Nojoto: Largest Storytelling Platform
abhijeetjagtap1856
  • 27Stories
  • 20Followers
  • 224Love
    2.4KViews

Abhijeet Jagtap

love poetry

  • Popular
  • Latest
  • Video
6a4f03e941733199e1361f4ffbe09d14

Abhijeet Jagtap

मंत्रिपदाच्या चढा ओढीत गावच्या गुरा-ढोराकड थोड लक्ष राहुद्या.. स्वतःच घर भरण्यापेक्षा माणुसकीचा झरा वाईसा वाहुद्या..
दुष्काळाचे संकट डोकावता हवालदिल झाला माझा बळीराजा, अन्नदात्याचे रक्षण करण्या
साथ सगळी देऊया.. खुर्चीसाठी भांडत बसण्यापेक्षा दुष्काळा वर थोड बोलूया..

असता मुबलक पाणी किंमत नाही मनी
पाऊस पडता लांबणीवर तांडव राहतो 
कुनब्याच्या घरी..
ना कोणाचे ना कोणा पडले स्वतः च धोतर सावरून काई एक पसार झाले..
एकमेकांची जिरवण्यापेक्षा पाणी थोड जिरवूया.. आप्तजनात भांडत बसण्यापेक्षा .. दुष्काळावर थोड बोलूया..

दुष्काळावर मात करून मातीतून सोन पिकवल असत , अन् तिशी ओलांडलेल्या बंड्याच माझ्या दोनाच चार केलं असत..
शेतकरी म्हणून डावलेल्या पोरींना कष्टाच्या कमाई ने सोन्या चांदीने मढवल असत.. सुखाची पहाट बघण्यासाठी पाणी नियोजनाची गाठ बांधूया..
हे माझ्या सवंगड्यानो दुष्काळावर थोड बोलूया..

©Abhijeet Jagtap
  #दुष्काळ#महाराष्ट्र #Drought #MaharashtraPolitics #maharashtra #village
6a4f03e941733199e1361f4ffbe09d14

Abhijeet Jagtap

...रुठी हुई वो..

मनाने आया था मैं मन गई वो..
छुपाके रखी थी बाते,सून गई वो..
कागज पे लिखकर दु या दिलपर 
समज मे नही अा रहा था,मै सोचताही रेह गया
और कुछ पल मुस्कुराकर थम गई वो
मनाने आया था मैं  मन गई वो, छुपाके रखी थी बाते सुन गई  वो

समय बीत रहा था , उलझने बढ रही थी,
दिल की धडकने हवा से तेज हो रही थी..
उसी के चलते यकायक सा स्पर्श कर गई ओ
मनाने आया था मैं  मन गई वो, छुपाके रखी थी बाते सुन गई  वो

हवा का झोंका उसकी झुल्फोंसे खेल रहा था..
मेरी नजरोंकी लकिरोंसे ज्यादा मिल रहा था..
मै अंदर ही अंदर नफरती हो रहा था
उसी वक्त मेरे नेत्रोंको धोका देकर हल्का सा शर्मा गई वो..
मनाने आया था मैं  मन गई वो, छुपाके रखी थी बाते सुन गई  वो

बातोंसे ज्यादा मेरा तन बोल रहा था,
केह देने वाली बातोंको फिर से याद कर रहा था,
कुछ अल्फाज मेरे मुह से निकलने ही वाले थे
उसी वक्त मेरी जबान उसके दोनो हाथोंसे बंद कर गई वो..
मनाने आया था मैं मन गई वो, छुपाके रखी थी बाते सुन गई  वो

अब तो धडकनोंकी पुरी दौड लगी हुई थी..
उम्मिदोंकी लहरे किनारे पे शोर मचा रही थी..
मैं मिलन की घडी का इंतजार करता रहा,
उसी वक्त मेरे फैले हुये बाहो मे समा गई वो..
मनाने आया था मैं मन गई वो, छुपाके रखी थी बाते सुन गई  वो..✍

                                                        -abhinil..❣ #Girlfriend #Love #Hindi 

#Love

0 Love

6a4f03e941733199e1361f4ffbe09d14

Abhijeet Jagtap

तू अलंकार माझी मी काव्यगुण तुझा

तू कविता माझी मी कवी गं तुझा
तू चाल माझी मी राग तुझा
तू शब्दरचना माझी मी त्याचा रमणीय अर्थ
तू यमक शोधतेस पण मी रूपक तुझा 
तू कविता माझी मी कवी गं तुझा

तू असशील व्यतिरेक तरी मी देतो दृष्टांत तुला
तू भाळतेस उपमावर पण मी उत्प्रेक्षा तुझा
तू स्वभावोक्ती परी मज अपन्हूती आवडे
तू अन्योक्ती सारखी वागे पण मी आहे सार तुझा
तू कविता माझी मी कवी गं तुझा

तू व्याजस्तुती करतेस त्याला विरोधाभास माझा
तू पर्यायोक्ती कडे वळतेस पण मी अतिशोयोक्ती तुझा
तू अनुप्रास परी सुंदर पण मी श्र्लेशसारखा दुअर्थी
काही झालं तरी
तू अनन्‍वय माझी मी विशेषोक्ती तुझा
तू कविता माझी अन् मी कवी ग तुझा…
तू कविता माझी अन् मी कवी ग तुझा..

-abhi.. #MarathiKavita #mypoems #poem
6a4f03e941733199e1361f4ffbe09d14

Abhijeet Jagtap

तू अलंकार माझी मी काव्यगुण तुझा

तू कविता माझी मी कवी गं तुझा
तू चाल माझी मी राग तुझा
तू शब्दरचना माझी मी त्याचा रमणीय अर्थ
तू यमक शोधतेस पण मी रूपक तुझा 
तू कविता माझी मी कवी गं तुझा

तू असशील व्यतिरेक तरी मी देतो दृष्टांत तुला
तू भाळतेस उपमावर पण मी उत्प्रेक्षा तुझा
तू स्वभावोक्ती परी मज अपन्हूती आवडे
तू अन्योक्ती सारखी वागे पण मी आहे सार तुझा
तू कविता माझी मी कवी गं तुझा

तू व्याजस्तुती करतेस त्याला विरोधाभास माझा
तू पर्यायोक्ती कडे वळतेस पण मी अतिशोयोक्ती तुझा
तू अनुप्रास परी सुंदर पण मी श्र्लेशसारखा दुअर्थी
काही झालं तरी
तू अनन्‍वय माझी मी विशेषोक्ती तुझा
तू कविता माझी अन् मी कवी ग तुझा…
तू कविता माझी अन् मी कवी ग तुझा.. #walkingalone
6a4f03e941733199e1361f4ffbe09d14

Abhijeet Jagtap

...मनाची गुरफट..

मनाशी विमुक्त संवाद की विचारांची घुसमट
स्वतःशीच अंतःकरलेली असते ती आयुष्याची फरफट..
अहंकाराचा डौल की गर्वाची मुसंडी..
समाधानाशी केलेली कुचेष्टा ती
मनाने मनाला दिलेली हीच ती कबुली..

क्षणात धरते ती चित्याची चपळाई
घुसळून घुसळून त्याची त्यालाच कीव येई..
परि डोकेदुखी शिवाय पदरी त्याच्या पडे ना काई
नवयुगातील मनाची हीच म्हणावी पुण्याई..

तुला सामोरी जाण्यापरी मृत्यू ही बरा..
तुझी घुसमट , तुझी घालमेल खूप बोचतीय मनाला..

ये येड्या मना या जिंदगीला 
फक्त पुरत नाही रे पाठीचा कणा
तुझ्या निर्मळतेने खऱ्या अर्थाने
तो ताठ होईल रे पुन्हा..
तो ताठ होईल रे पुन्हा..
                         
                                            -abhi #मराठीकविता #मन #Soul #मायमराठी #Talk 
#meltingdown
6a4f03e941733199e1361f4ffbe09d14

Abhijeet Jagtap

सगळ्यात जवळचा मित्र नाही पण  मित्र तर नक्कीच बनू शकतो..त्यासाठी ना कुंडली लागते. ना मुहूर्त बघाय लागतो..भाषेत गोडवा आणि स्वभावात रांगडापणा असला की ते होऊन जात..
फक्त होऊन भागत नाही ते वेळोवेळी निभवाव पण लागत..खड्डे पडलेल्या रस्त्यागत मैत्रीचं नातं असतं.. वर्षानुवर्षे पडत राहतात आणि  मैत्रीच्या नात्याने ते भरले ही जातात..सांडवा फुटून बाहेर पडलेल्या पाण्याला कोणतीच दया नसते जो आडवा येईल त्याला आपल्यासोबत नेस्तनाबूत करत पुढे सरकतो..सांडव्याच्या आधी मैत्री नावाची भर भक्कम भिंत असते.. धरण म्हटल तरी वावग ठरणार नाही..मित्राची सगळी सुख दुःख ऐकुन घेतो त्याच्या परमोच्च क्षणापर्यंत साथ देतो..कधी कधी त्याचा पण नाईलाज होऊन हात सुटतो..आणि आपल्या आयुष्यात संकटाचा महापूर येतो.. ते नियतीच्या पुढे कसं जाता येईल ना.. पण आपण मैत्री नावाच्या धरणाला संकटाच्या महापुरासाठी कधीच जबाबदार धरत नाही..मला वाटतेय निर्मळ माणुसकीचा झरा म्हणजे मैत्री.. रांगोळीला ठळक दाखविणारा (पडद्यामागच्या हीरो) म्हणजेच सडा म्हणजे मैत्री..कठीण काळातली आजोबाची काठी अन् साठीत आलो तरी मित्रांच्या त्या गाठीभेटी म्हणजे मैत्री..खऱ्या अर्थाने सेक्युलर(धर्मनिरपेक्ष) असणारी एकमेव गोष्ट म्हणजे मैत्री..वयाची मर्यादा, विचारांची कमतरता, चेहऱ्याची भौमीकता या सगळ्यासाठी कुंपणहिन रसाळ फळा फुलांची बाग म्हणजे मैत्री..कृष्ण सुदामा , छत्रपती संभाजी महाराज अन् कवी कलश म्हणजे मैत्री..
                                         @अभी #मराठीकविता 

#FriendshipDay
6a4f03e941733199e1361f4ffbe09d14

Abhijeet Jagtap

फाटक आयुष्य कष्टाच्या सुई दोऱ्याने कसतरी विणला हुतं...

धागं उसवायचच अस खुद्द महापूरान अंगी भिनल हुतं..

भिंतीच्या भेगांना तळपायाच्या भेगानी मुजवल हुतं..

भिंतीला काय माहीत,

नशिबाच्या भोगापुढ परत भेगाव लागणार हुत...


                                                           -abhi.. #flood #mahapur #MarathiKavita 

#rain
6a4f03e941733199e1361f4ffbe09d14

Abhijeet Jagtap

रोते रोते हसानेवाले
हसते हसते रुलानेवाले
दोस्त ही तो होते हैं..
बेरंगी जीवन मे रंग भरानेवाले...

प्यार का मतलब औंर...
मतलबी प्यार मे से अंतर बतानेवाले..
सही टाइम का इंतजार..
बुरे टाइम की खातीरदारी रखने वाले..
दोस्त ही तो होते हैं..
डूबती नैया को पार कराने वाले ..

मुहावरों का मतलब पता भी नहीं होता,
फिर भी दोस्त के ऊपर डागनेवाले
दोस्त ही तो होते हैं...
अपने दोस्तों को खून के रिशतो की 
स्केल से नापने वाले...
                                -abhi #friendsforever #frineds #myfriend #lovefriendship 
#brothersday
6a4f03e941733199e1361f4ffbe09d14

Abhijeet Jagtap

स्पर्शहीन त्यास तो कोमल बनवितो..
गंधहीन त्यास तो सुवासिक भासवितो..
रंगहीन त्यास तो छटाधारी संबोधितो..
ध्वनीलाही तव मागे टाकून..
   तो स्वतःस कवी म्हणवितो.....
शब्दालाही तो निःशब्द करतो..
उत्तरलाच तो उत्तर विचारतो..
अशक्यप्राय तो शक्य दाखवितो..
 सूर्य किरणांचा तव पाठलाग करणारा ..
तो स्वतःस  कवी म्हणवितो.....✍
                       - अभी #poemday #मराठीकविता 


#WForWriters
6a4f03e941733199e1361f4ffbe09d14

Abhijeet Jagtap

मराठी भाषा दिवस

डोळ्यातील भावनांना जर ओजस्वी वाचेने 
निर्मळ भाषेची साथ दिली तर 
भेदून जाणाऱ्या भावनेला अलगद
तारणारा बांध तयार होतो..

भाषेचा साज चढवून,
शृंगाराचा परीघ साधून
ओठांच्या लगबगीत , गालातल्या खळीला..
सौंदर्याची परिभाषा तयार करतो.

माझी मराठी माझी मातृभाषा
माझी मातृभूमी.
 या मराठी दिनानिमित्त 
आपणास अवघा महाराष्ट्र प्रणाम करतो....
                              - अभि....✍ #मराठीकविता #मराठी #भाषा #दिवस 
#touchthesky #मायमराठी #मराठीराजभाषादिन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile