Nojoto: Largest Storytelling Platform
sujatabhalerao1769
  • 63Stories
  • 6Followers
  • 411Love
    4.5KViews

Sujata Bhalerao

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

फिकट होत जातात रंग नभीचे
धुसर होते वलय निरभ्रतेचे
निळसर छटा  जणू अंधारते 
सैरभर  काहूर उठते
मेघही शुष्कतेने थांबले 
निरंतर प्रवासास निघाले
मी लुब्ध होऊन सारे पाहते 
माझ्यातील मीपण गळून पडते
सर्व रंग एक असल्याचे बघते
स्तंभित होऊन सारे पाहते
मी ना माझी  उरते तेव्हा
एकरुप होऊन जाते जेव्हा 
ना इथे कुठला धर्म ना जाती 
अन् ना पक्षाचा झेंडा हाती 
मिसळूनी रंगात साऱ्या तुला
 निरपेक्ष आठवणींचा तो झुला 
लोभ , माया , मोह , मत्सर
समूळ नायनाट होतो नंतर 
प्रभाती पाखरांसवे नभी जेव्हा
हलकेच मी विहरुन येतो तेव्हा
एकटाच प्रवासी वाटेवरचा
ठाव घेतो निर्मळ मनाचा

©Sujata Bhalerao
  #Dhund #जीवनगाणे#गातच राहावे
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

02/10/23

नमन त्या अहिंसेच्या पुजाऱ्याला
वंदिते दो करांनी राष्ट्रपित्याला
केलात तुम्ही मिठासाठी सत्याग्रह
अन् शांतीमार्गाचा ठेवून निग्रह
स्वातंत्र्य लढ्यातील एक सेनानी
खादी सुत कातिले चरख्यानी
काल एक तासाची स्वच्छता केली
पण तुमच्या सारखी नाही जमली
आम्ही गुलाम कागदी आदेशाचे 
सर्वच नियम केवळ पाळायचे
आयुष्य बेगडी , भेगाळलेले
 अहिंसा , सत्यापासून दुरावलेले
आपल्या कार्याला सदैव सलाम
सदा  चिरंतन कर्मयोगी निष्काम 
🙏🙏💐

©Sujata Bhalerao #gandhijayanti जीवनगाणे #गातच राहावे

#gandhijayanti जीवनगाणे #गातच राहावे #मराठीपौराणिक

17 Love

f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

अवखळ अन् अल्लड वारा
त्यात विझू दे अहंकार सारा
दिर्घकाळ नको अबोला आता
मिटतील संभ्रम बोलणे होता
रुसवा नि फुगव्याचा विसर
मीपणाची वितळेल झालर 
आयुष्यात शेवटी गोड आठवणी
आसपासही नकोत कटू साठवणी
मी - तू करता करता होईल
आणि अखेरची सांजही येईल
मग कोणाकडे तक्रार करणार
अखेर श्वासतही अंतर पडणार
जगून घेऊ मिळालेले जीवन
आनंदाची पेरणी , गोडवा ठेवून

©Sujata Bhalerao
  #uskaintezaar जीवनगाणे #गातच राहावे

#uskaintezaar जीवनगाणे #गातच राहावे #मराठीविचार

27 Views

f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

      *साक्षरता दिन*                  08/09/23

साक्षर म्हणून घेणारे आम्ही ! 
उगाच हुरळून जाणारे आम्ही
उमगलं का गणित जीवनाचं ?
कधी बेरजेचं कधी वजाबाकीचं
अहो , हातचा फक्त बेरजेत होतो
वजाबाकीत हळूच निसटून जातो
माहिती असूनही सारं काही
बोलतो उगाच काहीबाही 
शब्द वाचताना अडखळणारे 
बनतात पुस्तक लिहीणारे
मधला प्रवास जोखमीचा
शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा
गोडी जोडाक्षर व जोडशब्दांची
होते सुरेख मांडणी ओळींची
येऊन बसतात शब्द पंक्तीला 
पुस्तक रुपाने भेटतात आपल्याला 
  
सर्वांना साक्षरता दिनाच्या शुभेच्छा 👏💐

©Sujata Bhalerao
  #kitaab #जीवनगाणे# गातच राहावे

46 Views

f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

निष्पर्ण मी जाहलो आजजरी
विहरले कैक इथल्या फांदीवरी
घरटी बांधून संसार थाटला
प्रेमाचा झरा नाही आटला
विहंगणाऱ्या साऱ्यांचा साक्षी
फांदीवर पक्ष्यांची सुबक नक्षी
थबकून नेहमी मला पाहायचे सारे
सोसाट्याचे वाहत असे जरी वारे
अनेकांच्या आठवणींचा मी सोबती
दूरदूरवर पसरे माझी ख्याती 
आताशा फिरकतही नाही कोणी
पुरेसे नाही खत आणि पाणी
भार सोसवत नाही फांद्यांचा
वाट बघतो पानगळ होण्याचा
नाही बहरलो कित्येक दिवसांत
भिजायला नाही मिळत पावसात
अश्रुंनाही वाट केली मोकळी
पुढे भरुन निघेल का पोकळी
आता दिवस उरलेत फक्त चार
सुकलेल्याला पालवी कशी फुटणार ?

©Sujata Bhalerao
  #Sukha  #जीवनगाणे# गातच राहावे

27 Views

f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

अखेर चंद्रावर यान उतरले🌙🛰️
अन्  इस्रोने यश मिळवले
झळकला तिरंगा चंद्रावर
आता न उरले कसले अंतर
वाटे आम्हां बहु अभिमान 
भारत आहे राष्ट्र महान 🇮🇳

©Sujata Bhalerao
  #chandrayaan3
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

कुपीतलं सुगंधी अत्तर म्हणजे मैत्री
सोनचाफ्याचा दरवळ म्हणजे मैत्री
श्रावणात बरसणाऱ्या सरी म्हणजे मैत्री
नियमित हास्याची लकेर म्हणजे मैत्री
तात्पुरता रुसवाफुगवा म्हणजे मैत्री
दु:खात सहभागी होणं म्हणजे मैत्री
टपरीवरचा चहा पाजणं म्हणजे मैत्री
हेवा न वाटता वाहवा म्हणणं म्हणजे मैत्री
आनंदाला उधाण आणणं म्हणजे मैत्री
घासातला घास देणं म्हणजे मैत्री
एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास म्हणजे मैत्री
निखळपणे चेष्टा ,मस्करी करणे  म्हणजे मैत्री
हक्काने रागे भरणे म्हणजे मैत्री
नकळतपणे डोळे पाणावणे म्हणजे मैत्री
ओसंडून प्रेम वाहणे म्हणजे मैत्री
मनातलं सारं ओळखणं म्हणजे मैत्री
घट्ट रेशीम धागे गुंफणे म्हणजे मैत्री
लांब असूनही जवळ असणं म्हणजे मैत्री

©Sujata Bhalerao
  #FriendshipDay
f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

जगून घे जीवलग मैत्रिणी , राहा आनंदाने
घे विसावा क्षणभर , सोसलेस एकटीने
चिल्यापिल्यांची घेतलीस नेहमीच काळजी
राघूविना केलेस कार्यक्षम त्यांना
डाव एकटीने मांडलास सारीपटावर
साऱ्या सोंगट्या पडल्या जरी उलट्या
ना कधी खचलीस , ना दमलीस
कष्टाची कामे तत्परतेने केलीस
पाखरांच्या पंखातही बळ आलंय
स्वच्छंदी जगायचं त्यांना कळलंय
नको करुस काळजी आता त्यांची
नको करुस कंटाळा खाण्याचा
अन् अतिविचार नको पैशांचा
खात राहा तुला जे जे आवडतं
आणि राहा मस्त छान गाणे गात
नाही भरवसा पुढच्या घटकेचा
जाणूनी घे प्रत्येक क्षण आनंदाचा
गरज पडल्यास हाक मार हक्काने
नको करु संकोच , बाळगू नको बंधने
तू म्हणशील तिथे विनाविलंब भेटू साऱ्या
लगेच अवतरतील भूतकाळातल्या पऱ्या
सहलीचे आयोजन करु , विहार करु गगनी
जगू स्वप्न उद्याचे ओंजळीत घेऊनी

©Sujata Bhalerao
  जीवनगाणे #गातच राहावे

जीवनगाणे #गातच राहावे #जीवनअनुभव

27 Views

f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao

अलगद स्पर्श हाताचा
झाले वलय पाण्याचे
जणू  शुभ्र लाटांप्रमाणे
तरंग उठती तयाचे
किमया की जादूगिरी
या मनमोहक दृश्याची
पारणे फिटे डोळ्याचे
साठते प्रतिमा नयनी

©Sujata Bhalerao
  जीवनगाणे #गातच राहावे

जीवनगाणे #गातच राहावे #मराठीविचार

46 Views

f32697e85f7d47efa9feb2d6e5ec907d

Sujata Bhalerao


अगदी मधासारखे
बोट असावे माझे
अन् टिपावा मकरंद
निरागस फुलपाखराने
नकळत जडेल नाते
सुगंधी फुलासारखे
अवघे मधाळ होईल 
सारे जीवन माझे
गट्टी होता घट्ट त्याशी
सदा बरसती हर्ष राशी
स्वच्छंदी कसे जगावे
त्याच्याकडून शिकावे

©Sujata Bhalerao
  जीवनगाणे #गातच राहावे

जीवनगाणे #गातच राहावे #जीवनअनुभव

88 Views

loader
Home
Explore
Events
Notification
Profile