे काही दिवसांनी तेच नावडत होत.
संध्याकाळी 7 नंतर रांगच असते,पाठक बाई नाही जात तर शनया येते,
शनया नाही जात तर बबड्या येतो,आणि बिचारा खूप शिव्या ऐकत राहतो.
झी मराठी तर आहेच कलर्स ही मागे नाही,
"आई कुठे काय करते" मध्ये काहीही दाखवले जाई. मराठी मालिका
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #माझेविचार #marathiserial #collab 
लिहायला काय मी लिहून जाईल,
पण भीती वाटते,लिखाणावर आक्षेप घेऊन,
लगेच घरावर महिलांचा मोर्चा येईल.
लिखाण काही इतके खोचक नाही की काही समस्या येईल,
तरीही त्यांच्या आवडीच्या मालिकांवर लिहीलं म्हणून हरकत घेतली जाईल.
म्हणून मी थोडा घाबरतो आहे,

Nikita Badokar

mute video

shital waghmare

mute video

Anagha Ukaskar

सारं घर हिरमुसलंय, सुनं सुनं झालंय !
त्या घरात पुन्हा ' समृद्धी ' पहायची आहे मला...🙂
खूप पाणी वाहिलं आमच्या 'अरु' च्या डोळ्यातून,
तिचा गोड, हसरा चेहरा पुन्हा पहायचा आहे मला...
आजवर नाईलाज म्हणून राहिले ना ते घरात?
बाबांना मनापासून वावरताना पहायचं आहे मला...
किती शांत झालेत आप्पा सुद्धा आजकाल!
त्यांचे गंमतीदार टोमणे पुन्हा ऐकायचे आहेत मला...
आंबट-गोड आजी ला एक निरोप सांगा माझा,
तिची पुर्वीसारखी लगबग पुन्हा पहायची आहे मला...
गोड चॉकलेट केक आता कडवट चेहरा करुन बसलाय!
अभी ला पुन्हा एकदा भरभरुन हसताना पहायचं आहे मला...
पुरे झाली रागावलेल्या यश ची चिडचिड!
त्याला पुन्हा गिटार घेऊन गाताना पहायचं आहे मला...
सर्वांची काळजी करणारी गौरी आता एकटी पडली आहे!
तिला पुन्हा घरात मिसळून जाताना पहायचं आहे मला...
धक्का बसलेल्या ईशा चा सुकून गेलाय चेहरा,
तिला मस्ती करत बागडताना पहायचं आहे मला...
साधी भोळी विमल फार काळजी करते आई ची!
तिला बडबड करत घरभर फिरताना पहायचं आहे मला...
संजना दूर गेली खरी समोर येणारया संकटापासून,
पण, तिला चूक सुधारताना पहायचं आहे मला...
खूप झालं राग, रुसवे, भांडण आणि अबोला!
पुन्हा आनंदी, हसत्या-खेळत्या देशमुखांच्या घरी रहायचं आहे मला... ❤

कवयित्री 
- @sumedhian_poetess 
( अनघा नेहा नरेंद्र उकसकर )

©Anagha Ukaskar #aaikuthekaaykarte! #MarathiKavita #marathiserial #Shayari #popularquotes 

#dawn


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile