Nojoto: Largest Storytelling Platform

Best स्त्री_जन्मा_तुझी_कहाणी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best स्त्री_जन्मा_तुझी_कहाणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

शब्दवेडा किशोर

#माझा नसलेला हक्क....
काल हसत हसत तु म्हणालास की माझ्यासकट सगळं तुझंच आहे राणी...
सगळं तुझंच आहे असं म्हणालास खरंच सांग ना रे तु....कुठे काय आहे रे माझं......?
कपाळीचं कुंकू मोठ छान कोरून लावते मी नाव तुझंच आहे त्यावर गोंदवलेललं
या आपल्या घर संसारात मेहंदीने भरलेलं पहिलं पाऊल टाकताना व उंबरठ्यावर ओलांडता माप 
नाव तुझंच होतं माझ्या ओठांवरच्या उखाण्यात गुंफलेलं ते अनमोल असं अस्तित्वही तुझंच होतं माझ्या अस्तित्वाशी जोडलेलं....अन् तू म्हणतोस सगळं तुझंच आहे..खरंच सांग ना रे तु....कुठं काय आहे रे माझं......?
सावली बनून तुझी चालताना पावलोपावली सप्तपदी आठवत गळ्यातल्या मंगळसूत्राचा एकेक मणी मजला सदा तुझीच मनमोहक आठवण करून देणारा हो....तुझ्या माझ्या अस्तित्वाला एक करणारा आहेच तो....मंगळसूत्राच्या पहिल्या वाटीतलं कुंकू भाळावर मिरवताना एक झालेला तोच जीव माझा राया तुझ्यातच गुंतलेला मग कुठे काय दिसे रे माझं उरलेलं
अन् तू म्हणतोस सगळं तुझंच आहे खरंच सांग ना रे तु....कुठं काय आहे रे माझं......?
हातभर ल्यायलेली हिरवीगार काकण किणकिणतात व 
माझ्या स्पंदनातून नाव तुझंच उमटत जातं प्रत्येक श्वासासोबत
हो..मी अन् माझं बालपण अन् सोबत बांधून आणलेली ती किंचितशी लावलेली हळद मात्र माझीच हं..
नावाची तुझ्याच होती रे ती..पण जाताना मात्र मीच अंगभर लेवून जाईन एकटी..जोडव्यांची ती अखंड जोडणी सोबत नेताना त्या चिमूटभर हळदीचा तिच्यावरचा माझा हक्कही मी नाही सोडणार..ती माझ्या अस्तित्वाचा भाग असणार..ती तेवढी चिमुटभर हळद..केवळ माझीच..हो..फक्त माझीच असणार..
फिरूनी नव्यानं जन्म घेईन मी तेव्हा सुद्धा तीच तुझ्या नावाची चिमुटभर हळद मी मोठ्या अभिमानानं अंगभर लावणार..तेव्हा सुद्धा ती चिमुटभर हळद तुझ्याच नावाची असणार रे..आणि तरीही काल हसत हसत तु म्हणालास की माझ्यासकट
सगळं तुझंच आहे राणी...सगळं तुझंच आहे असं म्हणालास..
खरंच सांग ना रे तु..कुठं काय आहे रे माझं......?
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #स्त्री_जन्मा_तुझी_कहाणी

Rajeshwari Ghume

घालमेल मनीची 
मी सांगु कुणा?
अनाहुताच्या त्या
प्रगट खुणा...
कसे सांगू मी तव
काय जाहले ते,
ना कळतील कधी 
तुला भाव अंतरीचे...
कळण्यास या वेदना
ये जन्मास माझीया,
संघर्ष या मनीचा 
माझ्या जन्मा आधीचा....
-वीणा

©Rajeshwari Ghume #वीणा #स्त्री_जन्मा_तुझी_कहाणी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile