Nojoto: Largest Storytelling Platform

हो मोकळी मनाने हितगुज सांग मनीचे.. नको घाबरुस आता

हो मोकळी मनाने
हितगुज सांग मनीचे..
नको घाबरुस आता
सारी खोल  गुपिते..
हा खेळ सावल्यांचा
अविरत चालतो आहे..
चाचपडू नको कधीही
चाल पुढे निर्धाराने..
या निष्पर्ण वृक्षांनाही
पालवी फुटते नव्याने..
मग तूच थांबतेस का गं
भर ओंजळ नवऊर्जेने..
जग आता स्वाभिमानाने
 जग तू नवविचाराने..

©Sujata Bhalerao
  #जीवनगाणे#गातच राहावे