Nojoto: Largest Storytelling Platform

निसर्ग अन् शेतकरी निसर्गाला वाटते दमला आहे माझ

निसर्ग अन् शेतकरी

 निसर्गाला वाटते दमला आहे
  माझा शेतकरी...
तेव्हा तो बरसवतो सरी आपुलकीने..
किलबिलाट तव उठतो पावश्या घुम पावश्या घुम्
जणू धरणीमाय कवटाळते त्याला लेकराप्रमाने..

साथीला येतात बुबुळासारखे ढग..
अन् कथ्थक करतो तो मोर नाचरा..
बरसतात सरी एकामागून एक..
जणू वसुजानकीचा तो कृष्ण हासरा..

शेतकरी आणि निसर्ग म्हणजे जणू सख्खे भाऊ..
एकत्र आले तर बनतील हे अख्ख्या गावाचे राव..
अन् गेले विरोधी एकमेकांच्या..
तर यांना रंकाचाही मिळणार नाही भाव..

साथ दे निसर्गा , वाट दे निसर्गा..
कष्टाची होऊदे चीज त्याच्या..
आजवर झेलली खूप दुःखे त्याने..
त्यास दिसुदे एकदा सुखाची पहाट निसर्गा...
त्यास दिसुदे एकदा सुखाची पहाट निसर्गा...

                                   -अभि...✍ #मायमराठी #मराठी #मराठीकविता #शेती #शेतकरी #गावाकडची_रानफुलं #कष्ट